नवी दिल्ली - देशातील रस्त्यावरील सुरक्षा वाढवण्यासाठी आणि सार्वजनिक वाहतुक क्षेत्रातील त्रुटी दूर करण्यासाठी महत्वाचे असलेले मोटार वाहन विधेयक कायदा 2019 लोकसभेत मंजुर करण्यात आले आहे.
केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी लोकसभेत मंगळवारी मोटार वाहन विधेयक 2019 चे महत्व समजावून सांगितले. यानंतर, आवाजी मतदानाने विधेयक मंजूर करण्यात आले.
गडकरी म्हणाले, ड्रायव्हरने दारू पिलेली असल्यास गाडी चालणार नाही, अशी सिस्टीम आहे. यासोबतच, गाडीचे सीटबेल्ट न लावता कोणी गाडी चालवत असेल तर, पोलिसांना याबाबत माहिती मिळणार आहे. यामुळे चालकांना वाहतुकीचे नियम पाळावे लागणार आहेत. विधेयकाचे रुपांतर कायद्यात झाल्यानंतर वाहतुकीच्या दूर्घटनांमध्ये घट होणार आहे.