नवी दिल्ली - बसप अध्यक्ष मायावती, सप अध्यक्ष अखिलेश यादव आणि रालोदचे चौधरी अजित सिंह यांची पहिली सामायिक रॅली सहारनपूर येथील देवबंदमध्ये झाली. येथे त्यांनी भाजप आणि काँग्रेस या पक्षांवर जोरदार टीका केली. तसेच, ईव्हीएममध्ये गडबड न झाल्यास सप-बसपच्या युतीचेच सरकार येईल, असे मायावती म्हणाल्या.
'आता येथून भाजप सरकार जाणार आहे. सप-बसपचे युती सरकार येणार आहे. काँग्रेस सध्या भाजपला टक्कर देऊ शकत नाही. केवळ युती सरकारच भाजपला टक्कर देऊ शकते, ही बाब काँग्रेसलाही माहिती आहे. मात्र, काँग्रेसची चाल उलटी आहे. 'आम्ही निवडून येवो किंवा न येवो; मात्र, हे युती सरकार निवडून येऊ नये,' अशी काँग्रेसची इच्छा आहे,' असा आरोप मायावतींनी केला आहे. 'मी मुस्लीम समाजाला सतर्कतेचा इशारा देत आहे. तुमच्या मतांचे विभाजन होऊ देऊ नका,' असे त्या म्हणाल्या.
'काँग्रेसने काही विशिष्ट जाती आणि धर्मांतील उमेदवार निवडणूकीसाठी उभे केले आहेत. याचा फायदा भाजपला होईल. त्यामुळे मी मुस्लीम समाजाच्या सदस्यांना इशारा देऊ इच्छिते,' असे मायावतींनी म्हटले आहे. 'पंतप्रधान मोदींनी सरकारी तिजोरीला लुटले आहे. 'अच्छे दिन'चे वचन देऊन लोकांची दिशाभूल केली आहे. आता भाजपचे कोणतेही नाटक चालणार नाही. आज मोदींनी इथली गर्दी पाहिली तर ते घाबरून जातील. काँग्रेसही त्यांच्या चुकीमुळेच हरले आहेत. भाजप आणि काँग्रेसला केवळ निवडणुकांच्या वेळेसच गरिबांची आठवण होते. 'सबका साथ-सबका विकास' ही फक्त जुमलेबाजी आहे. काँग्रेसच्या ७२ हजार रुपये देण्याच्या योजनेतही गरीबच निशाण्यावर आहेत. याधीच्या सरकारने देखील गरिबांची चेष्टा केली होती,' असे आरोप त्यांनी केले आहेत.
सपचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी भाजप आणि काँग्रेसवर हल्ला केला. 'काँग्रेस आणि भाजपमध्ये फारसा फरक नाही. त्यांच्या धोरणांकडे लक्ष दिले तर, तुमच्या लक्षात येईल. केवळ महायुतीच देशात मोठा बदल घडवून आणू शकते. मात्र, काँग्रेसला तसे करण्याची इच्छा नाही. त्यांना उत्तर प्रदेशात स्वतःचेच सरकार यावे, असे वाटते,' असे अखिलेश म्हणाले. 'ही भेसळीची नाही तर महापरिवर्तनाची युती आहे. एका-एका चौकीदाराची चौकी त्यांच्याकडून काढून घेऊ,' असे ते म्हणाले.
तुमच्या मतांचे विभाजन होऊ देऊ नका, देवबंदमध्ये मायावतींचा मुस्लिमांना सतर्कतेचा इशारा - deoband
'भाजप सरकार जाऊन सप-बसपचे युती सरकार येणार आहे. काँग्रेस सध्या भाजपला टक्कर देऊ शकत नाही. केवळ युती सरकारच भाजपला टक्कर देऊ शकते, ही बाब काँग्रेसलाही माहिती आहे. मात्र, 'आम्ही निवडून येवो किंवा न येवो; हे युती सरकार निवडून येऊ नये,' अशी काँग्रेसची इच्छा आहे,' असा आरोप मायावतींनी केला आहे.
नवी दिल्ली - बसप अध्यक्ष मायावती, सप अध्यक्ष अखिलेश यादव आणि रालोदचे चौधरी अजित सिंह यांची पहिली सामायिक रॅली सहारनपूर येथील देवबंदमध्ये झाली. येथे त्यांनी भाजप आणि काँग्रेस या पक्षांवर जोरदार टीका केली. तसेच, ईव्हीएममध्ये गडबड न झाल्यास सप-बसपच्या युतीचेच सरकार येईल, असे मायावती म्हणाल्या.
'आता येथून भाजप सरकार जाणार आहे. सप-बसपचे युती सरकार येणार आहे. काँग्रेस सध्या भाजपला टक्कर देऊ शकत नाही. केवळ युती सरकारच भाजपला टक्कर देऊ शकते, ही बाब काँग्रेसलाही माहिती आहे. मात्र, काँग्रेसची चाल उलटी आहे. 'आम्ही निवडून येवो किंवा न येवो; मात्र, हे युती सरकार निवडून येऊ नये,' अशी काँग्रेसची इच्छा आहे,' असा आरोप मायावतींनी केला आहे. 'मी मुस्लीम समाजाला सतर्कतेचा इशारा देत आहे. तुमच्या मतांचे विभाजन होऊ देऊ नका,' असे त्या म्हणाल्या.
'काँग्रेसने काही विशिष्ट जाती आणि धर्मांतील उमेदवार निवडणूकीसाठी उभे केले आहेत. याचा फायदा भाजपला होईल. त्यामुळे मी मुस्लीम समाजाच्या सदस्यांना इशारा देऊ इच्छिते,' असे मायावतींनी म्हटले आहे. 'पंतप्रधान मोदींनी सरकारी तिजोरीला लुटले आहे. 'अच्छे दिन'चे वचन देऊन लोकांची दिशाभूल केली आहे. आता भाजपचे कोणतेही नाटक चालणार नाही. आज मोदींनी इथली गर्दी पाहिली तर ते घाबरून जातील. काँग्रेसही त्यांच्या चुकीमुळेच हरले आहेत. भाजप आणि काँग्रेसला केवळ निवडणुकांच्या वेळेसच गरिबांची आठवण होते. 'सबका साथ-सबका विकास' ही फक्त जुमलेबाजी आहे. काँग्रेसच्या ७२ हजार रुपये देण्याच्या योजनेतही गरीबच निशाण्यावर आहेत. याधीच्या सरकारने देखील गरिबांची चेष्टा केली होती,' असे आरोप त्यांनी केले आहेत.
सपचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी भाजप आणि काँग्रेसवर हल्ला केला. 'काँग्रेस आणि भाजपमध्ये फारसा फरक नाही. त्यांच्या धोरणांकडे लक्ष दिले तर, तुमच्या लक्षात येईल. केवळ महायुतीच देशात मोठा बदल घडवून आणू शकते. मात्र, काँग्रेसला तसे करण्याची इच्छा नाही. त्यांना उत्तर प्रदेशात स्वतःचेच सरकार यावे, असे वाटते,' असे अखिलेश म्हणाले. 'ही भेसळीची नाही तर महापरिवर्तनाची युती आहे. एका-एका चौकीदाराची चौकी त्यांच्याकडून काढून घेऊ,' असे ते म्हणाले.
तुमच्या मतांचे विभाजन होऊ देऊ नका, देवबंदमध्ये मायावतींचा मुस्लिमांना इशारा

Conclusion: