ETV Bharat / bharat

कर्नाटक: कारच्या टायरची हवा काढल्याने चक्क पोलिसाचे तहसीलदाराविरोधात धरणे - police constable protest e after deflate tyres

तहसीलदाराच्या आदेशाविरोधात दयानंद यांनी धरणे आंदोलन केले. कोणतीही नोटीस न बजाविता व दंड न आकारता टायरमधील हवा का सोडली, असा त्यांनी सवाल केला.

आंदोलन करताना पोलीस कॉन्स्टेबल
आंदोलन करताना पोलीस कॉन्स्टेबल
author img

By

Published : Aug 19, 2020, 2:54 PM IST

बंगळुरू – कर्नाटकमध्ये तहसीलदाराविरोधात पोलिसाने चक्क धरणे आंदोलन केल्याची घटना समोर आली आहे. तहसीलदाराच्या आदेशाने अनधिकृतपणे लावलेल्या पोलीस कॉन्स्टेबलच्या कारच्या टायरची हवा काढण्यात आली. यामुळे संतप्त झालेल्या पोलीस कॉन्स्टेबलने महात्मा गांधींचे छायाचित्र हातात घेवून राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 75 वर धरणे आंदोलन केले. दयानंद असे या पोलीस कॉन्स्टेबलचे नाव आहे.

पोलीस कॉन्स्टेबल दयानंद यांनी अनधिकृतपणे कार ही सकलेशपूरमधील अपोलो औषधी दुकानाजवळ उभी केली. तहसिलदार मंजूनाथ हे जवळून जात असताना त्यांना चारचाकी चुकीच्या पद्धतीने लावल्याचे आढळले. त्यांनी पोलीस कॉन्स्टेबल दयानंद यांच्याशी न बोलता थेट वाहन चालकाला चारही टायरमधील हवा काढण्याचे आदेश दिले. जेव्हा दयानंद हे दुकानामधून बाहेर आले, तेव्हा त्यांना चारही टायरमधील हवा काढल्याचे दिसून आले.

तहसीलदाराच्या आदेशाविरोधात दयानंद यांनी धरणे आंदोलन केले. कोणतीही नोटीस न बजाविता व दंड न आकारता टायरमधील हवा का सोडली, असा त्यांनी सवाल केला. ते म्हणाले, की अरुंद बोळीत मी कार लावल्याचे मान्य करतो. मात्र, ती कार काढण्यासाठी तहसिलदारांनी मला सांगायला हवे होते. त्यांनी टायरमधील हवा सोडायला नको होती.

दयानंद यांच्या कारला टोईंग करून जवळील पोलीस स्टेशनमध्ये नेण्यात आले. ईटीव्ही भारतशी बोलताना सामाजिक कार्यकर्ते अभिषेक यांनी दयानंद यांचे धरणे चुकीचे असल्याचे म्हटले आहे. धरणे आंदोलनामुळे चारचाकी चालकांना वाहने चालविताना मोठा अडथळा झाला होता. वरिष्ठ पोलिसांनी दयानंद यांच्याविरोधात त्वरित कारवाई करावी, अशी त्यांनी मागणी केली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.