मेष - आज आपल्या एखाद्या कामास किंवा प्रकल्पास सरकारी लाभ मिळतील. कामाच्या ठिकाणी महत्वाच्या मुद्दया संबंधी वरिष्ठांशी विचार - विनिमय होतील. कार्यालयीन कामानिमित्त प्रवास करावा लागेल. कार्यभार वाढेल. कौटुंबिक गोष्टीत मनापासून रस घेऊन कुटुंबियाबशी सल्ला - मसलात कराल. गृहसजावटीचे आयोजन कराल. आईशी जास्त जवळीक निर्माण होईल.
वृषभ - आज विदेश गमनाच्या सुवर्णसंधी येतील. परदेशातील मित्राकडून बातम्या समजतील. व्यापार्यांना व्यापारात धनलाभ होईल. नवे बेत हाती घ्याल. दूरचे प्रवास होतील. एखाद्या विषयात प्रगती होईल. संततीची प्रगती होईल. आरोग्याकडे लक्ष द्यावे लागेल.
मिथुन - आज संतापाची भावना आपले नुकसान करेल. आजारी व्यक्तींची तपासणी किंवा शस्त्रक्रिया करावी लागेल. मितभाषी राहून मतभेद दूर करू शकाल. खर्चाचे प्रमाण वाढेल. प्रकृती बिघडेल. मानसिक दृष्टया निराश व्हाल. मनाला शांतता मिळण्यासाठी प्रयत्न करावे लागतील.
कर्क - आज संवेदनशीलता व प्रेमाने व्याप्त होऊन आपले मन भिन्नलिंगी व्यक्तीकडे आकर्षित होईल. मौल्यवान मौज - मजेच्या वस्तू, वस्त्राभूषणे तथा वाहन इत्यादींची खरेदी होईल. दांपत्य जीवन उत्तम राहील. व्यापार्यांना विदेशी व्यापारात चांगला फायदा होईल. भागीदारी फायदेशीर ठरेल. प्रणयाराधनात सफलता मिळेल.
सिंह - आज उदासीनता व साशंक वृत्ती आपल्या मनाला अस्वस्थ करेल. दैनंदिन कामे पूर्ण व्हायला विलंब लागेल. खूप परिश्रम कराल पण त्यामानाने कमी फळ मिळेल. नोकरीत सांभाळून राहा. सहकारी फारसे सहकार्य करणार नाहीत. मातुल घराण्या कडून काळजी वाटणार्या बातम्या येतील. शत्रूला तोंड द्यावे लागेल. वरिष्ठांशी मतभेद संभवतात.
कन्या - आजचा दिवस चिंता व उद्वेगाने भरलेला असेल. पोटाच्या त्रासामुळे प्रकृती बिघडेल. विद्यार्थ्यांना अभ्यासात अडचणी येतील. अचानक धनखर्च होईल. बौद्धिक चर्चेत असफल व्हाल. प्रियव्यक्तीचा सहवास लाभेल. भिन्नलिंगी व्यक्तीकडे आकर्षित व्हाल. शेअर, सट्टा ह्यापासून दूर राहणे उचित ठरेल.
तूळ - आज सावध राहावे लागेल. वैचारिक सुज्ञपणा मानसिक स्वास्थ्य देईल. माता व स्त्री वर्गाची चिंता राहील. आज शक्यतो प्रवास स्थगित ठेवा. वेळेवर भोजन व पुरेशी झोप न मिळाल्याने शारीरिक अस्वास्थ्य जाणवेल. कौटुंबिक मिळकती संबंधी सावधपणे काम करणे हितावह ठरेल.
वृश्चिक - आज कामात यश मिळून आर्थिक लाभ होतील. नशिबाची साथ मिळेल. भावंडांशी कौटुंबिक चर्चा व नियोजन होईल. तन - मन स्फूर्ती व चैतन्याने भरून जाईल. मित्र, सगे सोयरे यांचे आपणाकडे येणे झाल्याने आपण आनंदी राहाल. गूढ विद्यांच्या अभ्यासात रस घ्याल. जवळपासचा प्रवास होईल.
धनू - आज कुटुंबीयांशी गैरसमज व मतभेद होतील. वायफळ खर्च होईल. मानसिक चंचलता व द्विधा मनःस्थिती ह्यामुळे महत्वाचे निर्णय आज आपण घेऊ शकणार नाही. कामात अपेक्षित यश मिळणार नाही. दूरसंचार माध्यमातून दूरच्या ठिकाणी होणारा संपर्क लाभदायक ठरेल.
मकर - आजच्या दिवसाची सुरवात प्रसन्न वातावरणाने होईल. घरात मंगलमय वातावरण राहील. मित्र तसेच सगेसोयरे यांच्याकडून भेटवस्तू मिळाल्याने आनंद होईल. कामे सहजपणे पूर्ण होतील. नोकरी - व्यवसायात लाभ होईल. प्रकृती उत्तम राहिली तरी सुद्धा कोठे पडणे, जखम होणे यांपासून जपावे लागेल.
कुंभ - आज आर्थिक देवाण- घेवाण किंवा जामीनकीत आपली फसवणूक होण्याची शक्यता आहे. एकाग्रता न झाल्याने मानसिक अस्वास्थ्य वाढेल.प्रकृती विषयी समस्या उदभवतील. आर्थिक गुंतवणूक अयोग्य ठिकाणी होणार नाही याची दक्षता घ्यावी लागेल. कुटुंबियांशी पटणार नाही. गैरसमज, दुर्घटना यापासून जपून राहावे. एखाद्याचे भले करण्याच्या नादात स्वतःचे नुकसान होण्याची वेळ येईल.
मीन - आज समाजात सर्वश्रेष्ठ स्थान प्राप्त कराल. सामाजिक कामात भाग घ्यावा लागेल. वडिलधारी व मित्रांचा सहवास लाभेल. मित्रमंडळीत नव्या मित्रांची भर पडेल. नोकरी - व्यवसायात उत्पन्न वाढेल. संतती व पत्नीकडून लाभ होतील. मंगल कार्य आयोजित कराल. विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील. प्रवासाचे नियोजन कराल.