ETV Bharat / bharat

संचारबंदी परिणाम : ...म्हणून घरगुती गॅस सिलिंडरची मागणी वाढली

आपल्याकडे मोठ्या प्रमाणात एलपीजी गॅसचा साठा आहे. तसेच आपले पुरवठा केंद्र देखील जलद गतीने काम करत आहेत. त्यामुळे एलपीजीचा तुटवडा होणार नाही. त्यामुळे नागरिकांनी घाबरून जाऊ नये. आम्ही पहिल्या बुकिंगनंतर १५ दिवसाच्या फरकाने दुसरे बुकिंग करत असतो. त्यामुळे नागरिकांनी बुकींगसाठी गडबड करू नये, असे आवाहन इंडियन ऑईलचे अध्यक्ष संजीव सिंह यांनी केले आहे.

संचारबंदी परिणाम : ...म्हणून घरगुती गॅस सिलिंडरची मागणी वाढली
संचारबंदी परिणाम : ...म्हणून घरगुती गॅस सिलिंडरची मागणी वाढली
author img

By

Published : Mar 30, 2020, 1:47 PM IST

नवी दिल्ली - कोरोनामुळे देशात २१ दिवसांचा लॉकडाऊन आहे. त्यामुळे सर्वांना घरी राहणे बंधनकारक आहे. तसेच सर्वजण घरीच स्वयंपाक बनवत आहेत. परिणामी घरगुती गॅसची मागणी वाढली आहे.

मार्च महिन्यामध्ये पेट्रोल आणि डिझेलसोबत इतर इंधनांच्या किंमतीमध्ये जवळपास १५ ते २० टक्क्यांनी घट झाली आहे. याउलट घरगुती गॅस सिलिंडरच्या मागणीमध्ये जवळपास तेवढीच वाढ झाली आहे. आपल्याकडे मोठ्या प्रमाणात एलपीजी गॅसचा साठा आहे. तसेच आपले पुरवठा केंद्र देखील जलद गतीने काम करत आहेत. त्यामुळे एलपीजीचा तुटवडा होणार नाही. त्यामुळे नागरिकांनी घाबरून जाऊ नये. आम्ही पहिल्या बुकिंनंतर १५ दिवसाच्या फरकाने दुसरे बुकिंग करत असतो. त्यामुळे नागरिकांनी बुकींगसाठी गडबड करू नये, असे आवाहन इंडियन ऑईलचे अध्यक्ष संजीव सिंह यांनी केले आहे.

लॉकडाऊनमुळे घरगुती गॅस सिलिंडरची मागणी वाढलेली आहे. त्यामुळे सरकारने देखील पुरवठा व्याप्ती वाढवली आहे. तसेच लाकडे आणि कोळशावर स्वयंपाक करत असलेल्या ८ करोड महिलांना संपूर्ण देशात प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेमधून कनेक्शन देण्यात आले. तसेच इतर ग्राहक पकडून देशात एकूण ३५ करोड एलपीजी ग्राहक आहेत. त्यामुळे कोणालाही एलपीजीचा तुटवडा भासू नये यासाठी पेट्रोलियम मंत्री धरमेंद्र प्रधान यांनी सौदीचे ऊर्जामंत्री यांच्यासोबत चर्चा करून एलपीजीचा पुरवठा करण्याबाबत चर्चा केली असल्याचे त्यांनी सांगितले.

:

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.