नवी दिल्ली - संसदेच्या दोन्ही सभागृहांचे कामकाज हे दुपारी २ वाजेपर्यंत तहकूब करण्यात आले आहे. महाराष्ट्राच्या मुद्द्यावरून काँग्रेस, सीपीएम, आययुएमएल, टीएमसी अशा सर्व पक्षांनी दिलेले अॅडजर्नमेंट लेटर आणि विरोधकांनी घातलेला गोंधळ पाहता हा निर्णय घेण्यात आला.
-
#UPDATE Lok Sabha adjourned till 2pm
— ANI (@ANI) November 25, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">#UPDATE Lok Sabha adjourned till 2pm
— ANI (@ANI) November 25, 2019#UPDATE Lok Sabha adjourned till 2pm
— ANI (@ANI) November 25, 2019
काँग्रेसच्या संसदीय धोरण समितीची बैठक आज (सोमवार) सकाळी पार पडली. काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या दिल्लीतील निवासस्थानी ही बैठक झाली. या बैठकीमध्ये महाराष्ट्रातील राजकारणाबाबत चर्चा करण्यात आली होती. हा मुद्दा संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये गांभीर्याने मांडण्याचा या बैठकीत निर्णय घेण्यात आला होता.
त्यानंतर काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली संसदेमध्ये काँग्रेसकडून आंदोलन करण्यात आले. यावेळी संविधानाची हत्या थांबवा, लोकशाहीची हत्या थांबवा, पंतप्रधान उत्तर द्या, अशा घोषणा देण्यात आल्या.
राष्ट्रवादी, काँग्रेस आणि शिवसेना यांच्या महाविकासआघाडीने महाराष्ट्रात सत्ता स्थापन करण्यासाठी हलचाली सुरू होत्या. मात्र, शनिवार ( दि. 23 नोव्हेंबर) सकाळी अचानक भाजपचे देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री पदाची तर राष्ट्रवादीच्या अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली होती. यावर देशभरातून विविध प्रतिक्रिया उमटल्या. त्यानंतर राष्ट्रवादी, काँग्रेस आणि शिवसेना संयुक्त याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल केली होती. त्यावरील निर्णय सर्वोच्च न्यायालयाने राखून ठेवला आहे. उद्या हा निर्णय जाहीर करण्यात येणार आहे.
हेही वाचा : लोकशाहीची हत्या थांबवा, काँग्रसचे संसदेत आंदोलन