नवी दिल्ली - गणेशोत्सावानिमित्त देशभरात भाविकांमध्ये उत्साह पाहायला मिळत आहे. या निमित्ताने कोरबा जिल्हा पुरातत्व संग्रहालयाचे मार्गदर्शक हरीसिंह क्षत्री यांनी लाकडी पेन्सिलच्या टोकावर बाप्पांची आकृती कोरली आहे. कलाकाराने पेन्सिलच्या टोकावर घडवलेल्या अद्भुत कलाकृती थक्क करणाऱ्या आहेत. फक्त काही तासांमध्ये त्यांनी या आकृती कोरली आहे.
पुरातत्व, फाइन आर्ट आणि शिल्पकलेचा अभ्यास करत असलेल्या हरीसिंह क्षत्री यांनी वेगवेगळ्या पेन्सिलच्या टोकावर गणेशाची आकृती कोरली आहे. या माध्यमातून त्यांनी शिल्पकलेचा उत्तम नमुना सादर केला आहे. हे काम शिकण्यासाठी ते बऱ्याच काळापासून अभ्यास करत होते, असे त्यांनी सांगितले.
हजारो कलाकार बर्याच वर्षांपासून राज्यात अस्तित्वासाठी संघर्ष करत आहेत. पण, त्यांना व्यासपीठ मिळत नाही. जेव्हा राज्योत्सव किंवा इतर कार्यक्रमांमध्ये कला दाखवण्याची आवश्यकता असते, तेव्हाच सरकार त्यांची आठवण येते. कलाकारांना प्रोत्साहनाची आवश्यकता आहे, असेही ते म्हणाले.