लखनऊ : ज्या शहरात गांधी आणि नेहरू यांची पहिली भेट झाली... - Mahatma Gandhi
महात्मा गांधी आणि पंडित जवाहरलाल नेहरु. भारताच्या स्वातंत्र्यसंग्रामातील ही दोन मोठी नावे. या दोघांची पहिली भेट झाली, ती १९१६ मध्ये लखनऊला झालेल्या काँग्रेसच्या संमेलनाला.
लखनऊ - महात्मा गांधी आणि पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या ऐतिहासिक भेटीचा साक्षीदार होण्याचे भाग्य लाभलेले शहर म्हणजे, लखनऊ. १९९६ मध्ये महात्मा गांधी काँग्रेसच्या राष्ट्रीय संमेलनासाठी लखनऊला आले होते. यावेळी जवाहरलाल नेहरु हे देखील त्यांचे वडिल मोतीलाल नेहरू यांच्यासह या संमेलनाला उपस्थित होते.
लखनऊच्या चारबाघ रेल्वे स्थानकावर गांधी आणि नेहरू यांची पहिली भेट झाली. या भेटीत नेहरूंवर गांधीजींच्या विचारांचा बराच प्रभाव पडला, आणि त्यांना गांधीवादाकडे जाण्याची प्रेरणा मिळाली.
काँग्रेसचे १९१६चे अधिवेशन फैजाबादला होणार होते. मात्र, फैजाबाद हे शहर मोठे आणि तितके प्रसिद्धही नसल्यामुळे संमेलनासाठी लखनऊची निवड करण्यात आली. या संमेलनानंतरच भारताच्या स्वातंत्र्यलढ्यासाठी हे दोन मोठे नेते एकत्र आले. त्यामुळे हे संमेलन ऐतिहासिक मानले जाते.
हेही पहा : लखनऊच्या जनाना पार्कशी जुळल्या आहेत गांधीजींच्या अनेक आठवणी
news
Conclusion: