ETV Bharat / bharat

मल्ल्याला लंडनच्या उच्च न्यायालयाचा दिलासा, अपीलास परवानगी मिळाल्याने प्रत्यर्पण लांबणीवर - oral hearing

यापूर्वी प्रत्यर्पणाविरुद्ध अपील करण्यासाठी परवानगी मिळवण्याकरता मल्ल्या याने एप्रिलमध्ये केलेला लेखी अर्ज न्यायालयाने नाकारला होता.

विजय मल्ल्या
author img

By

Published : Jul 2, 2019, 5:45 PM IST

Updated : Jul 2, 2019, 10:14 PM IST

लंडन - आर्थिक घोटाळ्यातील भारताचा फरार आरोपी मद्यसम्राट विजय मल्ल्या याला प्रत्यार्पण खटल्याविरोधात अपील करण्यास लंडनच्या हायकोर्टाने परवानगी दिली आहे. हा मल्ल्यासाठी दिलासादायक निर्णय आहे मात्र, त्यामुळे त्याला भारतात आणणे आणखी लांबणीवर पडणार आहे.

पळपुटा मद्यसम्राट विजय मल्ल्या मंगळवारी लंडनच्या उच्च न्यायालयात दाखल झाला. त्याने न्यायालयाकडे भारताला प्रत्यर्पण होण्याविरुद्ध अपील करण्याची परवानगी मागितली होती. यावर आज तोंडी सुनावणी होणार आहे. ब्रिटनचे गृहसचिव साजिद जावीद यांनी मल्ल्याच्या प्रत्यर्पणाच्या आदेशावर स्वाक्षरी केली आहे. याविरोधात मल्ल्याने अर्ज केला आहे. त्याने भारतीय बँकांचे ९ हजार कोटींचे कर्ज बुडवले आहे.

लंडनच्या रॉयल कोर्टस ऑफ जस्टिसच्या अ‍ॅडमिनिस्ट्रेटिव्ह डिव्हिजनचे २ न्यायाधीशांचे पीठ मल्ल्याच्या अर्जावर तोंडी सुनावणी घेणार आहे. सध्या मल्ल्याला प्रत्यर्पणाविरुद्ध अपील करण्याची परवानगी नाही. ही परवानगी मिळवण्यासाठी त्याने अर्ज केला आहे. यापूर्वी प्रत्यर्पणाविरुद्ध अपील करण्यासाठी परवानगी मिळवण्याकरता मल्ल्याने एप्रिलमध्ये केलेला लेखी अर्ज न्यायालयाने नाकारला होता. आता मल्ल्याने पुन्हा अर्ज दाखल केल्यानंतर न्यायाधीश याप्रकरणी निर्णय राखून ठेवण्याची आणि येत्या काही आठवड्यात तो जाहीर करण्याची अपेक्षा आहे.

६३ वर्षीय मल्ल्यावर भारतीय बँकांचे ९ हजार कोटींचे कर्ज बुडवल्याचा आरोप आहे. तसेच, भारतात घोटाळा, आर्थिक गैरव्यवहार आणि विदेशी विनियम व्यवस्थापक कायदा (फेमा) यांचे उल्लंघन केल्याचे आरोप आहेत.

Intro:Body:

प्रत्यर्पणाविरुद्ध मल्ल्याच्या अर्जावर आज सुनावणी

लंडन - पळपुटा मद्यसम्राट विजय मल्ल्या मंगळवारी लंडनच्या उच्च न्यायालयात दाखल झाला. त्याने न्यायालयाकडे भारताला प्रत्यर्पण होण्याविरुद्ध अपील करण्याची परवानगी मागितली होती. यावर आज तोंडी सुनावणी होणार आहे. ब्रिटनचे गृहसचिव साजिद जावीद यांनी मल्ल्याच्या प्रत्यर्पणाच्या आदेशावर स्वाक्षरी केली आहे. याविरोधात मल्ल्याने अर्ज केला आहे. त्याने भारतीय बँकांचे ९ हजार कोटींचे कर्ज बुडवले आहे.

लंडनच्या रॉयल कोर्टस ऑफ जस्टिसच्या अ‍ॅडमिनिस्ट्रेटिव्ह डिव्हिजनचे २ न्यायाधीशांचे पीठ मल्ल्याच्या अर्जावर तोंडी सुनावणी घेणार आहे. यापूर्वी प्रत्यर्पणाविरुद्ध अपील करण्यासाठी परवानगी मिळवण्याकरता मल्ल्या याने एप्रिलमध्ये केलेला लेखी अर्ज न्यायालयाने नाकारला होता. आता मल्ल्याने पुन्हा अर्ज दाखल केल्यानंतर न्यायाधीश याप्रकरणी निर्णय राखून ठेवण्याची आणि येत्या काही आठवडय़ांत तो जाहीर करण्याची अपेक्षा आहे.

६३ वर्षीय मल्ल्या याच्यावर त्याच्यावर भारतीय बँकांचे ९ हजार कोटींचे कर्ज बुडवल्याचा आरोप आहे. तसेच, भारतात घोटाळा, आर्थिक गैरव्यवहार आणि विदेशी विनियम व्यवस्थापक कायदा (फेमा) यांचे उल्लंघन केल्याचे आरोप आहेत.

Conclusion:
Last Updated : Jul 2, 2019, 10:14 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.