मेष - आज शारीरिक व मानसिक अस्वास्थ्याचा अनुभव येईल. सर्दी, खोकला, ताप इत्यादींचा त्रास होईल. पारमार्थिक काम करताना दाम खर्च करावा लागेल. त्यामुळे खर्च वाढेल. मोहाच्या प्रलोभना पासून दूर राहणे योग्य ठरेल. जमीन, घर इत्यादींच्या कागदपत्रात फसवणूक होण्याची शक्यता आहे. आईची प्रकृती बिघडेल. निर्णय शक्ती डळमळीत राहिल्यामुळे द्विधा अवस्थेत अडकाल.आज कोणाला जामीन राहू नये.
वृषभ - आज आपली प्राप्ती व व्यापार ह्यात वाढ होईल. व्यापारात नवीन लाभदायक संपर्क वाढतील. कुटुंबीय व मित्रांसह हसण्या - खेळण्यात क्षण घालवण्याची संधी मिळेल. प्रवास - पर्यटनाचे योग आहेत. आज विशेषतः महिला वर्गाकडून लाभ होतील. वैवाहिक जोडीदाराशी जिव्हाळ्याचे संबंध निर्माण होऊन जवळीक वाढेल. भावंडे व वडीलधार्यां कडून लाभ होतील. शारीरिक व मानसिक स्वास्थ्य उत्तम राहील.
मिथुन - आज आपले प्रत्येक काम सुरळितपणे पार पडेल. घर, कार्यालय व सार्वजनिक ठिकाणी अनुकूल वातावरण राहिल्याने मनास प्रसन्न वाटेल. मान - सन्मान वाढतील. वरिष्ठांच्या सहकार्यामुळे आपल्या प्रगतीचा मार्ग रुंदावेल. कौटुंबिक जीवनात आनंद पसरेल. सांसारिक सुख उत्तम मिळेल. आज सरकारी कामात येणारे अडथळे दूर होऊन आपला मार्ग मोकळा होईल.
कर्क - आज शारीरिक व मानसिक स्वास्थ्या बरोबरच भाग्योदयाची संधी आपली प्रसन्नता वाढवेल. परदेशातून सुखद बातम्या येतील. मंगल कार्य, प्रवास ह्यामुळे आपल्या आनंदात भर पडेल. कुटुंबियांसह चांगल्या प्रकारे वेळ जाईल. परदेशगमनाची इच्छा बाळगणारे, तसेच नोकरदारांना लाभ होण्याची शक्यता आहे.
सिंह - आज प्रकृतीकडे विशेष लक्ष द्यावे लागेल. त्यासाठी पैसा सुद्धा खर्च होऊ शकतो. आज घरचे पदार्थ खाणे अधिक फायदेशीर होऊ शकेल. नकारात्मक विचार मनात येतील, ते दूर करावे लागतील. मानसिक शांतता लाभण्यासाठी योग्य मार्गदर्शन घ्यावे व त्यासाठी प्रयत्न सुद्धा करावेत.
कन्या - आज सामाजिक व सार्वजनिक क्षेत्रांत लाभाबरोबरच प्रसिद्धी सुद्धा मिळेल. स्त्री वर्गाकडून विशेष लाभ होईल. दांपत्य जीवनात परमोच्च सुखाचे क्षण अनुभवाल. नव्या वस्त्रालंकाराची खरेदी करून ते वापरण्याची संधी मिळेल. भिन्नलिंगी व्यक्तींशी परिचय होईल. त्यांच्याशी मैत्री जुळेल. आजचा दिवस भागीदारीसाठी अनुकूल आहे. प्रवास पर्यटनाची शक्यता आहे.
तूळ - आजचा दिवस अत्यंत लाभदायी आहे. नोकरीत यश मिळेल. घरातील वातावरण सुखद राहील. प्रतिस्पर्ध्यांवर मात कराल. कामाच्या ठिकाणी सहकारी चांगले सहकार्य करतील. मातुल घराण्याकडून चांगल्या बातम्या मिळतील. प्रकृती उत्तम राहील. बौद्धिक चर्चेत भाग घेण्याची संधी मिळेल. विद्यार्थ्यांना अभ्यासात यश मिळेल. आजचा दिवस आर्थिक योजना बनविण्यासाठी अनुकूल आहे. परिश्रम प्रगति पथावर नेतील. संतती विषयक आनंददायी बातम्या समजतील. भिन्नलिंगी व्यक्तींचे आकर्षण राहील.
वृश्चिक - आज आपल्या घरगुती जीवनात शांतीचे व आनंदाचे वातावरण राहील. तसेच आरोग्य उत्तम राहील. आजारी माणसाच्या प्रकृतीत सुधारणा होईल. कार्यालयात सहकारी लोकांचे सहकार्य पूर्णपणे मिळेल. मैत्रिणी भेटतील. स्त्रीयांना माहेरहून चांगली बातमी समजेल. धन लाभ होईल व खोळंबलेली कामे मार्गी लागतील.
धनू - आज मनात औदासिन्य दिसून येईल. शारीरिक उत्साह व मानसिक तरतरी ह्यांचा अभाव असेल. कुटुंबीयांशी तणावाच्या प्रसंगामुळे घरातील वातावरण कलुषित होईल. एखादी मानहानी संभवते. वित्तहानी सुद्धा संभवते. जमीन वा वाहना संबंधीची कागदपत्रे सावधपणे तयार करा.
मकर - आजचा दिवस नवीन कार्य हाती घेण्यास अनुकूल आहे. नोकरी, व्यापार व दैनंदिन कामात अनुकूल स्थिती असल्याने मन प्रसन्न राहील. भावंडां कडून सहकार्य मिळून लाभ सुद्धा होतील. आर्थिक लाभ संभवतात. विद्यार्थ्यांना विनासायास अभ्यास करता येईल.
कुंभ - आज वाद - विवाद होण्याची शक्यता आहे. एखाद्या मांगलिक कार्यासाठी खर्च होईल. घरातील वातावरण कलुषित होईल. कामात अपयश आल्याने मन दुःखी होऊन नैराश्य येईल. आज प्रकृतीकडे लक्ष द्यावे लागेल. निर्णय क्षमतेचा अभाव दिसून येईल.
मीन - आजचा दिवस शुभ फलदायी आहे. उत्साह व स्वास्थ्य टिकून राहील. नवीन कार्यारंभासाठी दिवस अनुकूल आहे. मित्र व कुटुंबीयांसह भोजनाचा आस्वाद घ्याल. धनलाभ संभवत असला तरी खर्च वाढणार नाही ह्याकडे लक्ष द्यावे लागेल. एखादा प्रवास संभवतो. कार्यात यशस्वी व्हाल.