ETV Bharat / bharat

लॉकडाऊन काळात जगण्याचा संघर्ष, बंगालच्या राभा समाजातील महिला करताहेत परिस्थिती बरोबर दोन हात

पश्चिम बंगालच्या अलीपुरद्वार जिल्ह्यातील राभा आदिवासी समाजातील काही मजूर हे कामानिमित्त परराज्यात गेले. मात्र, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे त्यांचा घरी परतण्याचा मार्ग सध्या बंद झाला आहे. अशा परिस्थित कुटुंबाची जबाबदारी ही महिलांवर येऊन ठेपली आहे. काम बंद असल्याने घरात अन्न नाही, अशात परिस्थितीत या महिला आपल्या पतींची वाट पाहत आहेत. तसेच हा लॉकडाऊनचा काळ लवकरच निघून परिस्थित आधीसारखी होईल या अपेक्षेत या महिला सध्या कुटुंबासाठी धडपडत आहेत

author img

By

Published : May 11, 2020, 3:30 PM IST

लॉकडाऊन काळात जगण्याचा संघर्षाची कहाणी
लॉकडाऊन काळात जगण्याचा संघर्षाची कहाणी

अलीपूरद्वार - पश्चिम बंगालच्या अलीपूरद्वार जिल्ह्यातील राभा आदिवासी समाजातील महिला कोरोनासारख्या महामारीच्या काळात करण्यात आलेल्या लॉकडाऊनच्या परिस्थिती बरोबर दोन हात करत आहेत. या महिलांचे पती हे कामानिमित्त परराज्यात गेले असून लॉकडाऊनच्या काळात तिथेच अडकून पडल्याने या महिलांवर आता कुटुंबाची जबाबदारी येऊन ठेपली आहे. घरात पैसे आणि अन्न शिल्लक नसल्यामुळे या गरीब स्त्रियांवर कुटुंबाचे पोट भरण्याची जबाबदारी येऊन पडली आहे. हे लॉकडाऊन लवकर संपेल आणि त्यांचे पती परत येतील, या आशेसह या महिला पोरोबस्ती बस स्थानकाकडे बघत एक-एक दिवस काढत आहेत.

लॉकडाऊन काळात जगण्याचा संघर्ष

या गावातील सर्व पुरुष हे केरळ, तामिळनाडू आणि आंध्र प्रदेश येथे कामानिमित्त गेले होते. मात्र, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे ते तिथेच अडकून पडले आहेत. गेल्या 45 दिवसांपासून बेरोजगार असलेले हे परप्रांतीय मजूर त्यांच्या २९ कुटुंबियांना या संकटकाळात मदत मिळेल या अपेक्षेने त्यांचे वेतन घरी पाठविण्यासाठी संघर्ष करत आहेत. या नागरिकांना जीवनउपयोगी वस्तूंसाठी अलीपूरद्वार जिल्हा आणि बक्सा अभयारण्यादरम्यान १५ किमीचे अंतर कापावे लागते. शासनाने या नागरिकांसाठी अन्नधान्याची व्यवस्था केली होती. मात्र, हे साधन अपुरे पडल्याने या महिलांना कुटुंबियांचे पोट भरण्यासाठी आपला जीव धोक्यात घालून जंगलातून पायपीट करावी लागत आहे.

याबाबत 'ईटीव्ही भारत'शी बोलताना पोरोबस्ती गावात राहणाऱ्या रुपालीने तिचा अनुभव सांगितला. ती म्हणाली, माझे पती काही महिन्यांपूर्वी केरळ येथे गवंडी म्हणून काम करण्यासाठी गेले होते. मात्र, तेथे त्यांना काहीच काम मिळाले नाही. तर, दुसरीकडे लॉकडाऊन झाल्यामुळे ते सध्या परतही येऊ शकत नाहीत. अशा या परिस्थितीत पैसे आणि इतर साधनांअभावी आमच्यावर उपासमारीची वेळ येऊन ठेपली आहे. आम्ही जंगलातून शक्य होईल त्या वस्तू एकत्रीत करून आपल्या मुलांचा, कुटुंबाचा उदरनिर्वाह करत आहोत. मात्र, हे सर्व एखाद्या वाईट स्वप्नासारखे आहे, असे ती म्हणाली. तर, आणखी एका महिलेने सांगितले, माझा नवरा आणि मुलगा हे कामानिमित्त केरळला गेले होते. मात्र, लॉकडाऊनमुळे तिथेच अडकले. माझ्या मुलाला घरी परत यायचे आहे, मला भेटायचे आहे. मात्र, परत कसे यायचे याबाबत काहीच माहित नाही. मला नाही माहित पुढे काय होणार आहे. ते कसे परत येतील, सध्या मी यावर विचार करणेच सोडून दिले आहे.

गावातील काही महिला या गर्भवती असल्याचे एका गावकऱ्याने सांगितले. मात्र, अशा अवस्थेत त्यांच्याकडे कुठल्याही सोयीसुविधा किंवा साधन उपलब्ध नाहीत. त्यांना अशा परिस्थितीत गरज पडल्यास रुग्णालय किंवा औषधांचीही सोय होईल, अशीही परिस्थिती सध्या नाही. मात्र, यावर बोलताना हा विषय लक्षात येताच आपण गटविकास अधिकाऱ्यांना याकडे लक्ष देऊन आवश्यक त्या सुविधा पुरवण्याच्या सुचना दिल्याचे अलीपूद्वारचे जिल्हा दंडाधिकारी सुरेंद्रकुमार मीना यांनी सांगितले. मात्र, लॉकडाऊनच्या या संकटकाळात दुरवर जंगलात राहणाऱ्या या महिला घरातील पुरुष नसताना कशाप्रकारे मदत मिळेल. या त्रासातून कधी मुक्ती मिळेल, या प्रतिक्षेत आहेत. हा लॉकडाऊनचा काळ संपून लवकरच त्यांचे पती घरी येतील आणि त्यांचा भार कमी होईल या आशेत परिस्थितीशी झगडत त्या लढा देत आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.