ETV Bharat / bharat

राशीभविष्य ..वाचा कसा जाईल तुमचा आजचा दिवस... - आजचे राशीभविष्य

वाचा आजचे आपले राशीभविष्य..

राशीभविष्य
राशीभविष्य
author img

By

Published : Jan 19, 2020, 7:29 AM IST

Updated : Jan 19, 2020, 7:56 AM IST

मेष - आज संपूर्ण दिवस आप्तेष्टांसह हर्षोल्हासात घालवू शकाल. नव्या वस्त्रांची व दागिन्यांची खरेदी करू शकाल. सामाजिक क्षेत्रात मान - सन्मान होतील. दुपारनंतर मात्र आपणास संयमित राहावे लागेल. नव्या ओळखी विचारपूर्वक कराव्यात. खर्चात वाढ होईल. एखादे नुकसान संभवते. आरोग्याची काळजी घ्यावी लागेल. आपल्या कृती नियंत्रित ठेवा.

वृषभ - आजचा दिवस व्यावसायिकांसाठी लाभदायी आहे. कौटुंबिक वातावरण आनंदी असेल. प्रतिस्पर्ध्यांवर मात करू शकाल. व्यवसायात सहकारी आपणांस मदत करतील. दुपार नंतर मनोरंजनाचा आनंद लुटाल. एखाद्या सहलीचा बेत ठरवू शकाल. भागीदारांशी मतभेद संभवतात.

मिथुन - आजचा दिवस मध्यम फलदायी आहे. कामात अडचणी येतील. वाद होण्याची शक्यता असल्याने बौद्धिक चर्चेत आज सहभागी न होणे हितावह राहील. संतती विषयक काळजी निर्माण होईल. दुपार नंतर घरातील वातावरण शांत असल्याने मानसिक दृष्टया आपणास ताजेतवाने वाटेल. शारीरिक स्वास्थ्य सुधारेल. व्यवसायात सहकारी अपेक्षित सहकार्य करतील. आर्थिक लाभ होतील. कामात यशस्वी व्हाल.

कर्क - आज शारीरिक व मानसिक अस्वस्थता जाणवेल. प्रवासात त्रास संभवतो. जमीन व वाहन या विषयीच्या समस्या भेडसावतील दुपार नंतर परिस्थितीत बदल होईल. शांतता लाभेल. मित्रांचे सहकार्य मिळेल. शारीरिक उत्साह वाढेल. अती विचाराने मन विचलित होण्याची शक्यता आहे.

सिंह - आजचा दिवस प्रवासास अनुकूल आहे. परदेशस्थ नातेवाईकां कडून एखादी चांगली बातमी मिळू शकेल. धनलाभ संभवतो. नवीन कार्य हाती घेऊ शकाल. दुपार नंतर आपली सहनशीलता दिसून येईल. नैराश्य येण्याची शक्यता आहे. आरोग्य नरम गरम राहील. कौटुंबिक किंवा संपत्ती संबंधी एखादी समस्या उदभवेल.

कन्या - आज आपली मानसिक स्थिती द्विधा असल्याने नवीन कार्याचा आरंभ करण्यात त्रास होईल. कुटुंबियांशी वाद होऊन आपले मन दुखावले जाण्याची शक्यता असल्याने आपल्या वक्तव्यावर संयम ठेवावा लागेल. शारीरिक व मानसिक आरोग्याकडे लक्ष द्यावे लागेल. दुपार नंतर मात्र अनुकूल वातावरण निर्माण होईल. भावंडांशी महत्त्वाच्या विषयांवर चर्चा करू शकाल. प्रवासासाठी दिवस अनुकूल आहे. नशिबाची साथ लाभेल.

तूळ - आज शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील. दृढ विचार व वैचारिक संतुलन ह्यामुळे हाती घेतलेले काम सहजपणे पूर्ण करू शकाल. वस्त्रालंकार व मनोरंजन ह्यासाठी पैसा खर्च होईल. दुपारनंतर द्विधा मनःस्थिती होईल. त्यामुळे निर्णय घेणे अवघड होईल. शक्यतो कुटुंबियांशी मतभेद टाळावेत. आपला अहंपणा बाजूला ठेवून व्यावहारिक निर्णय घेणे हितावह राहील.

वृश्चिक - आज आपला संतापीपणा व अविचारीपणा ह्यामुळे आपण अडचणीत येण्याची शक्यता आहे. एखादी अप्रिय घटना संभवते. दुपार नंतर शारीरिक व मानसिक आरोग्याची काळजी घ्यावी लागेल. आर्थिक बाबींचे योग्य नियोजन करू शकाल. आपला आत्मविश्वास वाढीस लागेल.

धनू - आजचा दिवस व्यापार - व्यवसायासाठी लाभदायी आहे. कौटुंबिक वातावरण आनंदी राहील. नोकरीत बढती संभवते. मित्रांसह सहलीस जाऊ शकाल. व्यापारात लाभ होईल. दुपार नंतर मात्र प्रकृतीस त्रास संभवतो. विचार पूर्वक कामे न केल्यास आपण अडचणीत येऊ शकाल. व्यावसायिक क्षेत्रात वावरताना आपले वक्तव्य संयमित ठेवावे.

मकर - कौटुंबिक जीवनाच्या दृष्टिने आजचा दिवस आनंददायी आहे. व्यापार -व्यवसायात वृद्धी संभवते. व्यवसायात अनुकूलता जाणवेल. सहकारी उत्तम सहकार्य करतील. दुपार नंतर मित्रांसह सहलीस जाऊ शकाल. प्राप्तीत वाढ संभवते. व्यापारात लाभ होतील.

कुंभ - आज आपण बौद्धिक काम, नवनिर्मिती व लेखनकार्यात व्यस्त राहाल. नवीन काम सुरू करू शकाल. एखाद्या प्रवासाचे आयोजन करू शकाल. व्यापारात लाभाच्या संधी लाभतील मात्र त्या फसव्या असण्याची शक्यता आहे. आरोग्याकडे लक्ष द्यावे लागेल. दुपार नंतर मात्र कुटुंबात आनंदी वातावरण निर्माण होईल. माते कडून एखादा लाभ संभवतो. उत्तम सौख्य लाभेल. शासकीय कामात यश प्राप्ती होईल.

मीन - आज आपणाला आपल्या कृतीवर संयम ठेवावा लागेल. हितशत्रूंचा त्रास संभवतो. गूढ विद्येची आवड निर्माण होईल. दुपार नंतर परदेशात वास्तव्यास असणार्‍या मित्र परिवाराकडून एखादी चांगली बातमी मिळेल. व्यापार -व्यवसायात अपेक्षित सहकार्य मिळू शकेल. शक्यतो आज वाद टाळावेत.

Intro:Body:Conclusion:
Last Updated : Jan 19, 2020, 7:56 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.