बंगळुरु - कर्नाटकचे मुख्यमंत्री एच. डी. कुमारस्वामींनी मी राजीनामा का द्यावा, असा सवाल केला आहे. कर्नाटकातील राजीनामा नाट्यामुळे काँग्रेस-जेडीएस आघाडी सरकार अडचणीत आले आहे. तसेच, सरकार अल्पमतात आल्यास तोंडावर आलेले विधानसभा सत्र चालवता येणार नाही. या पार्श्वभूमीवर विरोधक भाजपकडून मुख्यमंत्री कुमारस्वामींच्या राजीनाम्याची मागणी होत आहे. मात्र, कुमारस्वामींनी राजीनामा देणार नसल्याचे ठणकावून सांगितले आहे.
'मी राजीनामा देण्याची काय गरज आहे? २००९-१० मध्ये येदियुराप्पा मुख्यमंत्री होते. तेव्हा १८ आमदारांनी त्यांना विरोध केला होता. पण काय झाले?' असा प्रश्न कुमारस्वामींनी केला आहे.
दरम्यान, १५ आमदारांनी सत्ताधारी आघाडीची साथ सोडली आहे. तसेच, आणखी काही आमदार सरकारमधून बाहेर पडण्याचा शक्यता भेडसावत आहे. या पार्श्वभूमीवर आज सकाळी कुमारस्वामी कृपा गेस्ट हाऊस येथे काँग्रेस-जेडीएसच्या वरिष्ठ नेत्यांची बैठक झाली.
राजीनामा दिलेले बंडखोर आमदार नुकतेच मुंबईतून बंगळुरुला रवाना झाले आहेत. त्यांना सर्वोच्च न्यायालयाने सायंकाळी ६ वाजेपर्यंत विधानसभा अध्यक्ष रमेश कुमार यांच्यासमोर हजर होण्याचे निर्देश दिले आहेत. त्यांच्याशी शिष्टाई करण्याचे सत्ताधारी आघाडी आणि काँग्रेस नेते डी. के. शिवकुमार यांचे प्रयत्न आतापर्यंत निष्फळ ठरले आहेत. रमेश कुमार यांनी या आमदारांचे राजीनामे आतापर्यंत संमत केलेले नाहीत.
कर्नाटक वॉर : मी राजीनामा का द्यावा? मुख्यमंत्री कुमारस्वामींचा सवाल - congress

कर्नाटक वॉर : मी राजीनामा का द्यावा? मुख्यमंत्री कुमारस्वामींचा सवाल

Conclusion: