छत्तीसगड - छत्तीसगड राज्यातील नक्षलवादी भागात नव्या पोलीस छावणी विरोधात काल (मंगळवारी) स्थानिक नागरिकांनी आंदोलन पुकारले. दंतेवाडा जिल्ह्यातील पोटाली गावातील नागरिकांनी पोलीस छावणीला घेराव घालण्याचा प्रयत्न केला. यावेळी अश्रुधुराच्या कांड्या वापरुन जमावाला पांगवण्यात आले.
दंतेवाडा जिल्हा नक्षलवादाने ग्रासलेला आहे. या भागात अनेक जहाल नक्षलवादी राहतात. यामध्ये आमदार भीमा मंडावी यांची हत्या करणारे नक्षली देखील आहेत. त्यांनीच स्थानिक नागरिकांना आंदोलन करण्यासाठी उपसवले. त्यामुळे नक्षलवाद्यांच्या दबावाखाली येऊन नागरिकांनी आंदोलन पुकारले, असे दंतेवाडाचे पोलीस अधिक्षक अभिषेक पल्लव यांनी सांगितले.
-
SP Dantewada, Abhishek Pallava: They were agitated&trying to 'gherao' the camp under pressure by naxals. Police used tear gas to disperse them. Many naxals, including those involved MLA Bhima Mandavi's murder, live in this area. They might have instigated them to protest. (12.11) https://t.co/8oAPEUyCJV pic.twitter.com/yxCxv2Q8Kd
— ANI (@ANI) November 13, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">SP Dantewada, Abhishek Pallava: They were agitated&trying to 'gherao' the camp under pressure by naxals. Police used tear gas to disperse them. Many naxals, including those involved MLA Bhima Mandavi's murder, live in this area. They might have instigated them to protest. (12.11) https://t.co/8oAPEUyCJV pic.twitter.com/yxCxv2Q8Kd
— ANI (@ANI) November 13, 2019SP Dantewada, Abhishek Pallava: They were agitated&trying to 'gherao' the camp under pressure by naxals. Police used tear gas to disperse them. Many naxals, including those involved MLA Bhima Mandavi's murder, live in this area. They might have instigated them to protest. (12.11) https://t.co/8oAPEUyCJV pic.twitter.com/yxCxv2Q8Kd
— ANI (@ANI) November 13, 2019
या आंदोलनाचा एक व्हिडिओ समोर आला आहे. यामध्ये नागरिक आक्रमकपणे पोलीस छावणीकडे येताना दिसत आहेत. पोलीस अडवण्याचा प्रयत्न केला असताना देखील नागरिक त्वेषाने छावणीच्या दिशेने येताना दिसत आहेत. आंदोलकांमध्ये महिलांची संख्याही लक्षणीय होती.