जयपूर - राजस्थानच्या जालोर जिल्ह्यामध्ये टोळधाडीमुळे लाखो हेक्टर शेतीतील पिकांचे नुकसान झाले आहे. प्रशासनाने याकडे लक्ष देणे टाळल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.
डिसेंबर महिन्यापासून जिल्ह्यात टोळधाडीने थैमान घातले आहे. आतापर्यंत 300 हून अधिक गावांतील लाखो हेक्टरवरील पिकांचे नुकसान टोळधाडीतील या नाकतोड्यांमुळे झाला आहे. येथील पाच विधानसभा क्षेत्रातील 300 हून अधिक गावांतील शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. त्यामध्ये सांचौर आणि चितलवानामध्ये सर्वाधिक पिकांचे नुकसान झाले आहेत.
प्रशासनाचे बचावकार्य अयशस्वी, शेतकऱ्यांचे मोठे नुकसान
टोळधाडीपासून पिकांचे बचाव व्हावे, यासाठी प्रशासनाने बचावकार्य सुरू केले होते. पण, तेही अयशस्वी झाल्याने यामुळे पिकांच्या नुकसानीचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहेत.
हेही वाचा - सरसेनाध्यक्षांना पारंपरिक व्यवस्थेत काम करण्यासाठी सहकार्याची गरज