ETV Bharat / bharat

लॉकडाऊन : पंतप्रधान मोदी सर्व राज्याच्या मुख्यमंत्र्यांशी उद्या साधणार संवाद - Interaction witH CM

अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी आणखी उद्योगधंदे सुरू करण्यात येणार असून कंन्टेन्मेंट भागात कोरोनाला कसा आवर घालायचा यावर चर्चा करण्यात येणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली.

file pic
संग्रहित छायाचित्र
author img

By

Published : May 10, 2020, 6:38 PM IST

नवी दिल्ली - देशात कोरोनाग्रस्तांचा आकडा ६० हजारांच्या पुढे गेला आहे. अनेक राज्यात कोरोनाचे रुग्ण वाढतच आहेत. तर ४० पेक्षा जास्त दिवसांपासून देशात लॉकडाऊन सुरू आहे. अर्थव्यवस्थाही कमकुवत होत चालली आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या (सोमवार) ३ वाजता सर्व राज्याच्या मुख्यमंत्र्यांशी संवाद साधणार आहेत. लॉकडाऊनमधुन बाहेर पडण्यासाठी काय उपाययोजना राबवाव्यात यासंबंधी चर्चा होणार आहे. तसेच राज्यांतील कोरोनाच्या परिस्थितीचा आढावा घेण्यात येणार आहे.

उद्या व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे पंतप्रधान मोदी मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार आहेत, ही माहिती पंतप्रधान कार्यालयाने ट्विटरवरून दिली आहे. लॉकडाऊन झाल्यापासून पंतप्रधान मोदी पाचव्यांदा पंतप्रधान मोदींशी चर्चा करणार आहेत. अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी आणखी उद्योगधंदे सुरू करण्यात येणार असून कन्टेन्मेंट भागात कोरोनाला कसा आवर घालायचा यावर चर्चा करण्यात येणार असल्याचे सुत्रांनी सांगितले.

आज केंद्रीय कॅबिनेट सचिव राजीव गऊबा यांनी सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशातील मुख्य सचिव आणि आरोग्य सचिवांशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठक घेतली. त्यानंतर मोदी मुख्यमंत्र्याशी चर्चा करणार असल्याचा निर्णय घेण्यात आला. कोरोनापासून नागरिकांचे संरक्षण करत असतानाच राज्यातील आर्थिक व्यवहारही सुरू कले जावेत, असे मत राज्याच्या सचिवांनी केंद्रीय सचिवांकडे मांडले.

२४ मार्चला देशात पहिल्यांदा लॉकडाऊन जाहीर करण्यात आला, त्यानंतर दोनदा म्हणजे १७ मेपर्यंत लॉकडाऊन वाढविण्यात आला आहे. ग्रीन भागामध्ये आणखी सूट देण्यात येणार असून कोरोना कन्टेन्मेंट आणि हॉटस्पॉटमधील नियमांमध्ये काहीही बदल होणार नाहीत, असे सुत्रांनी सांगितले.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.