नवी दिल्ली - पाकिस्तानकडून हवाई हद्दीचे उल्लंघन करण्यात आले होते. त्याला भारतीय वायुसेनेकडून चोख प्रत्युत्तर देण्यात आले. या कारवाई दरम्यान भारतीय सुरक्षा रक्षकांकडून पाकिस्तानचे लढाऊ विमान पाडण्यात आले, असे परराष्ट्र मंत्रालयाकडून सांगण्यात आले आहे. या कारवाईत, भारतीय हवाई दलाने मिग-२१ लढाऊ विमान गमावले असून या विमानाचा वैमानिक बेपत्ता असल्याचेही ते यावेळी म्हणाले.
भारतासोबत असलेला संघर्ष आम्ही चर्चेतून सोडवू इच्छतो. युद्ध हे उत्तर नसून यातून दोन्ही देशांचे नुकसान होणार आहे. आतापर्यंत झालेला युद्धांचा इतिहास आपल्याला सर्वनाश झाल्याचे सांगते - इमरान खान
आमचा एक पायलट पाकिस्तानच्या ताब्यात असल्याचा दावा पाकिस्तान करत आहे, मात्र याची खातरजमा करण्यात येत आहे.
भारतीय हवाई दलाने पाकिस्तानचा हल्ल्याचा प्रयत्न निष्प्रभ केला, याच प्रयत्नांत आम्ही पाकिस्तानचे एफ-१६ हे लढाऊ विमान पाडले भारतीय हवाई दलाचा एक पायलट परतला नाही.
परराष्ट्र सचिव विजय गोखले ३ वाजून १५ मिनिटांनी पत्रकारपरिषद घेणार आहे.
विमानतळावरचे निर्बंधमागे, बंद करण्यात आलेले विमानतळ पुन्हा होणार सुरु.
लादेनला मारले जाऊ शकते तर आजच्या परिस्थितीत काहीही होऊ शकते - अरुण जेटलींचे वक्तव्य
सिमेवर निर्माण झालेल्या तणावामुळे अमृतसर विमानतळ बंद करण्यात आले आहे. त्यामुळे प्रवासी विमान उड्डाने रद्द करण्यात आले असल्याची माहिती अमृतसर विमानतळ संचालक ए.पी. आचार्य यांनी दिली आहे.
भारत-पाकिस्तान देशांमधून जाणारी आंतरराष्ट्रीय विमान वाहतूक विस्कळीत झाली आहे. त्यामुळे काही विमाने पर्यायी मार्गांवर वळवण्यात आली असल्याचे एएनआय वृत्तसंस्थेकडून सांगण्यात येत आहे.
पाकिस्तानी विमानांची भारतीय हद्दीत घुसखोरी, प्रवासी विमान उड्डाणे थांबवली
पाकचे घुसखोरी करणारे विमान भारताने पाडले, विमानतळांवर हाय अलर्ट, प्रवासी वाहतूक रद्द
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या निवासस्थानी केद्रींय सुरक्षा समितीची बैठक सुरू
मुंबई - चंडीगड विमानसेवा रद्द करण्यात आली आहे. मुंबईहून ४ ठिकाणी जाणारी विमान उड्डाने रद्द करण्यात आली आहे.
भारतीय हवाई हल्ल्याच्या भीतीने पाकिस्तानातील सर्व हवाई उड्डाने रद्द करण्यात आली आहे.
पाकिस्तान हवाई दलाचे एफ - १६ लढाऊ विमान पाडल्याचा दावा भारतीय सैन्याकडून केला जात आहे. पाकिस्तानचा वैमानिक बैपत्ता असल्याचेही बोलले जात आहे.
लेह, जम्मू, श्रीनगर आणि पठानकोट विमानतळावरच्या प्रवासी विमान उड्डाणे रद्द करण्यात आले आहे.
लाहोर, मुलतान, फैसलाबाद, सियालकोट आणि इस्लामाबाद
केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांच्या अदबैठक घेत आहेत; बैठक में एनएसए, आरएवाय चीफ, गृह सचिव व इतर अधिकारी उपस्थित होते.