लखनऊ - उत्तर प्रदेश येथील कामगारांसाठी नाशिक येथून पाठवण्यात आलेली श्रमिक विशेष रेल्वे आज (रविवार) पहाटे 6 वाजता चारबाग स्थानकावर पोहचली. चारबाग रेल्वे स्थानकात या कामगारांसाठी विशेष व्यवस्था करण्यात आली होती. ही विशेष रेल्वे शनिवारी सकाळी अकराच्या सुमारास नाशिकहून लखनऊच्या दिशेने रवाना झाली होती. रविवारी पहाटे 6 वाजताच लखनऊच्या चारबाग स्थानकात तीचे आगनम झाले. या ट्रेनमध्ये सुमारे 847 मजूर होते. विशेष रेल्वेमध्ये एकूण 17 डबे लावण्यात आले होते.
हेही वाचा... मालेगाव शहरात कोरोनाचा धुमाकूळ, एकट्या मालेगावात 298 रुग्ण..
चारबाग रेल्वे स्थानकात ही रेल्वे पाहचल्यानंतर कामगारांना आपल्या जागेवरच बसून राहण्याच्या सुचना देण्यात आल्या. यानंतर सोशल डिस्टन्सिंगचे पालन करत सर्व कामगारांना एक-एक करून बाहेर काढण्यात आले.बाहेर पडल्यानंर मजुरांच्या 2 रांगा बनवण्यात आल्या. ज्यात एकमेकांमध्ये किमान एक मीटर अंतर ठेवले गेले.चारबाग रेल्वे स्थानकाच्या आवारातच वैद्यकीय पथक तयार होते. या पथकाने येणार्या सर्व प्रवाशांचे थर्मल स्क्रिनिंग करून त्यांनी पुढे पाठवले. तसेच सर्व प्रवाशांसाठी जेवणाचे स्टॉल देखील येथे लावण्यात आले होते, त्यांना येथे जेवणाची पाकिटे वाटण्यात आली.