ETV Bharat / bharat

निकिता हत्याकांड प्रकरणात तरुणांचा रोष, पोलिसांवर केली दगडफेक - निकिता हत्याकांड लाठीचार्ज

निकिता तोमर हत्याकांड प्रकरणी तरुणांमध्ये आज तीव्र रोष पाहायला मिळाला. निकिताच्या आरोपींना लवकरात लवकर फाशी देण्याच्या मागणीसाठी हिंसक झालेल्या जमावाने राष्ट्रीय महामार्ग रोखून धरला. महामार्ग रोखल्यामुळे पोलिसांनी लाठीचार्ज केल्याने मोठा गोंधळ झाला होता. पोलिसांनी लाठीचार्ज करताच तरुणांनी त्यांच्यावर दगडफेक करायला सुरुवात केली होती.

nikita murder case update
निकिता हत्याकांड महापंचायत
author img

By

Published : Nov 1, 2020, 5:40 PM IST

फरिदाबाद - निकिता तोमर हत्याकांड प्रकरणी तरुणांमध्ये आज तीव्र रोष पाहायला मिळाला. रविवारी सर्व समाजाची महापंचायत बोलावण्यात आली होती. यावेळी निकिताच्या आरोपींना लवकरात लवकर फाशी देण्याची मागणी करण्यात आली. या मागणीसाठी हिंसक झालेल्या जमावाने राष्ट्रीय महामार्ग रोखून धरला. महामार्ग रोखल्यामुळे पोलिसांनी लाठीचार्ज केल्याने मोठा गोंधळ झाला होता. पोलिसांनी लाठीचार्ज करताच तरुणांनी त्यांच्यावर दगडफेक करायला सुरुवात केली होती.

निकिता हत्याकांड प्रकरणात तरुणांचा रोष

महापंचायतसाठी परवानगी नव्हती

डीसीपी सुमेर यांनी या महापंचायत आयोजित करण्यासाठी परवानगी नसल्याचे सांगितले. तसेच गर्दी न करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. काही तरुणांनी दगडफेक केल्याने लाठीचार्ज करावा लागला, त्यांचा शोध घेण्यात येत आहे. तर आता परिस्थिती नियंत्रणात असल्याचेही त्यांनी सांगितले आहे.

तरुणांनी केली दगडफेक

निकिताला न्याय मिळवून देण्यासाठी रविवारी वल्लभगडच्या दशहरा मैदानात महापंचायतचे आयोजन केले होते. विविध समाजाच्या लोकांनी मिळून हे आयोजन केले होते. महापंचायत दरम्यान आरोपींना फाशीची शिक्षा देण्याची मागणी करण्यात आली. मात्र तरुणांचा रोष वाढला आणि त्यांनी महामार्ग रोखून धरला. त्यावेळी पोलिसांचा मोठा फौजफाटा दाखल झाला आणि तरुणांना शांत करण्याचा व्यर्थ प्रयत्न केला. तरुणांनी आपल्या हातात लाठ्या घेऊन जवळपास असललेल्या हॉटेल्सची तोडफोड करायला सुरुवात केली ज्यानंतर पोलिसांनी लाठीचार्ज केला. पोलिस आणि संतप्त जमावामध्ये दगडफेकही झाली. काहीव वेळात पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणली आहे. महामार्ग पुन्हा सुरु करण्यात आला आहे. महापंचायतमध्ये निकिताच्या कुटुंबातील कोणीही सदस्य उपस्थित नव्हते. फरिदाबादमधील विविध भागातील आणि समाजातील लोक याठिकाणी एकत्र जमले होते.

काय आहे प्रकरण -

सोमवारी पीडित मुलगी परीक्षा देऊन घरी जात असताना आरोपी तौसीफने गोळ्या घालून तिची हत्या केली. आरोपीने या तरुणीला आधी गाडीमध्ये बसवून तिचे अपहरण करण्याचा प्रयत्न केला. मात्र, तरुणीने याला विरोध केल्याने या त्याने तिच्यावर गोळीबार केला, त्यात तिचा मृत्यू झाला. मंगळवारी तौसीफ आणि त्याचा साथीदार रेहान याला अटक करण्यात आली. या घटनेचे सीसीटीव्ही फुटेजदेखील समोर आले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.