ETV Bharat / bharat

वाराणसी : पंतप्रधान मोदींचा 'ड्रीम प्रोजेक्ट' काशी विश्वनाथ कॉरिडोरचे काम पुन्हा सुरू

काशी विश्वनाथ कॉरिडोर परियोजनेचे काम पुन्हा एकदा सुरू करण्यात आले आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊनमुळे कॉरिडोरचे काम बंद ठेवले होते. गुरुवारी सरकारकडून काम करण्यास परवानगी मिळाल्यानंतर सोशल डिस्टन्स राखत काम सुरू करण्यात आले आहे.

पंतप्रधान
पंतप्रधान
author img

By

Published : Apr 24, 2020, 4:41 PM IST

वाराणसी (उत्तर प्रदेश) - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ड्रीम प्रोजेक्ट असलेल्या काशी विश्वनाथ कॉरिडोर परियोजनेचे काम पुन्हा एकदा सुरू करण्यात आले आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊनमुळे कॉरिडोरचे काम बंद ठेवले होते. गुरुवारी सरकारकडून काम करण्यास परवानगी मिळाल्यानंतर सोशल डिस्टन्स राखत काम सुरू करण्यात आले आहे. कामाच्या ठिकाणी कर्मचारी वगळता कुणालाही जाण्याची परवानगी नाही.

वाराणसी

काम सुरू करण्यापूर्वी वरिष्ठ कर्मचारी आणि कामगारांचे थर्मल स्क्रिनिंग करण्यात आले. सुरक्षित अंतर राखूनच काम करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. दररोज काम सुरू करताना आणि बंद करताना सॅनिटायझरचा उपयोग केला जात आहे. सर्व कामगार, कर्मचारी यांना मास्क, हातमोजे आणि इतर सुरक्षा साहित्य पुरवण्यात आले आहे. तरीही कोणाचे आरोग्य बिघडल्यास तत्काळ वरिष्ठांना माहिती देण्यास सांगण्यात आले आहे.

काम चालू असलेल्या ठिकाणी प्रवेश पूर्णपणे बंद केला आहे. कोणतेही अधिकारी, कामगार यांच्या नातेवाईकांनाही आत प्रवेश नाकारला जात आहे.

एकूण दीडशे कामगार तीन पाळ्यांमध्ये चोवीस तास काम करत असून त्यांच्यावर दहा अधिकाऱ्यांचे पथक देखरेख करत असते. हे सर्व विश्वनाथ धामची निर्मिती करण्याचे कार्य करत आहेत, त्यांची तेथेच राहण्याची व्यवस्था केली आहे, असे श्री काशी विश्वनाथ मंदिराचे सीईओ विशाल सिंह म्हणाले.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.