ETV Bharat / bharat

आपल्या समृद्ध भाषिक परंपरा नष्ट व्हायला नको... - व्यंकय्या नायडू भाषासंवर्धन

भारतात मातृभाषा म्हणून १९,५०० भाषा आणि बोली बोलल्या जातात, असे भाषिक गणनेनुसार माहिती मिळते. भारतात दहा हजार लोकांकडून बोलल्या जाणाऱ्या १२१ भाषा आहेत. मात्र, आमच्या देशातील १९६ भाषा या धोक्यात आहेत, हे तथ्य अत्यंत दु:खदायक आहे. या लेखामध्ये भारताचे उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू म्हणतात, की ही संख्या वाढणार नाही याची काळजी आपण घ्यायला हवी. आम्हाला आमच्या भाषांचे संरक्षण आणि संवर्धन करावे लागेल आणि त्यासाठी एकमेव आणि सर्वोत्कृष्ट मार्ग म्हणजे त्याचा सातत्याने वापर करणे, हाच आहे.

Let us not erode our rich linguistic heritage an article by M Venkaiah Naidu
author img

By

Published : Nov 12, 2019, 6:13 PM IST

भारत हा भाषिक खजिन्याचा कोष आहे आणि आपल्या अतिविलक्षण भाषिक आणि सांस्कृतिक वैविध्यासाठी व्यापक प्रमाणावर परिचित आहे, याचा आम्हाला अभिमान आहे. अनेक भाषांची बहुसंख्या आणि सहअस्तित्व आमच्या देशामध्ये अनेक रंग मिसळते आणि जीवनशक्ती प्रदान करून त्याला एकमेव अद्वितीय बनवते. परंतु, आम्ही आमची समृद्ध देशी भाषांचे जतन करण्यासाठी पुरेसे प्रयत्न करत नाही, यामुळे मी अत्यंत व्यथित आहे. सरकारने विशेषतः प्राथमिक आणि माध्यमिक स्तरावर शिक्षणाचे माध्यम ठरवण्यासंदर्भात धोरण स्वीकारताना दुप्पट काळजीपूर्वक राहण्याची गरज आहे. सर्जनशीलतेच्या अभिव्यक्तीसाठी मातृभाषा ही विस्तारित पाया घालून देऊ शकते. रचनात्मक अवस्थेत सर्जनशीलतेची पोषण करण्यासाठी सर्व प्रकारचे प्रयत्न केले पाहिजेत.

बौद्धिक आणि भावनिक अभिव्यक्तीसाठी भाषा हे साधन आहे. संस्कृती, वैज्ञानिक ज्ञान आणि जगाबाबत दृष्टीकोन यांचे आंतरपिढ्या संक्रमण करण्यासाठी ते वाहन आहे. भूतकाळ आणि वर्तमानकाळ यांना जोडणारा तो एक महत्वाचा, अदृष्य असा धागा आहे. मानवी उत्क्रांतीने तो उत्क्रांत होत जातो आणि सततच्या उपयोगाने त्याची भरभराट होते. आमच्या भाषा या आमचा इतिहास, आमची संस्कृती आणि समाज म्हणून आमच्या उत्क्रांतीचा महत्वाचा भाग आहे. थोडक्यात, आमच्या भाषा या आमच्या दैनंदिन जीवनाच्या प्रत्येक पैलूमध्ये झिरपत असतात आणि आमच्या सभ्यतेचा मूळ पाया तयार करतात. वस्तुतः, वैयक्तिक आणि सामूहिक अशी आमची ओळख आणि आमच्या परंपरा तसेच चालीरीती यांच्या त्या जीवनाला अत्यावश्यक अशा रक्तवाहिन्या आहेत. लोकांमध्ये बंध तयार करण्यात आणि ते मजबूत करण्यात त्या अत्यंत महत्वाची भूमिका बजावतात. भारतात मातृभाषा म्हणून १९,५०० भाषा आणि बोली बोलल्या जातात, असे भाषिक गणनेनुसार माहिती मिळते. भारतात दहा हजार लोकांकडून बोलल्या जाणाऱ्या १२१ भाषा आहेत.

भाषा या कधीही स्थिर नसतात. त्या चैतन्याने रसरसलेल्या, भोवतालच्या सामाजिक-आर्थिक वातावरणानुसार उत्क्रांत होत जाणाऱ्या आणि स्वीकार करणाऱ्या असतात. त्या वाढतात, आकुंचित पावतात, संक्रमित होतात, विलीन होतात आणि दु:खदरित्या शेवटी मरतात. महान भारतीय कवी आचार्य दंडी यांनी म्हटले आहे, की जर भाषांचा प्रकाश अस्तित्वात नसता तर, आम्ही अंधारात चाचपडत राहू. आमच्या देशातील १९६ भाषा या धोक्यात आहेत, हे तथ्य अत्यंत दु:खदायक आहे. हा आकडा वाढणार नाही, याची कदाचित आम्हाला खात्री करावी लागेल. आम्हाला आमच्या भाषांचे संरक्षण आणि संवर्धन करावे लागेल आणि त्यासाठी एकमेव आणि सर्वोत्कृष्ट मार्ग म्हणजे त्याचा सातत्याने वापर करणे, हाच आहे. आमच्या आगळ्यावेगळ्या आणि समृद्ध भाषक परंपरेचे संरंक्षण आणि संवर्धन करण्याच्या महत्वावर मी नेहमीच जोर दिला आहे,. आमच्या चैतन्यदायी नागरीकरणाच्या दीर्घ प्रवासात आम्हाला वारसा हक्काने मिळालेला खजिना, सामूहिक ज्ञानाचे कोठार आणि जमा केलेले शहाणपण गमावणे आम्हाला परवडणार नाही. जर आम्ही भाषा गमावली तर, आम्ही आमच्या ओळखीचा एक किमती भाग गमावून बसू.

जेव्हा एखादी भाषा मरते, तेव्हा ती तिच्याबरोबर संपूर्ण ज्ञानाची व्यवस्था आणि एक जगाकडे पाहण्याचा एकमेव परिप्रेक्ष्य घेऊन जाते. आमची विशेष कौशल्य, कला, हस्तकला, पाककला आणि व्यापार यांच्यासह पारंपरिक उपजीविकेचे प्रकारही अंतर्धान पावतात. भाषेची जपणूक आणि विकास करण्यासाठी बहुशाखीय पवित्र्याची गरज आहे. आमच्या शाळांमधून आणि निश्चितच प्राथमिक स्तरावर शिक्षणाचे माध्यम मातृभाषा करून आम्ही सुरूवात केली पाहिजे. सर्व जगभरात विविध तज्ञ गटांनी केलेल्या अभ्यासात असे प्रस्थापित झाले आहे की, शिक्षणाच्या सुरूवातीच्या टप्प्यात मातृभाषा शिकवली तर मनाचा आणि विचारांचा विकास होण्यास चालना मिळते आणि मुलांना अधिक सर्जनशील आणि तार्किक बनवते.

युनेस्कोचे महासंचालक श्रीमती ऑड्रे अझौले यांनी, आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिनानिमित्त (२१ फेब्रुवारी) आपल्या संदेशात म्हटले आहे की, "युनेस्कोसाठी प्रत्येक मातृभाषा परिचित असली पाहिजे, मान्यताप्राप्त आणि सार्वजनिक जीवनाच्या प्रत्येक वर्तुळात तिला अधिक प्रतिष्ठा मिळाली पाहिजे, यास ती पात्र आहे. मात्र हे नेहमी होत नाही. मातृभाषा यांना राष्ट्रीय किंवा अधिकृत किंवा शिक्षणाच्या भाषेचा दर्जा मिळतोच असे नाही. या स्थितीमुळे मातृभाषेची अवमूल्यन होते आणि दीर्घकाळात ती कालांतराने अंतर्धान पावते.’’ माझ्या मते, हा अगदी वेळेवर दिला गेलेला आणि महत्त्वाचा इशारा आहे.

आधुनिक जगात केवळ इंग्लिश शिक्षण विकासाची संधी देते, हा एक गैरसमज आहे. तो खरा नाही. इंग्लिश बोलणारे केवळ ऑस्ट्रेलिया, ब्रिटन, कॅनडा, अमेरिका असे मूठभर देश आहेत. चीन, जर्मनी, फ्रान्स, जपान, दक्षिण कोरिया आदी देश इंग्लिश शिक्षणाशिवाय चांगली प्रगती करून आहेत. इंग्लिश येणे हे इतर अनेक आंतरराष्ट्रीय भाषा शिकण्यासारखे आहे. काही जण सुचवत आहेत त्याप्रमाणे, मातृभाषेऐवजी त्यांचा वापर केला जाऊ शकत नाही. मातृभाषेतून पाया पक्का केल्यानंतर ती भाषा योग्य टप्प्यात शिकता येते. प्राथमिक स्तरावर शिक्षणाची भाषा मातृभाषा असावी, यासाठी आम्ही ठोस पावले उचलली पाहिजेतच, पण प्रशासन, बँकिंग आणि न्यायालयीन कामकाज यांची ती भाषा करण्यासाठी सर्व पावले उचलणे गरजेचे आहे. माझ्यासाठी हे, परिणामकारक लोकशाहीचे हे हृदय आहे. समावेशक प्रशासनाचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी सध्याचे भाषक अडथळे आपल्याला दूर करावे लागणार आहेत. जेथे जेथे सरकार आणि जनता यांच्यात संवाद आहे, तेथे जी भाषा लोक समजतात, तीच भाषा कायम असली पाहिजे. मी असे म्हणत नाही की, आमच्या मुलांना अनेक भाषा शिकवू नयेत, ज्या साहित्य आणि विज्ञान या दोन्ही बाबतीत त्याच्या आकलनशक्तीचे क्षितीज व्यापक करण्यास आवश्यक आहेत. वस्तुतः,भारताला आपल्या मनुष्यबळाला समृद्ध करणे आणि ज्ञानआधारित अर्थव्यवस्थेत नेता बनण्यासाठी हे फार आवश्यक आहे आणि कारण येणाऱ्या वर्षांत ते उत्क्रांत होणार आहे.

१९९९ मध्ये, युनेस्कोने बहुभाषक शिक्षणावर एक ठराव केला आणि त्यात किमान तीन भाषाचा वापर शिक्षणात करावा, असे सुचवले. मातृभाषा, एक प्रादेशिक आणि राष्ट्रीय भाषा आणि आंतरराष्ट्रीय भाषा. पण नमूद करण्यासारखी महत्वाची गोष्ट ही आहे की, मातृभाषेची मह्त्वाची भूमिका, जी, युनेस्कोने म्हटल्याप्रमाणे, "ज्ञान आणि नाविन्यपूर्ण संशोधनाचा स्त्रोत आहे.’’ मातृभाषेतून दिलेली सूचना साधारण शिक्षण आणि इतर भाषा शिकण्यासाठी सुविधाजनक करते. नवीन राष्ट्रीय शिक्षण धोरणात घरेलू आणि मातृभाषांतून तसेच आदिवासी आणि चिन्ह भाषांतून शिक्षण देण्याची अनेक सूचना समोर ठेवल्या आहेत, हे खूप उल्हासित करणारे आहे. प्रसंगोपात्त, संयुक्त राष्ट्रसंघाने २०१९ हे वर्ष स्वदेशी भाषाची जपणूक, पुनरूज्जीवन आणि स्वदेशी भाषांना उत्तेजन देण्यासाठी आंतरराष्ट्रीय स्वदेशी भाषा वर्ष म्हणून जाहीर केले. भारतात आपल्याकडे अनेक आदिवासी भाषा आहेत, ज्या जवळपास लोप पावण्याकडे निघाल्या आहेत.

मला आशा आहे, की घरात, समुदायात, बैठकांमध्ये आणि प्रशासनात लोक देशी भाषा वापरण्यास सुरूवात करतील. अधिक लोकांनी कविता, कथा, कादंबर्या आणि नाटके भारतीय भाषामधून लिहावीत. जे या भाषांतून बोलतात, लिहितात आणि संवाद साधतात, त्यांना आम्ही प्रतिष्ठा आणि अभिमानाची जाणीव करून दिली पाहिजे. भारतीय भाषांतील प्रकाशने, नियतकालिके आणि मुलांच्या पुस्तकांना प्रोत्साहन दिले पाहिजे. बोली भाषा आणि लोकसाहित्यावर पुरेसा फोकस दिला पाहिजे. समावेशक विकासाची भाषा ही उत्प्रेरक बनली पाहिजे. भाषेला प्रोत्साहन हा चांगल्या प्रशासनाचा अंतर्गत घटक बनला पाहिजे. स्वामी विवेकानंद यांनी एकदा म्हटले होते की, राष्ट्राच्या प्रगतीची भाषा ही मुख्य साधन आणि निर्देशांक असते. आमच्या भाषांनी समूहाच्या सक्षमीकरणाचे साधन म्हणून काम केले पाहिजे.

राज्यसभेत, तिच्या सदस्यांनी आपल्या अधिसूचीतील २२ भाषेतून व्यक्त करण्याची तरतूद करण्यात आली आहे. भारताच्या सर्वोच्च न्यायालयाने आपला निकाल सहा देशी भाषांतून उपलब्ध करण्याचा निर्णय घेतला आहे. भाषिक अडथळे दूर करण्याच्या दिशेने आणि समान न्याय सर्वाना मिळण्यासाठी हे सकारात्मक पाऊल आहे. अर्थमंत्रालयाने प्रादेशिक ग्रामीण बँकांच्या भरती परीक्षा इंग्लिश आणि हिंदीशिवाय १३ प्रादेशिक भाषांतून घेण्याचा निर्णय घेतला आहे. रेल्वे आणि टपाल खात्याने आपल्या परीक्षा राज्यांच्या अधिकृत भाषांमधून घेण्यास सुरूवात केली आहे. आमच्या भाषांचे संरक्षण आणि भरभराट करण्यासाठी हे धाडसी निर्णय घेतले आहेत, असे अनेकांना वाटते.

जगातील सर्वात मोठी तरूणांची लोकसंख्या भारतात असून ६५ टक्के लोकसंख्या ३५ वर्षांच्या आत आहे. उर्जावान तरूणांना आपली मातृभाषा आणि बोली भाषा जिवंत ठेवण्यासाठी लाभांश दिला पाहिजे. आमच्या मुलांना आम्ही भाषेवर प्रेम करायला शिकवले पाहिजे आणि आम्ही पूर्वजांकडून जी सुंदर भाषक परंपरा घेतली आहे, तिचे संरक्षण आणि भरभराट करण्यासाठी त्यांना सुसज्ज केले पाहिजे. हे ताबडतोब आणि परिणामकारकरित्या केले नाही तर आमच्या एकमेव सांस्कृतिक ओळखीचे जतन करण्यावर गंभीर परिणाम होणार आहेत. आणखी एक संधी गेली, अशी नंतर खंत व्यक्त करणे आम्हाला परवडणार नाही.

आपण मातृभाषेचे पोषण करू या. सर्जनशीलता टवटवीत फुलाप्रमाणे फुलली पाहिजे. मातृभाषा ही अभिव्यक्तीची आत्मा आहे!

Intro:Body:

आपल्या समृद्ध भाषक परंपरा नष्ट व्हायला नको...

भारतात मातृभाषा म्हणून १९,५०० भाषा आणि बोली बोलल्या जातात, असे भाषक गणनेनुसार माहिती मिळते. भारतात दहा हजार लोकांकडून बोलल्या जाणाऱ्या १२१ भाषा आहेत. मात्र, आमच्या देशातील १९६ भाषा या धोक्यात आहेत, हे तथ्य अत्यंत दु:खदायक आहे. या लेखामध्ये भारताचे उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू म्हणतात, की ही संख्या वाढणार नाही याची काळजी आपण घ्यायला हवी. आम्हाला आमच्या भाषांचे संरक्षण आणि संवर्धन करावे लागेल आणि त्यासाठी एकमेव आणि सर्वोत्कृष्ट मार्ग म्हणजे त्याचा सातत्याने वापर करणे, हाच आहे.

भारत हा भाषक खजिन्याचा कोष आहे आणि आपल्या अतिविलक्षण भाषक आणि सांस्कृतिक वैविध्यासाठी व्यापक प्रमाणावर परिचित आहे, याचा आम्हाला अभिमान आहे. अनेक भाषांची बहुसंख्या आणि सहअस्तित्व आमच्या देशामध्ये अनेक रंग मिसळते आणि जीवनशक्ती प्रदान करून त्याला एकमेव अद्वितीय बनवते. परंतु, आम्ही आमची समृद्ध देशी भाषांचे जतन करण्यासाठी पुरेसे प्रयत्न करत नाही, यामुळे मी अत्यंत व्यथित आहे. सरकारने विशेषतः प्राथमिक आणि माध्यमिक स्तरावर शिक्षणाचे माध्यम ठरवण्यासंदर्भात धोरण स्वीकारताना दुप्पट काळजीपूर्वक राहण्याची गरज आहे. सर्जनशीलतेच्या अभिव्यक्तीसाठी मातृभाषा ही विस्तारित पाया घालून देऊ शकते. रचनात्मक अवस्थेत सर्जनशीलतेची पोषण करण्यासाठी सर्व प्रकारचे प्रयत्न केले पाहिजेत.

बौद्धिक आणि भावनिक अभिव्यक्तीसाठी भाषा हे साधन आहे. संस्कृती, वैज्ञानिक ज्ञान आणि जगाबाबत दृष्टीकोन यांचे आंतरपिढ्या संक्रमण करण्यासाठी ते वाहन आहे. भूतकाळ आणि वर्तमानकाळ यांना जोडणारा तो एक महत्वाचा, अदृष्य असा धागा आहे. मानवी उत्क्रांतीने तो उत्क्रांत होत जातो आणि सततच्या उपयोगाने त्याची भरभराट होते. आमच्या भाषा या आमचा इतिहास, आमची संस्कृती आणि समाज म्हणून आमच्या उत्क्रांतीचा  महत्वाचा भाग आहे. थोडक्यात, आमच्या भाषा या आमच्या दैनंदिन जीवनाच्या प्रत्येक पैलूमध्ये झिरपत असतात आणि आमच्या सभ्यतेचा मूळ पाया तयार करतात. वस्तुतः, वैयक्तिक आणि सामूहिक अशी आमची ओळख आणि आमच्या परंपरा तसेच चालीरीती यांच्या त्या जीवनाला अत्यावश्यक अशा रक्तवाहिन्या आहेत. लोकांमध्ये बंध तयार करण्यात आणि ते मजबूत करण्यात त्या अत्यंत महत्वाची भूमिका बजावतात. भारतात मातृभाषा म्हणून १९,५०० भाषा आणि बोली बोलल्या जातात, असे भाषक गणनेनुसार माहिती मिळते. भारतात दहा हजार लोकांकडून बोलल्या जाणाऱ्या १२१ भाषा आहेत.

भाषा या कधीही स्थिर नसतात. त्या चैतन्याने रसरसलेल्या, भोवतालच्या सामाजिक-आर्थिक वातावरणानुसार उत्क्रांत होत जाणार्या आणि स्वीकार करणार्या असतात.त्या वाढतात, आकुंचित पावतात, संक्रमित होतात, विलीन होतात आणि दु:खद रित्या शेवटी मरतात. महान भारतीय कवी आचार्य दंडी यांनी म्हटले आहे की, जर भाषांचा प्रकाश अस्तित्वात नसता तर, आम्ही अंधारात चाचपडत राहू. आमच्या देशातील १९६ भाषा या धोक्यात आहेत, हे तथ्य अत्यंत दु:खदायक आहे. हा आकडा वाढणार नाही, याची कदाचित आम्हाला खात्री करावी लागेल. आम्हाला आमच्या भाषांचे संरक्षण आणि संवर्धन करावे लागेल आणि त्यासाठी एकमेव आणि सर्वोत्कृष्ट मार्ग म्हणजे त्याचा सातत्याने वापर करणे, हाच आहे. आमच्या आगळ्यावेगळ्या आणि समृद्ध भाषक परंपरेचे संरंक्षण आणि संवर्धन करण्याच्या महत्वावर मी नेहमीच जोर दिला आहे,. आमच्या चैतन्यदायी नागरीकरणाच्या दीर्घ प्रवासात आम्हाला वारसा हक्काने मिळालेला खजिना, सामूहिक ज्ञानाचे कोठार आणि जमा केलेले शहाणपण गमावणे आम्हाला परवडणार नाही. जर आम्ही भाषा गमावली तर, आम्ही आमच्या ओळखीचा एक किमती भाग गमावून बसू.

जेव्हा एखादी भाषा मरते, तेव्हा ती तिच्याबरोबर संपूर्ण ज्ञानाची व्यवस्था आणि एक जगाकडे पाहण्याचा एकमेव परिप्रेक्ष्य घेऊन जाते. आमची विशेष कौशल्य, कला, हस्तकला, पाककला आणि व्यापार यांच्यासह पारंपरिक उपजीविकेचे प्रकारही अंतर्धान पावतात. भाषेची जपणूक आणि विकास करण्यासाठी बहुशाखीय पवित्र्याची गरज आहे. आमच्या शाळांमधून  आणि निश्चितच प्राथमिक स्तरावर शिक्षणाचे माध्यम मातृभाषा करून आम्ही सुरूवात केली पाहिजे. सर्व जगभरात विविध तज्ञ गटांनी केलेल्या अभ्यासात असे प्रस्थापित झाले आहे की, शिक्षणाच्या सुरूवातीच्या टप्प्यात मातृभाषा शिकवली तर मनाचा आणि विचारांचा विकास होण्यास चालना मिळते आणि मुलांना अधिक सर्जनशील आणि तार्किक बनवते.

युनेस्कोचे महासंचालक श्रीमती ऑड्रे अझौले यांनी, आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिनानिमित्त(२१ फेब्रुवारी) आपल्या संदेशात म्हटले आहे की, ``युनेस्कोसाठी प्रत्येक मातृभाषा परिचित असली पाहिजे, मान्यताप्राप्त आणि सार्वजनिक जीवनाच्या प्रत्येक वर्तुळात तिला अधिक प्रतिष्ठा मिळाली पाहिजे, यास ती पात्र आहे. मात्र हे नेहमी होत नाही. मातृभाषा यांना राष्ट्रीय किंवा अधिकृत किंवा शिक्षणाच्या भाषेचा दर्जा मिळतोच असे नाही. या स्थितीमुळे मातृभाषेची अवमूल्यन होते आणि दीर्घकाळात ती कालांतराने अंतर्धान पावते.’’ माझ्या मते, हा अगदी वेळेवर दिला गेलेला आणि महत्त्वाचा इशारा आहे.

आधुनिक जगात केवळ इंग्लिश शिक्षण विकासाची संधी देते, हा एक गैरसमज आहे. तो खरा नाही. इंग्लिश बोलणारे केवळ ऑस्ट्रेलिया, ब्रिटन, कॅनडा, अमेरिका असे मूठभर देश आहेत. चीन, जर्मनी, फ्रान्स, जपान, दक्षिण कोरिया आदी देश इंग्लिश शिक्षणाशिवाय चांगली प्रगती करून आहेत. इंग्लिश येणे हे इतर अनेक आंतरराष्ट्रीय भाषा शिकण्यासारखे आहे. काही जण सुचवत आहेत त्याप्रमाणे, मातृभाषेऐवजी त्यांचा वापर केला जाऊ शकत नाही. मातृभाषेतून पाया पक्का केल्यानंतर ती भाषा योग्य टप्प्यात शिकता येते. प्राथमिक स्तरावर शिक्षणाची भाषा मातृभाषा असावी, यासाठी आम्ही ठोस पावले उचलली पाहिजेतच, पण प्रशासन, बँकिंग आणि न्यायालयीन कामकाज यांची ती भाषा करण्यासाठी सर्व पावले उचलणे गरजेचे आहे. माझ्यासाठी हे, परिणामकारक लोकशाहीचे हे हृदय आहे. समावेशक प्रशासनाचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी सध्याचे भाषक अडथळे आपल्याला दूर करावे लागणार आहेत. जेथे जेथे सरकार आणि जनता यांच्यात संवाद आहे, तेथे जी भाषा लोक समजतात, तीच भाषा कायम असली पाहिजे. मी असे म्हणत  नाही की, आमच्या मुलांना अनेक भाषा शिकवू नयेत, ज्या साहित्य आणि विज्ञान या दोन्ही बाबतीत त्याच्या आकलनशक्तीचे क्षितीज व्यापक करण्यास आवश्यक आहेत. वस्तुतः,भारताला आपल्या मनुष्यबळाला समृद्ध करणे आणि ज्ञानआधारित अर्थव्यवस्थेत नेता  बनण्यासाठी हे फार आवश्यक आहे आणि कारण येणाऱ्या वर्षांत ते उत्क्रांत होणार आहे.

१९९९ मध्ये, युनेस्कोने बहुभाषक शिक्षणावर एक ठराव केला आणि त्यात किमान तीन भाषाचा वापर शिक्षणात करावा, असे सुचवले. मातृभाषा, एक प्रादेशिक आणि राष्ट्रीय भाषा आणि आंतरराष्ट्रीय भाषा. पण नमूद करण्यासारखी महत्वाची गोष्ट ही आहे की, मातृभाषेची मह्त्वाची भूमिका, जी, युनेस्कोने म्हटल्याप्रमाणे, `` ज्ञान आणि नाविन्यपूर्ण संशोधनाचा स्त्रोत आहे.’’ मातृभाषेतून दिलेली सूचना साधारण शिक्षण आणि इतर भाषा शिकण्यासाठी सुविधाजनक करते. नवीन राष्ट्रीय शिक्षण धोरणात घरेलू आणि मातृभाषांतून तसेच आदिवासी आणि चिन्ह भाषांतून शिक्षण  देण्याची अनेक सूचना समोर ठेवल्या आहेत, हे खूप उल्हासित करणारे आहे. प्रसंगोपात्त, संयुक्त राष्ट्रसंघाने २०१९ हे वर्ष स्वदेशी भाषाची जपणूक, पुनरूज्जीवन आणि स्वदेशी भाषांना उत्तेजन देण्यासाठी आंतरराष्ट्रीय स्वदेशी भाषा वर्ष म्हणून जाहीर केले. भारतात आपल्याकडे अनेक आदिवासी भाषा आहेत, ज्या जवळपास लोप पावण्याकडे निघाल्या आहेत.

मला आशा आहे की, घरात, समुदायात,बैठकांमध्ये आणि प्रशासनात लोक देशी भाषा वापरण्यास सुरूवात करतील. अधिक लोकांनी कविता, कथा, कादंबर्या आणि नाटके भारतीय भाषामधून लिहावीत. जे या भाषांतून बोलतात, लिहितात आणि संवाद साधतात, त्यांना आम्ही  प्रतिष्ठा आणि अभिमानाची जाणीव करून दिली पाहिजे. भारतीय भाषांतील प्रकाशने, नियतकालिके आणि मुलांच्या पुस्तकांना प्रोत्साहन दिले पाहिजे. बोली भाषा आणि  लोकसाहित्यावर पुरेसा फोकस दिला पाहिजे. समावेशक विकासाची भाषा ही उत्प्रेरक बनली पाहिजे. भाषेला प्रोत्साहन हा चांगल्या प्रशासनाचा अंतर्गत घटक बनला पाहिजे. स्वामी विवेकानंद यांनी एकदा म्हटले होते की, राष्ट्राच्या प्रगतीची भाषा ही मुख्य साधन आणि निर्देशांक असते. आमच्या भाषांनी समूहाच्या सक्षमीकरणाचे साधन म्हणून काम केले पाहिजे.

राज्यसभेत, तिच्या सदस्यांनी आपल्या अधिसूचीतील २२ भाषेतून व्यक्त करण्याची तरतूद करण्यात आली आहे. भारताच्या सर्वोच्च न्यायालयाने आपला निकाल सहा देशी भाषांतून उपलब्ध करण्याचा निर्णय घेतला आहे. भाषक अडथळे दूर करण्याच्या दिशेने आणि समान न्याय सर्वाना मिळण्यासाठी हे सकारात्मक पाऊल आहे. अर्थमंत्रालयाने प्रादेशिक ग्रामीण बँकांच्या भरती परीक्षा इंग्लिश आणि हिंदीशिवाय १३ प्रादेशिक भाषांतून घेण्याचा निर्णय घेतला आहे. रेल्वे आणि टपाल खात्याने आपल्या परीक्षा राज्यांच्या अधिकृत भाषांमधून घेण्यास सुरूवात केली आहे. आमच्या भाषांचे संरक्षण आणि भरभराट करण्यासाठी हे धाडसी निर्णय घेतले आहेत, असे अनेकांना वाटते.  

जगातील सर्वात मोठी तरूणांची लोकसंख्या भारतात असून ६५ टक्के लोकसंख्या ३५ वर्षांच्या आत आहे. उर्जावान तरूणांना आपली मातृभाषा आणि बोली भाषा जिवंत ठेवण्यासाठी लाभांश दिला पाहिजे. आमच्या मुलांना आम्ही भाषेवर प्रेम करायला शिकवले पाहिजे आणि आम्ही पूर्वजांकडून जी सुंदर भाषक परंपरा घेतली आहे, तिचे संरक्षण आणि भरभराट करण्यासाठी त्यांना सुसज्ज केले पाहिजे. हे ताबडतोब आणि परिणामकारकरित्या केले नाही तर आमच्या एकमेव सांस्कृतिक ओळखीचे जतन करण्यावर गंभीर परिणाम होणार आहेत. आणखी एक संधी गेली, अशी नंतर खंत व्यक्त करणे आम्हाला परवडणार नाही.

आपण मातृभाषेचे पोषण करू या. सर्जनशीलता टवटवीत फुलाप्रमाणे फुलली पाहिजे. मातृभाषा ही अभिव्यक्तीची आत्मा आहे!

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.