कोलकाता (पश्चिम बंगाल) - अलीपूरदार जिल्ह्यामध्ये पोलिसांनी 15 लाख रुपयांचे बेकायदेशीर सिगारेटचे बॉक्स जप्त केले आहेत. भारत-भुटान सिमेवर जायगाव या भागात एका कंटेनरमधून बेकायदेशीर सिगारेटची वाहतूक होत असल्याची माहिती पश्चिम बंगाल पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून आरोपींना अटक केली आणि सिगारेटचे बॉक्स जप्त केले.
सिगारेटचे बॉक्स भुटानला नेले जात असल्याचा पोलिसांना संशय आहे.