ETV Bharat / bharat

देशद्रोहाच्या खटल्यात तुरुंगात असलेल्या काश्मीरी विद्यार्थ्यांना कर्नाटकातील न्यायालयाकडून जामीन मंजूर

पुलवामा दहशतवादी हल्ला एक वर्ष झालेल्या दिवशी देशविरोधी घोषणा दिल्याच्या आरोपात काश्मीरी विद्यार्थ्यांना अटक करण्यात येऊन देशद्रोहाचा खटला दाखल करण्यात आला होता. हुबळी न्यायालयाने त्यांना आज जामीन मंजूर केला.

Kashmiri youth got bell in sedition case
देशद्रोहाच्या खटल्यातील काश्मिरी युवकांना जामीन
author img

By

Published : Jun 11, 2020, 5:22 PM IST

बंगळुरू - देश विरोधी घोषणा दिल्याप्रकरणी देशद्रोहाच्या खटल्यात तुरुंगात असलेल्या काश्मीरी विद्यार्थ्यांना कर्नाटकातील हुबळी न्यायालयाने जामीन मंजूर केला, अशी माहिती सूत्रांकडून मिळाळी आहे. हे विद्यार्थी बंगळुरूमधील अभियांत्रिकी महाविद्यालयात शिक्षण घेत होते.

पुलवामा येथे केंद्रीय राखीव पोलीस दलावर झालेल्या दहशतवादी हल्ल्याला एक वर्ष झालेल्या दिवशी या विद्यार्थ्यांनी पाकिस्तानच्या बाजूने घोषणा दिल्या. देशविरोधी घोषणा सोबत सोशल मीडियावर वादग्रस्त पोस्ट टाकल्याचा आरोप लावत विद्यार्थ्यांवर देशद्रोहाचा खटला दाखल करण्यात आला आणि त्यांना अटक करण्यात आली होती.

युवा विधिज्ञ संघटनेचे अध्यक्ष अशोक अनवेकर यांनी या निर्णयावर नाराजी व्यक्त केली आहे. हुबळी ग्रामीण पोलिसांनी वेळीच विहित नमुन्यात आरोपपत्र दाखल न केल्यामुळे विद्यार्थ्यांना जामीन मिळाल्याचे त्यांनी सांगितले.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.