'संसदेने एकमताने परवानगी दिली असल्याने आपण सर्वजण मिळून पाकव्याप्त काश्मीरला मुक्त करू आणि भारताशी जोडू. आपण सर्वजण त्या सर्वशक्तिमान परमेश्वराची प्रार्थना करू की, हा क्षण पाहण्याचे भाग्य आपल्या सर्वांना लाभावे,' असे जितेंद्र सिंह यांनी म्हटले आहे.
राजनाथ सिंह यांनी हरियाणा येथे बोलताना याआधीच पुढील धोरण स्पष्ट केले होते. त्यांनी 'आता फक्त पाकव्याप्त काश्मीरविषयीच पाकशी चर्चा होऊ शकते,' असे म्हटले होते.
'चर्चा का करावी? कोणत्या मुद्द्यांवर चर्चा करावी? पाकिस्तानने दहशतवादाला आश्रय देणे बंद केल्यानंतरच त्यांच्याशी चर्चा होऊ शकते. चर्चा सुरू झालीच तर, ती केवळ पाकव्याप्त काश्मीरविषयीच असेल. इतर कोणत्याही मुद्द्यावर नाही,' असे जितेंद्र सिंह म्हणाले.