तिरुअनंतपूरम - केरळमध्ये पावसामुळे मोठ्या प्रमाणात जीवित आणि वित्त हानी झाली आहे. पुरामध्ये आत्तापर्यंत 122 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 21 जण बेपत्ता असून 40 जण जखमी झाल्याची माहिती राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण अहवालामध्ये दिली आहे.
-
Kerala: Death toll in flood-related incidents rises to 121. 40 people injured, 21 still missing. #KeralaFloods pic.twitter.com/FchLlaiG98
— ANI (@ANI) August 19, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">Kerala: Death toll in flood-related incidents rises to 121. 40 people injured, 21 still missing. #KeralaFloods pic.twitter.com/FchLlaiG98
— ANI (@ANI) August 19, 2019Kerala: Death toll in flood-related incidents rises to 121. 40 people injured, 21 still missing. #KeralaFloods pic.twitter.com/FchLlaiG98
— ANI (@ANI) August 19, 2019
राज्यातील 8 हजार 247 कुटुंब विस्थापीत झाली असून शासनाकडून त्यांची व्यवस्था कॅम्पमध्ये करण्यात आली आहे. तर राज्यातील 1 हजार 789 घरे पूर्णपणे उद्धवस्त झाली आहेत. ज्या कुटुंबामधील सदस्यांनी पूरामध्ये आपला जीव गमावला आहे. त्यांच्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री पिनराई विजयन यांनी 4 लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे.
राज्यातील वायनाड जिल्ह्यातील मल्लापूरम आणि पुथूमाला येथे भूस्खलन झाले होते. त्यामुळे दोन्ही गावे उद्ध्वस्त झाली होती. या घटनेमुळे मोठ्या प्रमाणात जीवितहानी झाली. मृतांना शोधण्यासाठी प्रशासनाकडून 'ग्राउंड पेनिट्रेटींग रडार' चा वापर करण्यात आला होता. तर राष्ट्रीय आपत्ती निवारण दलाच्या तेरा तुकड्या आणि १८० जवान केरळमध्ये बचावासाठी दाखल झाले होते.