ETV Bharat / bharat

'पीडित कुटुंबाला वाय दर्जाची सुरक्षा पुरवावी', चंद्रशेखर आझाद यांची मागणी - हाथरस बलात्कार प्रकरण लेटेस्ट न्यूज

काँग्रेस नेत्यानंतर आज सपाच्या शिष्टमंडळाने पीडित मुलीच्या कुटूंबाची भेट घेण्यासाठी हाथरस गाठले. यावेळी परिस्थिती नियंत्रणात न आल्यावर पोलिसांनी सपाच्या कार्यकर्त्यांवर लाठीचार्ज केला. तसेच उत्तर प्रदेश पोलिसांनी भीम आर्मीचे प्रमुख चंद्रशेखर आझाद यांना हाथरसमध्ये जाण्यापासून रोखले.

हाथरस
हाथरस
author img

By

Published : Oct 4, 2020, 5:26 PM IST

Updated : Oct 4, 2020, 6:10 PM IST

नवी दिल्ली - हाथरस सामूहिक बलात्कार पीडितेच्या मृत्यूनंतर देशभरातून निषेध व्यक्त करण्यात येत आहे. काँग्रेस नेत्यानंतर आज सपाच्या शिष्टमंडळाने पीडित मुलीच्या कुटूंबाची भेट घेण्यासाठी हाथरस गाठले. यावेळी सपाच्या कार्यकर्ते आणि पोलिसांमध्ये वाद झाला. परिस्थिती नियंत्रणात न आल्यावर पोलिसांनी सपा कार्यकर्त्यांवर लाठीचार्ज केला. तथापि, भीम आर्मीचे प्रमुख चंद्रशेखर आझाद यांनी हाथरस पीडित कुटुंबाची भेट घेतली.

  • Bhim Army Chief Chandrashekhar Azad meets family of the alleged gangrape victim in #Hathras. He says,"I demand 'Y security' for the family or I'll take them to my house, they aren't safe here. We want an inquiry to be done under the supervision of a retired Supreme Court judge" pic.twitter.com/AHhBF1no5c

    — ANI UP (@ANINewsUP) October 4, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

सरकारने पीडित कुटुंबाला वाय दर्जाची सुरक्षा पुरवावी. अथवा मी त्यांना माझ्या घरी घेऊन जातो. ते येथे सुरक्षित नाहीत. सर्वोच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायाधीशांच्या निरीक्षणाखाली संपूर्ण प्रकरणाची चौकशी व्हावी, अशी मागणी चंद्रशेखर आझाद यांनी केली.

हाथरस गावात एसपी आणि आरएलडी कार्यकर्त्यांनी बॅरिकेड्स तोडून पोलिसांवर दगडफेक केली. यानंतर पोलिसांकडून कार्यकर्त्यांवर लाठीचार्ज केला. संघर्षाची परिस्थिती लक्षात घेता अतिरिक्त दलाचीही मागणी करण्यात आली आहे.

सपाच्या कार्यकर्त्यांवर पोलिसांकडून लाठीचार्ज
चंद्रशेखर आझाद हाथरसमध्ये दाखल...

दरम्यान, राज्यामध्ये महिलांवरील अत्याचाराच्या घटना वाढल्याचे म्हणत विरोधी पक्षांनी योगी आदित्यनाथ सरकारला धारेवर धरले आहे. संपूर्ण उत्तर प्रदेश राज्य आणि भारतात महिला अत्याचारांविरोधात आंदोलन होत आहेत. हाथरस गावात पोलिसांचा कडोकोड बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. तर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी सीबीआय चौकशीचे आदेश दिले आहेत.

Last Updated : Oct 4, 2020, 6:10 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.