ETV Bharat / bharat

'बाबा का ढाबा' : व्हायरल व्हिडिओनं पालटलं नशीब; कोणीच जात नव्हते तिथे लागल्या ग्राहकांच्या रांगा - बाबा का ढाबा व्हिडिओ

'ईटीव्ही भारत'चे प्रतिनिधी जेव्हा मालवीय नगरमध्ये असणाऱ्या या ढाब्यावर पोहोचले, तेव्हा तिथे शेकडोंच्या संख्येत लोक उपस्थित होते. कित्येक लोक या वृद्ध दाम्पत्यासोबत फोटो काढून घेण्यासाठी आले होते, तर काही लोक त्यांना मदत करण्यासाठी. यासोबतच, या ढाब्यावर खाण्यासाठी येणाऱ्या ग्राहकांची संख्याही बरीच होती...

Long queues of people at Baba  ka Dhaba in malviya nagar gain popularity from social media
'बाबा का ढाबा' : व्हायरल व्हिडिओनं पालटलं नशीब; कोणीच जात नव्हते तिथे लागल्या ग्राहकांच्या रांगा
author img

By

Published : Oct 9, 2020, 7:32 AM IST

नवी दिल्ली : बजरंगी भाईजान चित्रपटात नवाजुद्दीन सिद्दीकी सलमानला इंटरनेटची ताकद काय असते हे दाखवून देतो. एका व्हायरल व्हिडिओमुळे बजरंगीची केवढी मदत होते, हे आपण पाहिलेच आहे. इंटरनेट आणि व्हायरल व्हिडिओच्या याच ताकदीची झलक आता दिल्लीमधील एका दाम्पत्यालाही पहायला मिळाली. दिल्लीमधील 'बाबा का ढाबा' हा ढाबा काही दिवसांपूर्वी कोणाला माहितही नव्हता. लॉकडाऊनमुळे तिथे कोणी जात नव्हते, ज्यामुळे हा ढाबा चालवत असलेले दाम्पत्य अडचणीत आले होते. मात्र, या ढाब्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर आता याठिकाणी लोकांच्या रांगा लागल्या आहेत.

'ईटीव्ही भारत'चे प्रतिनिधी जेव्हा मालवीय नगरमध्ये असणाऱ्या या ढाब्यावर पोहोचले, तेव्हा तिथे शेकडोंच्या संख्येत लोक उपस्थित होते. कित्येक लोक या वृद्ध दाम्पत्यासोबत फोटो काढून घेण्यासाठी आले होते, तर काही लोक त्यांना मदत करण्यासाठी. यासोबतच, या ढाब्यावर खाण्यासाठी येणाऱ्या ग्राहकांची संख्याही बरीच होती.

'बाबा का ढाबा' : व्हायरल व्हिडिओनं पालटलं नशीब; कोणीच जात नव्हते तिथे लागल्या ग्राहकांच्या रांगा

गेल्या ३० वर्षांपासून सुरू आहे ढाबा..

कांता प्रसाद, त्यांची पत्नी बादामी देवी आणि त्यांची दोन मुले मालवीय नगरमध्ये राहतात. गेल्या तीस वर्षांपासून कांता प्रसाद हा ढाबा चालवत आहेत. रोज सकाळी सहाच्या सुमारास कांता प्रसाद आणि त्यांच्या पत्नी ढाब्यावर पोहोचतात. ते आणि त्यांची पत्नी मिळून स्वयंपाक करत असल्यामुळे ढाब्यावरील अन्नालाही घरगुती चव असते. साधीच डाळ, भात, चपाती, भाजी अशा प्रकारचे पदार्थ याठिकाणी मिळतात. घरापासून लांब राहणाऱ्या लोकांसाठी 'घरचं' जेवण मिळण्यासाठीचे हक्काचे ठिकाण म्हणजे बाबा का ढाबा.

लॉकडाऊननंतर ग्राहकांचे येणे झाले बंद..

कांता प्रसाद सांगतात, की लॉकडाऊनपूर्वी याठिकाणी बऱ्यापैकी ग्राहक येत असत. मात्र, लॉकडाऊनमध्ये ढाबा बंदच ठेवावा लागला. त्यानंतर अनलॉकमध्ये ढाबा तर सुरू झाला, मात्र कोरोनाच्या भीतीने ग्राहकांनीच ढाब्याकडे पाठ फिरवली. कित्येक वेळा या दाम्पत्याने बनवलेले अन्न तसेच शिल्लक राहत. कापून ठेवलेल्या भाज्या खराब होत, ज्यामुळे आणखी नुकसान होत. त्या भाज्या टाकून देण्याची वेळ येत.

ढाब्यावर चक्क नेतेही पोहोचले..

सोशल मीडियावर या बाबांचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर भाजप प्रदेश अध्यक्ष आदेश गुप्ता आणि काही भाजप नेत्यांनी या ढाब्याला भेट देत दाम्पत्याची चौकी केली. त्यासोबतच, आप नेते सौरभ भारद्वाजही या ढाब्यावर जाऊन आले. मालवीय नगरचे आप आमदार सोमनाथ भारती यांनीही या दाम्पत्याला मदत करण्याची घोषणा केली आहे.

सोशल मीडियाचे मानले आभार..

कांता प्रसाद यांचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर आता ढाब्यावर ग्राहकांची गर्दी वाढली आहे. जिथे कोणीच येत नाही म्हणून अन्न टाकून द्यावे लागत होते, तिथे आज दुपारी १२च्या आतच सगळा स्वयंपाक संपल्याचे प्रसाद यांनी सांगितले. यासाठी त्यांनी त्या व्यक्तीचे आभार मानले आहेत ज्याने सोशल मीडियावर त्यांचा व्हिडिओ व्हायरल केला. त्यासोबतच त्यांनी त्या सर्वांचे आभार मानले आहेत ज्यांनी त्यांना मदत केली.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.