ETV Bharat / bharat

केरळचे मुख्यमंत्री पि. विजयन यांनी 'तो' आरोप फेटाळला

अमेरिकन कंपनीसोबत राज्यातील कोरोना बाधितांची माहिती शेअर केल्याचा आरोप केरळचे मुख्यमंत्री पि. विजयन यांनी फेटाळून लावला आहे.

Kerala CM denies allegation of COVID-19 data leakage

author img

By

Published : Apr 12, 2020, 11:56 AM IST

तिरुवनंतपुरम - अमेरिकन कंपनीसोबत राज्यातील कोरोना बाधितांची माहिती शेअर केल्याचा आरोप केरळचे मुख्यमंत्री पिनारायी विजयन यांनी फेटाळून लावला आहे. आरोप केल्यानुसार ही पीआर कंपनी नाही. तसेच सेवा दिल्याबद्दल त्यांना पैसे दिले गेले नाहीत. ही एनआरके संचालित कंपनी आहे, जी राज्याला मदत करत आहे, असे विजयन यांनी सांगितले.

विधानसभा विरोधी पक्षनेते रमेश चेन्नीथला यांनी शुक्रवारी डाव्या सरकारवर अमेरिकन कंपनीसोबत राज्यातील कोरोना बाधितांची माहिती शेअर केल्याचा आरोप केला आहे. हा रुग्णांच्या मूलभूत अधिकारांवर झालेला हल्ला असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

कोरोनाविरुद्धच्या लढाईसाठी सरकारकडून वॉर्ड पातळीवरील समिती स्थापन करण्यात आली आहे. याद्वारे रुग्णांची संबंधित माहिती जमा करण्यात येत आहे. मात्र, ती एका परदेशी खासगी कंपनीच्या सर्वरवर अपलोड केली जात आहे, असा दावा रमेश यांनी केला होता.

संबधित परदेशी कंपनी भविष्यात त्यांच्याकडे संकलित झालेली अमूल्य माहिती आर्थिक आणि व्यापारी लाभासाठी इतर कुणाला विकणार नाही, याचा काही भरवसा आहे का, असा सवाल रमेश यांनी केला. त्यांनी सरकारने या कंपनीसोबत झालेल्या करारातील बाबी त्यातील अटी आणि शर्तींसह सर्वांसमक्ष जाहीर करण्याची मागणी केली.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.