कर्नाटक - कर्नाटकमधील दोन विधानसभा पोटनिवडणुकीचे निकाल जाहीर झाले आहेत. या दोन्ही जागांवर भाजप विजयी झाले आहे. आरआर नगर आणि सिरा या मतदारसंघामध्ये भाजपने कबजा केला आहे.
नऊ राज्यांमधील पोटनिवडणुकांच्या निकालाचे LIVE Updates; वाचा एका क्लिकवर - by election upsc
22:37 November 10
उत्तर प्रदेशात भाजपने सहा तर समाजवादी पक्षाने जिंकली १ जागा
21:11 November 10
गुजरात पोटनिवडणुकीत आठही जागांवर भाजपाचा विजय
20:06 November 10
मध्यप्रदेशात भाजपाचा १८ जागांवर तर काँग्रेसचा ७ जागांवर विजय
18:49 November 10
कर्नाटक विधानसभा पोटनिवडणूक निकाल - भाजप दोन्ही जागांवर विजयी
18:45 November 10
मध्यप्रदेशात सत्ता राखण्यात भाजपाला यश
मध्यप्रदेशात सत्ता राखण्यात भाजपाला यश आले आहे. बहुमसाठी भाजपाला आठ जागांची गरज होती. आत्तापर्यंत भाजपने ९ जागांवर विजय मिळवला आहे. तर काँग्रेसने दोन जागांवर बाजी मारली आहे. सत्ता स्थापन करण्याचे काँग्रेसचे स्वप्न भंग पावले आहे. सोबतच सोळा जागांवर भाजपचे उमेदवार आघाडीवर आहेत.
18:23 November 10
बिहार निवडणूक; एमआयएम पक्षाचे पाच उमेदवार विजयी...खालील उमेदवारांनी मारली बाजी
- मोहनिया या सुरक्षित मतदारसंघात राजदच्या संगीता देवी जिंकल्या
- बलरामपूर मतदारसंघात माले उमेदवार महबूब आलम विजयी
- आलमनगर मतदारसंघात जदयूचे उमेदवार नारायण यादव जिंकले
- बरुराज मतदारसंघात भाजपचे अरूण कुमारसिंह विजयी
- मीनापूर मतदारसंघात राजद उमेदवार राजीव कुमार जिंकले
- मुजफ्फपूर मतदारसंघात काँग्रेस उमेदवार विजेंन्द्र चौधरी जिंकले
- पारो मतदारसंघात भाजपचे अशोक कुमार सिंह जिंकले
- साहेबगंज मतदारसंघात वीआईपी उमेदवार राजू कुमार सिंह जिंकले
- सकरा या सुरक्षित मतदारसंघात जदयूचे अशोक कुमार चौधरी विजयी
- बगहा मतदारसंघात भाजपचे राम सिंह विजयी
- बेतिया मतदारसंघात भाजपच्या राणी देवी जिंकल्या
- चनपटिया मतदारसंघात भाजपचे उमाकांत सिंह विजयी
- लौरिया मतदारसंघात भाजपचे विनय बिहारी जिंकले
- नरकटियागंज मतदारसंघात भाजपच्या रश्मी वर्मा जिंकल्या
- नौतन मतदारसंघात भाजपचे नारायण प्रसाद विजयी
- रामनगर मतदारसंघात भाजपच्या भागीरथी देवी जिंकल्या
- वाल्मिकी नगर मतदारसंघात जदयूचे धीरेन्द्र प्रताप सिंह विजयी
- बख्तियारपूर मतदारसंघात राजदचे अनिरूद्ध कुमार जिंकले
- दीघा मतदारसंघात भाजपचे संजीव चौरसिया जिंकले
18:22 November 10
बिहार निवडणूक : निवडणूक आयोगाने 14 जागांवरचे निकाल केले जाहीर
बिहार विधानसभा निवडणुकीच्या 14 जागांचे निकाल निवडणूक आयोगाने जाहीर केले आहेत. यात भाजपने 6, आरजेडी 2 आणि जेडी(यु) 2, काँग्रेस 1 तर विकासशील इंसान पार्टी 2 जागेवर विजयी झाले आहेत.
17:49 November 10
बिहार निवडणूक : निवडणूक आयोगाने 9 जागांवरचे निकाल केले जाहीर
- बिहार विधानसभा निवडणुकीच्या 9 जागांचे निकाल निवडणूक आयोगाने जाहीर केले आहेत. यात भाजपने तीन, आरजेडी 2 आणि जेडी(यु) 2, काँग्रेस 1 तर विकासशील इंसान पार्टी एक जागेवर विजयी झाले आहेत.
- 126 जागांवर भाजप आघाडीवर आहेत.
- 107 जागांवर महागठबंधन आघाडीवर
- 5 जागांवर एआयएमआयएम
- 2 जागांवर बीएसपी आघाडीवर
16:08 November 10
तीन वाजेपर्यंत कर्नाटक विधानसभा पोटनिवडणूक अपडेट
कर्नाटकमधील दोन्ही विधानसभा पोटनिवडणूक जागांवर तीन वाजेपर्यंत भाजप आघाडीवर आहे.
15:41 November 10
तीन वाजेपर्यंत बिहार निवडणुकांचे अपडेट
एनडीए - 128 जागांवर आघाडी, BJP - 73, JDU - 49, VIP - 5, HAM - 1
महागठबंधन - 105 जागांवर आघाडी, BSP - 2, AIMIM - 2, LJP - 2 & अपक्ष - 4
14:07 November 10
उत्तर प्रदेश: बांगरमऊमध्ये भाजपाचे उमेदवार श्रीकांत कटियार विजयी
उन्नावमधील बांगरमऊ विधानसभेच्या जागेवर भाजपाचे उमेदवार श्रीकांत कटियार यांनी बाजी मारली आहे. त्यांनी समाजवादी पक्षाचे सुरेश पाल, बहुजन समाज पक्षाचे महेश पाल आणि कॉंग्रेसच्या आरती बाजपेयी यांचा पराभव केला आहे.
14:04 November 10
झारखंड: बेरमोमध्ये कॉंग्रेस आणि दुमकामध्ये भाजप आघाडीवर
झारखंडमध्ये भाजप आणि कॉंग्रेस एका-एका जागेवर आघाडीवर आहेत. दुमका येथील उमेदवार लुईस मरांडी 1234 मतांनी पुढे आहेत. बेरमो येथील कॉंग्रेसचे उमेदवार कुमार जयमंगल सिंग 12754 मतांनी पुढे होते.
13:55 November 10
उत्तर प्रदेश - देवरियामध्ये मतमोजणीच्या वेळी गोंधळ; दोन बूथवर उघडली एकाच क्रमांकाची मशीन
दोन बूथवर एकाच क्रमांकाची मशीन उघडल्यामुळे देवरियामध्ये मतमोजणीच्या वेळी गोंधळ झाला. महाराजा अग्रसेन इंटर कॉलेजच्या बूथ 9 आणि 10 मध्ये 166 क्रमांकाची ईव्हीएम मशीन उघडण्यात आली.
13:48 November 10
'या' राज्यात भाजपाची आघाडी
मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, गुजरात, कर्नाटक, तेलंगणा आणि झारखंड, मणिपूरमध्ये भाजप आघाडीवर आहे.
झारखंड, छत्तीसगडमध्येही कॉंग्रेस आपली आघाडी कायम ठेवत आहे. याशिवाय नागालँडच्या दोन जागांपैकी एका अपक्ष तर एका जागेवर राष्ट्रीय डेमोक्रेटिक प्रोग्रेसिव पार्टी आघाडीवर आहेत.
13:38 November 10
मणिपूर: दोन जागांवर भाजपाचा विजय तर एका जागेवर अपक्ष उमेदवार विजयी
मणिपूरमध्ये दोन जागांवर भाजपाचा विजय तर एका जागेवर अपक्ष उमेदवार विजयी झाला आहे. इतर दोन जागांवर भाजपाने आघाडी घेतली आहे.
13:29 November 10
उत्तर प्रदेश: भाजपाची 5 जागांवर आघाडी
भाजपाने पाच जागांवर आघाडी घेतली आहे. एका जागेवर समाजवादी पार्टी आणि एका जागेवर अपक्ष उमेदवाराने आघाडी घेतली आहे.
13:16 November 10
मणिपूर: दोन जागांवर भाजपाचा विजय
राज्यातील पोटनिवडणुकीत पाच जागांपैकी दोन जागा भाजपाने जिंकल्या आहेत. अजून मतमोजणी सुरू आहे. दरम्यान, भाजपा 2 जागांवर आघाडीवर आहे. तसेच एका जागेवर अपक्ष उमेदवार आघाडीवर आहे.
13:06 November 10
तेलंगणा: सात फेऱ्यांच्या मतमोजणीनंतर भाजपा आघाडीवर
तेलंगणात दुब्बक विधानसभा पोटनिवडणूक मतमोजणीच्या सात फेऱ्या पूर्ण झाल्या आहेत. भाजपाने सत्ताधारी टीआरएसवर आघाडी कायम राखली आहे. भाजपचे उमेदवार एम. रघुनंदन राव यांनी टीआरएस प्रतिस्पर्धी सोलिपेता सुजाता यांच्यावर 2,485 मतांनी आघाडी घेतली.
12:48 November 10
कर्नाटकमध्ये भाजपा आघाडीवर; भाजपा नेत्यांनी व्यक्त केला आनंद
कर्नाटकमध्ये भाजपा दोन्ही जागांवर आघाडीवर आहे. दरम्यान, मुख्यमंत्री बी एस येडियुरप्पा, राज्याचे मंत्री बी श्रीरामुलू, आर अशोक, बसवराज बोम्माई आणि भाजपाचे अन्य नेते यांनी मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी आनंद व्यक्त केला.
12:45 November 10
मणिपूर: एका जागेवर भाजपाचा विजय,तर तीन जागांवर आघाडी
राज्यात पोटनिवडणुकीत पाच जागांपैकी एक जागा भाजपाने जिंकली आहे. अजून मतमोजणी सुरू आहे. दरम्यान, भाजपाने तीन जागांवर आघाडी घेतली आहे. तसेच एका जागेवर अपक्ष उमेदवार आघाडीवर आहे.
12:17 November 10
कर्नाटकमध्ये भाजपा आघाडीवर
कर्नाटकमध्ये राजाराजेश्वरी नगर आणि तुमकुरु येथील सिरा विधानसभा जागांवर मतमोजणीच्या अनुक्रमे आठव्या आणि पाचव्या फेरीनंतर भाजपा आघाडीवर आहेत. आर आर नगरमध्ये भाजपाचे एन मुनिरत्न प्रतिस्पर्धी कॉंग्रेस उमेदवार एच. कुसुमा यांच्यापेक्षा सुमारे 22,000 मतांनी आघाडीवर आहेत.
12:01 November 10
ओडिशा: दोन विधानसभा जागांवर बिजू जनता दल आघाडीवर
निवडणूक आयोगाच्या म्हणण्यानुसार ओडिशाच्या दोन विधानसभा जागांवर बिजू जनता दल आघाडीवर आहे
11:44 November 10
छत्तीसगडमध्ये कॉंग्रेस आघाडीवर
छत्तीसगड विधानसभेच्या एका जागेच्या पोटनिवडणुकीत कॉंग्रेस आघाडीवर आहे.
11:32 November 10
उत्तर प्रदेशमध्ये पाच जागांवर भाजप आघाडीवर
उत्तर प्रदेशच्या सात विधानसभा जागांसाठी आज मतमोजणी होत आहे. यात पाच जागांवर भाजप, एका जागेवर समाजवादी पार्टी आणि एका जागेवर अपक्ष उमेदवार आघाडीवर आहेत. अपक्ष उमेदवार धनंजय सिंह मल्हनी जागेवर आघाडीवर आहेत. नौगाव सदात या जागेवर समाजवादी पार्टी आघाडीवर आहे. तसेच देवरिया सदर, बुलंदशहर, बांगरमऊ, घाटमपूर आणि तुंडला येथे भारतीय जनता पक्ष आघाडीवर आहे.
11:22 November 10
नागालँड: अपक्ष उमेदवार आघाडीवर
नागालँडच्या दक्षिण अंगामी -१ आणि पुंगारो किफाइर विधानसभा जागांवर मतमोजणी सुरू आहे. मतमोजणीनुसार अपक्ष उमेदवार आघाडीवर आहेत.
11:20 November 10
तेलंगणात भाजप आघाडीवर
तेलंगणाच्या दुब्बक विधानसभा पोटनिवडणुकीच्या मतमोजणीनुसार भाजप आघाडीवर आहे.
11:16 November 10
छत्तीसगड : चौथ्या फेरीतही कॉंग्रेसचे डॉ. के के ध्रुव आघाडीवर
चौथ्या फेरीतही कॉंग्रेसचे उमेदवार के के ध्रुव आघाडीवर
चौथ्या फेरीत कॉंग्रेसचे डॉ. के के ध्रुव यांना 4,993 मते, 3,282 मतांनी आघाडीवर
भाजपचे गंभीर सिंह यांना 1,711 मते.
11:08 November 10
हरियाणा: चौथ्या फेरीची मतमोजणी पूर्ण, कॉंग्रेस 2843 मतांनी आघाडीवर
बरोदा: चौथ्या फेरीची मतमोजणी पूर्ण झाली आहे. चौथ्या फेरीनंतर कॉंग्रेस 2843 मतांनी आघाडीवर आहे. आतापर्यंत कॉंग्रेसला 11504 मते मिळाली आहेत. तर भाजपला 8661 मते मिळाली आहेत. त्याचबरोबर, इनॅलोला आतापर्यंत 1137 मते मिळाली आहेत. याशिवाय राजकुमार सैनी यांना 1280 मते मिळाली आहेत.
11:06 November 10
हरियाणा: तिसर्या फेरीनंतर कॉंग्रेस 2049 मतांनी पुढे
बरोदा पोटनिवडणूक: तिसर्या फेरीनंतर कॉंग्रेस 2049 मतांनी पुढे
तिसर्या फेरीनंतर कॉंग्रेस 2049 मतांनी आघाडीवर आहे. कॉंग्रेसकडे आतापर्यंत 8708 मते आहेत. त्याशिवाय आतापर्यंत भाजपला 6659 मते मिळाली आहेत. त्याचबरोबर राजकुमार सैनी यांना आतापर्यंत 1100 मते मिळाली असून इनॅलोला 991 मते मिळाली आहेत.
11:02 November 10
हरियाणा: बरोदा पोटनिवडणूकीत 622 कॉंग्रेस मतांनी पुढे
दुसर्या फेरीनंतर कॉंग्रेस 5322 मतांनी आघाडीवर आहे. तसेच दुसर्या फेरीनंतर भाजपाला 4660 मते मिळाली. तर इनॅलोला 701 मते मिळाली आणि एलएसपीचे राजकुमार सैनी यांना 899 मते मिळाली.
10:59 November 10
हरियाणा: बरोदा विधानसभा मतदारसंघातून कॉंग्रेसचे उमेदवार इंदू राज आघाडीवर
हरियाणा येथील बरोदा विधानसभा मतदारसंघातून कॉंग्रेसचे उमेदवार इंदू राज आघाडीवर भाजपाचे योगेश्वर दत्त पिछाडीवर
10:50 November 10
नागालँड: 2 अपक्ष उमेदवार आघाडीवर
नागालँडमध्ये 2 जागांसाठी पोटनिवडणूक होत आहे. यामध्ये दोन्ही अपक्ष उमेदवार आघाडीवर आहेत.
10:36 November 10
मणिपूर: पाच जागांपैकी भाजपाने एक जागा जिंकली
मणिपूर राज्यात पोटनिवडणूक झालेल्या पाच जागांपैकी भाजपाने एक जागा जिंकली. तसेच मतमोजणी सुरू असलेल्या चार जागांवर भाजप आघाडीवर आहे.
10:36 November 10
छत्तीसगड: तिसर्या फेरीच्या मतमोजणीनंतर कॉंग्रेस 6500 मतांनी पुढे
मारवाही पोटनिवडणुकीच्या तिसर्या फेरीची मोजणीनंतर कॉंग्रेस 6500 मतांनी आघाडीवर आहे. तिसर्या टप्प्यातील मतमोजणीनंतर कॉंग्रेसच्या उमेदवाराला 12971 मते मिळाली, तर भाजपला 6534 मते मिळाली.
10:35 November 10
छत्तीसगड: आतापर्यंतच्या निकालात काँग्रेस 6 हजार 500 मतांनी आघाडीवर
आतापर्यंतच्या निकालात काँग्रेस 6 हजार 500 मतांनी आघाडीवर आहे. कॉंग्रेसचे उमेदवार केके ध्रुव यांना 12971 मते मिळाली. भाजपचे उमेदवार गंभीर सिंग यांना 6534 मते मिळाली.
10:30 November 10
छत्तीसगड: दुसर्या फेरीत कॉंग्रेसचे उमेदवार के. ध्रुव 3664 मतांनी आघाडीवर
दुसर्या फेरीत कॉंग्रेसचे उमेदवार के. ध्रुव 3664 मतांनी पुढे आहेत. आतापर्यंत त्यांना 4856 मते मिळाली. तसेच 310 लोकांनी नोटा बटन दाबले आहे.
10:29 November 10
धनंजय सिंह पुन्हा एकदा आघाडीवर, सपा पिछाडीवर

10:26 November 10
उत्तर प्रदेश: धनंजय सिंह पिछाडीवर, सपाची पुन्हा एकदा आघाडी
मल्हनी सीटवर अपक्ष उमेदवार धनंजय सिंह पिछाडीवर आहेत. या जागेवर सपाचे उमेदवार लकी यादव यांनी पुन्हा एकदा आघाडी घेतली आहे. याशिवाय नौगवान सदात या जागेवरही समाजवादी पार्टी आघाडीवर आहे. तसेच देवरिया सदर, बुलंदशहर, बांगरमऊ आणि तुंडला येथे भारतीय जनता पक्ष आघाडीवर आहे. घाटमपूर जागेवर बसपा आघाडीवर आहे.
10:25 November 10
उत्तर प्रदेश: घाटमपूरच्या जहांगीराबाद गावची मते मोजली जाणार नाहीत
घापूरपूर मतदारसंघातील जहांगीराबाद गावच्या बूथ क्रमांक 173 एची मते मोजली जाणार नाहीत. पीठासीन अधिकाऱ्याने चुकून मॉक पोल हटविला नाही. निवडणूक आयोग तसेच सर्व पक्षांच्या उमेदवारांना या प्रकरणाची माहिती देण्यात आली आहे.
10:18 November 10
हरियाणा: भाजपाला दुसर्या फेरीत 3086 मते, कॉंग्रेस 550 मतांनी आघाडीवर
बरोदा: दुसर्या फेरीमध्ये भाजपाला 3086 मते मिळाली, तर इनॅलोला 499 मते मिळाली. याशिवाय दुसर्या फेरीत राजकुमार सैनी यांना 659 मते मिळाली. आता कॉंग्रेस भाजपपेक्षा 550 मतांनी आघाडीवर आहे.
10:17 November 10
हरियाणा: दुसर्या फेरीत कॉंग्रेस 550 मतांच्या पुढे
बरोदा: दुसर्या फेरीनंतर कॉंग्रेस 550 मतांनी आघाडीवर आहे.
10:14 November 10
हरियाणा: पहिल्या फेरीच्या मतमोजणीत कॉंग्रेसला 2595 आणि भाजपला 1574 मते
बरोदा: पहिल्या फेरीच्या मतमोजणीत कॉंग्रेसला 2595 आणि भाजपला 1574 मते मिळाली. त्याशिवाय एलएसपीचे उमेदवार राजकुमार सैनी यांना 250 आणि इनॅलो उमेदवाराला 202 मते मिळाली.
10:08 November 10
ओडिशात एका विधानसभा जागेवर बिजू जनता दल आघाडीवर
निवडणूक आयोगाच्या म्हणण्यानुसार, ओडिशाच्या दोन विधानसभा जागांपैकी एका जोगेवर बिजू जनता दल आघाडीवर आहे.
10:02 November 10
भाजप चार राज्यात आघाडीवर
चार राज्यात भाजप आघाडीवर आहे, एका जागेवर समाजवादी पार्टी, एका जागेवर बहुजन समाज पक्ष आणि एकूण सात राज्यांपैकी एका जागेवर अपक्ष उमेदवार आघाडीवर आहे.
10:00 November 10
उत्तर प्रदेश: दोन जागांवर भाजप आघाडीवर
उत्तर प्रदेशमध्ये घेण्यात आलेल्या पोटनिवडणूकीत एकूण सात जागांपैकी एका जागेवर समाजवादी पार्टी आणि एका जागेवर बहुजन समाज पार्टी. तर दोन जागांवर भाजप आघाडीवर आहे.
09:55 November 10
तेलंगणा: दुब्बक विधानसभेत भाजप आघाडीवर
निवडणूक आयोगाच्या म्हणण्यानुसार तेलंगणाच्या दुब्बक विधानसभेत भाजप आघाडीवर आहे.
09:54 November 10
झारखंड: दुमका आणि बर्मो विधानसभा जागांवर भाजप आघाडीवर आहे.
निवडणूक आयोगाच्या म्हणण्यानुसार झारखंडच्या दुमका आणि बर्मो विधानसभा जागांवर भाजप आघाडीवर आहे.
09:48 November 10
झारखंड: भाजपचे लुईस मरांडी 3819 मतांनी पुढे
पहिल्या फेरीत भाजपचे लुईस मरांडी 3819 मतांनी पुढे
09:45 November 10
उत्तर प्रदेश: घाटमपूरमध्ये बसपा आणि मल्हनीत अपक्ष उमेदवार पुढे
घाटमपूरमध्ये बसपा आघाडीवर आहे. तर मल्हनी मतदारसंघात अपक्ष उमेदवार धनंजय सिंह आघाडीवर आहेत. तसेच, देवरिया सदर, बुलंदशहर, बांगरमऊ, तुंडला आणि घाटमपूरमध्ये भारतीय जनता पक्ष आघाडीवर आहे.
09:40 November 10
उत्तर प्रदेश: मल्हनी मतदारसंघात अपक्ष उमेदवार धनंजय सिंह आघाडीवर
मल्हनी मतदारसंघात अपक्ष उमेदवार धनंजय सिंह आघाडीवर आहेत. दुसर्या क्रमांकावर सपाचे उमेदवार आहेत. अवसा नौगावां सादात या जागेवर समाजवादी पार्टी आघाडीवर आहे. तसेच, देवरिया सदर, बुलंदशहर, बांगरमऊ, तुंडला आणि घाटमपूरमध्ये भारतीय जनता पक्ष आघाडीवर आहे.
09:36 November 10
छत्तीसगड: कॉंग्रेसचे डॉ. केके धुवर यांना 4,135 मते.
मारवाही पोटनिवडणूक:
कॉंग्रेसचे डॉ. केके धुवर यांना 4,135 मते.
भाजपचे गंभीर सिंग यांना 2,375 मते
काँग्रेस 1,760 मतांनी पुढे.
नोटाला 97 मते.
09:32 November 10
छत्तीसगड: अमित जोगी यांचा कॉंग्रेसवर आरोप
छत्तीसगडच्या एकमेव उच्च प्रोफाइल असलेल्या मारवाही सीटवर मतमोजणी सुरू आहे. अमित जोगी यांनी ट्वीट करून मतमोजणीदरम्यान कॉंग्रेस सरकारवर मतमोजणीत फेरफार केल्याचा आरोप केला आहे. त्यांनी ट्वीट करून असे लिहिले आहे की, रात्री उशिरा निवडणूक अधिकाऱ्यांसमवेत मतमोजणीत जीजीपी व अन्य अपक्षांची मते त्यांच्या बाजूने जोडण्याची कॉंग्रेसच्या प्रमुख नेत्यांनी रणनीती आखली आहे.
कॉंग्रेस व भाजपाच्या उमेदवारांच्या मतांशिवाय स्वतंत्र उमेदवारांच्या मतांची यादीही तयार करावी, अशी विनंती त्यांनी केली आहे, जेणेकरुन निवडणूक अधिकारी हे मते कॉंग्रेसच्या उमेदवाराच्या मतांमध्ये जोडू शकणार नाहीत. अमित जोगी म्हणाले की, मी स्वत: प्रत्येक फेऱ्यांच्या मोजणीवर लक्ष ठेवणार आहे.
09:31 November 10
छत्तीसगड: कॉंग्रेसचे उमेदवार केके ध्रुव 2200 मतांनी पुढे
मारवाही पोटनिवडणूक: कॉंग्रेसचे उमेदवार केके ध्रुव 2200 मतांनी पुढे
09:26 November 10
तेलंगणा:दुबक्का विधानसभा सीटसाठी मतमोजणी सुरू
तेलंगणा: पोटनिवडणुकीत गेलेल्या दुबक्का विधानसभा सीटसाठी मतमोजणी सुरू आहे
09:25 November 10
कर्नाटक: आरआर नगर विधानसभा मतदारसंघात भाजप आघाडीवर
निवडणूक आयोगाच्या माहितीनुसार कर्नाटकातील आरआर नगर आणि सीरा विधानसभा जागांवर भाजप आघाडीवर आहे
09:23 November 10
उत्तर प्रदेश: पाच जागांवर भाजप आणि दोन जागांवर सपा पुढे
भारतीय जनता पार्टी देवरिया सदर, बुलंदशहर, बांगरमऊ, तुंडला आणि घाटमपूर येथे आघाडीवर आहे. त्याच बरोबर मल्हानी आणि नौगाव सदाट या जागांवर समाजवादी पार्टी आघाडीवर आहे.
09:22 November 10
हरियाणा पोटनिवडणूक: 6 नंबर बूथ मशीनमध्ये बिघाड
मोहनाच्या बिट्स महाविद्यालयात सुरू झालेली मतमोजणी अजूनही सुरू आहे. दरम्यान, मशीन क्रमांक 6 मध्ये बिघाड झाल्याचे समोर आले आहे.
09:18 November 10
14 टेबलांवर 20 फेऱ्यांमध्ये मतमोजणी पूर्ण होईल
बरोदा विधानसभा जागातील पोटनिवडणुकीचा निकाल आज येईल. सकाळी आठ वाजता मतमोजणीस प्रारंभ झाला आहे. या निवडणूकीत मुख्य स्पर्धा कॉंग्रेसचे उमेदवार इंदुराज नरवाल उर्फ भाला आणि भाजपचे उमेदवार आंतरराष्ट्रीय कुस्तीपटू योगेश्वर दत्त यांच्यात असल्याचे समजते. इनेला उमेदवार जोगेंद्र सिंह आणि LSP चे उमेदवार राजकुमार सैनीही कॉंग्रेस आणि भाजपला डोकोदूखी ठरू शकतात.
मोहानाच्या बिट्स कॉलेजमध्ये सुरू झालेल्या मतमोजणीस प्रारंभ झाला आहे. 14 टेबलांवर 20 फेऱ्यांमध्ये मतमोजणी पूर्ण होईल.
09:15 November 10
नागालँडमध्ये मतमोजणीस प्रारंभ
नागालँडमध्ये मतमोजणीस प्रारंभ झाला आहे. मतमोजणीसाठी सुरक्षेची चोख व्यवस्था करण्यात आली आहे.
09:13 November 10
हरीयाणामध्ये कॉंग्रेस 2200 मतांनी आघाडीवर

09:10 November 10
उत्तर प्रदेश: भाजप 4 व सपा 3 जागांवर आघाडीवर
भारतीय जनता पार्टी देवरिया सदर, नौगावां सादात, बुलंदशहर आणि घाटमपूर येथे आघाडीवर आहे. त्याचबरोबर बांगरमऊ, टुंडला आणि मल्हानी या जागांवर समाजवादी पार्टी आघाडीवर आहे.
08:57 November 10
छत्तीसगड: मारवाहीत पोटनिवडणुकीची मतमोजणी सुरू
छत्तीसगडमधील एकमेव हाय प्रोफाइल असलेल्या मारवाही सीटवर निर्णय आज येत आहे. सकाळी आठपासून मतमोजणीस प्रारंभ झाला आहे. कोरोना लक्षात घेता प्रशासनाने विशेष खबरदारी घेतली आहे. 20 फेऱ्यांमध्ये मतमोजणी होईल.
08:48 November 10
झारखंडमधील दुमका विधानसभा पोटनिवडणुकीच्या मतमोजणीस प्रारंभ
झारखंडमधील दुमका विधानसभा पोटनिवडणुकीच्या मतमोजणीस प्रारंभ झाला आहे. कडक सुरक्षेत अभियांत्रिकी महाविद्यालय मतमोजणी सुरू आहे. येथे सुमारे एक लाख 65 हजार मतदार आहेत. ते 12 उमेदवारांचे भवितव्य ठरवतील. दुमका सीटची मुख्य लढत झामुमोचे बसंत सोरेन आणि भाजपचे डॉ. लुईस मरांडी यांच्यात आहे. दरम्यान, 21 टेबलांवर मतमोजणीच्या एकूण 18 फेऱ्या होतील.
08:28 November 10
कर्नाटक: सिरा विधानसभा मतदारसंघात मतमोजणीला सुरवात
कर्नाटक: सिरा विधानसभा मतदारसंघात मतमोजणीला सुरवात झाली.
तुमकुर मतमोजणी केंद्रावरील क्षणचित्रे...
08:00 November 10
मतमोजणीला सुरवात
देशातील 11 राज्यांमधील 58 विधानसभा जागांवर झालेल्या पोटनिवडणुकीचा निकाल आज येईल. यातील 9 विधानसभा निकालाचे अपडेट आपण याठिकाणी पाहणार आहोत. दरम्यान, मतमोजणीला सुरवात झाली आहे.
07:35 November 10
सकाळी 8 वाजता सर्व राज्यांमध्ये मतमोजणीस प्रारंभ होईल

06:31 November 10
कोणत्या राज्यात किती मतदान?
उत्तर प्रदेश
उत्तर प्रदेशमध्ये सात जागांवर पोटनिवडणुकांसाठी मतदान झाले होते. राज्यात एकूण 51.57 टक्के मतदान झाले होते.
तेलंगणा
तेलंगणामध्ये एका जागेवर मतदान झाले होते. याठिकाणी 81.44 टक्के मतदानाची नोंद झाली होती.
नागालँड
नागालँडमध्ये 83.69 टक्के मतदानाची नोंद करण्यात आली होती. याठिकाणी एका जागेवर पोटनिवडणुकीसाठी मतदान झाले होते.
छत्तीसगड
छत्तीसगडच्या मरवाहीमध्ये एका जागेसाठी पोटनिवडणुकीसाठी मतदान झाले होते. दिवसभरात 71.99 टक्के मतदानाची नोंद झाली.
ओडिशा
ओडिशामध्ये दोन जागांवरील पोटनिवडणुकांसाठी मतदान पार पडले होते. यांपैकी बालासोरमध्ये 71 टक्के, तर तिर्तलमध्ये 69.90 टक्के मतदान झाले होते. दरम्यान, राज्यात एकूण 68.08 टक्के मतदानाची नोंद झाली होती.
हरियाणा
हरियाणाच्या बरोदामध्ये एका जागेसाठी मतदान झाले होते. दिवसभरात येथे एकूण 68 टक्के मतदानाची नोंद झाली होती.
कर्नाटक
कर्नाटकमध्ये दोन जागांवर पोटनिवडणुकांसाठी मतदान पार पडले होते. आर. आर. नगरमध्ये दिवसभरात एकूण 39.15 टक्के, तर सिरामध्ये एकूण 77.34टक्के मतदान झाले. राज्यात एकूण 51.30 टक्के मतदानाची नोंद झालेली आहे.
झारखंड
झारखंडमध्ये दुमका आणि बेरमोमध्ये पोटनिवडणुकांसाठी मतदान झाले. शांततापूर्ण वातावरणात हे मतदान पार पडले होते. दुमकामध्ये दिवसभरात एकूण 65 टक्के, तर बेरमोमध्ये 60 टक्के मतदानाची नोंद झाली. राज्यात एकूण 52.51 टक्के मतदानाची नोंद झाली आहे.
मणिपुर
मणिपुरमध्ये चार जागांवर पोटनिवडणुकांसाठी मतदान पार पडले होते.
06:06 November 10
नऊ राज्यांमधील पोटनिवडणुकांच्या निकालाचे LIVE Updates; वाचा एका क्लिकवर
हैदराबाद : देशभरात आज पोटनिवडणुकांचे निकाल पार पडत आहेत. एकूण 58 विधानसभा जागांसाठी हे मतदान झाले होते. यामध्ये उत्तर प्रदेश (7), कर्नाटक (2), झारखंड (2), ओडिशा (2), नागालँड (2) मणिपुर (4) आणि छत्तीसगड, तेलंगणा आणि हरियाणामध्ये प्रत्येकी एका जागेवर मतदान झाले होते.