ETV Bharat / bharat

वादग्रस्त जमीन रामल्लाचीच; मुस्लीम पक्षकारांना पर्यायी जागा मिळणार -

आज सर्वोच्च न्यायालयाने अयोध्येतील राम मंदिर -बाबरी मशीद वादग्रस्त जमीन प्रकरणी ऐतिहासिक निकाल दिला.

सर्वोच्च न्यायालय
author img

By

Published : Nov 9, 2019, 4:44 PM IST

नवी दिल्ली - आज सर्वोच्च न्यायालयाने अयोध्येतील राम मंदिर -बाबरी मशीद वादग्रस्त जमीन प्रकरणी ऐतिहासिक निकाल दिला. या निकालात न्यायालयाने ही वादग्रस्त जमीन रामलल्लाची असल्याचे स्पष्ट केले आहे. तसेच प्रतिवादी मुस्लीम पक्षकारांना अयोध्येत पाच एकर पर्यायी जागा उपलब्ध करून देण्यात येईल, असेही न्यायालयाने स्पष्ट केले आहे.

आज सकाळी १०.३० वाजता सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्या अध्यक्षतेखालील ५ सदस्यीय खंडपीठाने निकाल देण्यास सुरुवात केली. सुरुवातीला त्यांनी फैजाबाद न्यायालयाच्या निकालाला आवाहन देणारी शिया वक्फ बोर्डाची याचिका फेटाळली. फैजाबाद न्यायालयाचा १९४६ चा निर्णय तसाच राहणार असल्याचे न्यायालयाने स्पष्टे केले. त्यानुसार अयोध्या प्रकरणी सर्वोच्च न्यायालय आज (शनिवार) आपला निकाल जाहीर केला.यामध्ये सर्वोच्च न्यायालयाने वादग्रस्त जागा रामलल्लाचीच असल्याचे स्पष्ट केले आहे. तर मुस्लीम पक्षकारांना अयोध्येत ५ एकर पर्यायी जागा देण्याचे आदेश देण्यात आले आहेत. ही पर्यायी जागा केंद्र किंवा राज्य सरकार कोणीही देऊ शकते. या निकालानुसार वादग्रस्त असलेली २.७७ एकर जागा ही केंद्र सरकार नियंत्रित ट्रस्टला मिळणार असल्याचे न्यायालयाने या निकालात स्पष्ट केले.

निकालातील ठळक मुद्दे -
गोगोई म्हणाले बाबरी मशीद मीर बाकी यांनी बांधली, मात्र न्यायालयाने त्याच्या खोलात जाणे योग्य नाही. न्यायालय जनभावनेचा आणि आस्थेचा स्वीकार करते, त्यासाठी न्याय देताना समतोल राखणे गरजेचे आहे. तसेच यावेळी न्यायालयाने निर्मोही आखाड्याचा वादग्रस्त जागेवर दावा करणारी याचिका फेटाळून लावली आहे. मात्र त्यांना केंद्र सरकारच्या अख्यातरीत स्थापन करण्यात येणाऱ्या ट्रस्टमध्ये समाविष्ट करण्यात आले आहे.

तसेच पुरातत्व विभागाच्या अहवलानुसार ही मशिद रिकाम्या जागेत बांधण्यात आली नसून त्या ठिकाणचा पाया हा इस्लामिक पद्धतीचा नसल्याचेही न्यायालयाने स्पष्ट केले आहे.

हिंदूंच्या आस्थेनुसार रामाचा जन्म अयोध्येत झाला आहे. त्या जागेलाच मुस्लीम बाबरी मशीद म्हणतात. मात्र श्रद्धा ही प्रत्येकाची वैयक्तीक बाब आहे. मात्र, हिंदू ज्या प्रमाणे दावा करतात त्यानुसार ऐतिहासिक दाखल्यामधून अयोध्या हेच प्रभु रामांचे जन्मस्थान आहे हे स्पष्ट होते. तसेच ऐतिहासिक दाखल्यानुसार ब्रिटिश येण्यापूर्वीपासूनच हिंदूकडून राम चबुतरा, सीताची रसोई या ठिकाणी पूजा केली जात होती. तसेच मुस्लीम तिथे नियमित नमाज पडत नव्हते, मात्र हिंदूकडून त्या जागेवर नियमित पूजापाठ करत राहिले. त्यानंतर हिंदूकडून गाभाऱ्यावरही दावा करण्यात आला असल्याचे न्यायालयाने नमूद केले आहे. मशिदीत १५२८ ते १९४९ पर्यंत नमाज पडला जात होता. मात्र १८५६ - ५७ काळात नमाज पठण होत होते याचे पुरावे उपलब्ध नसल्याचेही न्यायालयाने म्हटले आहे.

या ठिकाणी मुस्लीम मशिदीच्या आतिल बाजूस नमाज पठण करत, तर हिंदू बाहेरील बाजूस पूजा करत होते. मात्र हिंदूकडून मशिदीच्या गर्भगृहातच रामाचा जन्म झाल्याचा दावा केला जात होता.

Intro:Body:

dsds

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.