ETV Bharat / bharat

पाकिस्तानात आढळले 1 हजार 300 वर्ष जुने विष्णुचे मंदिर - पाकिस्तानात हिंदू मंदिराची तोडफोड

पाकिस्तानातील स्वात जिल्ह्यामध्ये 1 हजार 300 वर्ष जुने हिंदू मंदिर आढळले आहे. स्वात जिल्ह्यामध्ये पहिल्यांदा हिंदू शाहीचे पुरावे मिळाले आहेत. स्वात जिल्ह्यामध्ये बौद्ध धर्माची अनेक पूजास्थळे आहेत.

पाकिस्तान
पाकिस्तान
author img

By

Published : Nov 21, 2020, 1:42 PM IST

पेशावर - पाकिस्तानातील स्वात जिल्ह्यामध्ये आणखी एक पुरातन हिंदू मंदिर आढळले आहे. हे मंदिर 1 हजार 300 वर्ष जुने असून पाकिस्तानी आणि इटलीच्या पुरातात्विक विशेषज्ञांनी मंदिराचा शोध लावला आहे. बारिकोट घुंडईमध्ये खोदकामावेळी या मंदिराचा शोध लागला आहे. हे विष्णु मंदिर असल्याची माहिती खैबर पख्तुनख्वामधील पुरतत्व विभागाचे फजले खलीक यांनी दिली. हे मंदिर 1300 वर्ष जुने असून हिंदू किंवा काबुल काळात (850-1026 ) ते बांधण्यात आले होते.

मंदिराच्या बाजुला पाण्याचे कुंडही आढळले आहे. भक्त पूजेच्याआधी कुडांत स्नान करायचे. स्वात जिल्ह्यामध्ये पहिल्यांदा हिंदू शाहीचे पुरावे मिळाले आहेत. स्वात जिल्ह्यामध्ये बौद्ध धर्माची अनेक पूजास्थळे आहेत. पाकिस्तानातील पंजाब स्थितभागामधील सियालकोटचे 1 हजार वर्ष जुने शिवालय तेजा सिंह मंदिर आहे. सरदार तेजा सिंह यांनी हे मंदिर बांधले होते. भारत-पाकिस्तान फाळणी दरम्यान मंदिर बंद करण्यात आले होते. भारतात बाबरी मशिद पाडल्यानंतर पाकिस्तानमधील काही लोकांनी शिवालय तेजा सिंह मंदिर पाडण्याचा प्रयत्न केला होता. त्यानंतर पाक स्थित हिंदु लोकांनी मंदिरात जाणे बंद केले होते. गेल्यावर्षी तब्बल 72 वर्षांनंतर ते मंदिर उघडण्यात आले होते.

पाकिस्तानात हिंदू मंदिराची तोडफोड -

पाकिस्तानमध्ये हिंदूंच्या मंदिरांना लक्ष्य करण्यात आल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. यासंदर्भात लंडनस्थित पाकिस्तानी मानवाधिकार कार्यकर्त्या अनिला गुलजार यांनी पाकिस्तान सरकारवर टीका केली आहे. पाकिस्तानात 828 पैकी फक्त 20 मंदिरेच बाकी आहेत, असे त्या म्हणाल्या. काही दिवसांपूर्वी पाकिस्तानच्या सिंध प्रदेशात हिंदू मंदिराची तोडफोड झाली होती. यावर त्यांनी ही प्रतिक्रिया दिली. त्यांच्या या वक्तव्यानंतर पाकिस्तानातील अल्पसंख्याकाच्या सुरक्षतेचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे.

हेही वाचा - भाकरी विकणाऱ्या महादेवींची प्रेरणादायी कहाणी; २०० महिलांना दिलाय रोजगार

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.