नवी दिल्ली -कर्नाटकामधील विधानसभा अध्यक्षांनी अपात्र ठरवलेले काँग्रेस आणि जेडीएसचे १७ आमदार पोटनिवडणूक लढवू शकतात, असा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. कर्नाटक विधानसभेचे तत्कालीन अध्यक्ष आर. के. रमेश कुमार यांनी १७ आमदारांना अपात्र ठरवले होते. त्यानंतर आमदारांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती.
विधानसभा अध्याक्षांचा निर्णय योग्य असल्याचे न्यायाधीश एन व्ही. रामन्ना यांनी सांगितले. परंतु आमदार पोटनिवडणुका लढवू शकतात, असा निर्णय देण्यात आला आहे.
-
Supreme Court says that the 17 Karnataka MLAs can contest the by-elections in the state. https://t.co/UEW8qTzNRj
— ANI (@ANI) November 13, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">Supreme Court says that the 17 Karnataka MLAs can contest the by-elections in the state. https://t.co/UEW8qTzNRj
— ANI (@ANI) November 13, 2019Supreme Court says that the 17 Karnataka MLAs can contest the by-elections in the state. https://t.co/UEW8qTzNRj
— ANI (@ANI) November 13, 2019
१३ महिन्यांचे काँग्रेस- जेडीएस सरकार १७ आमदारांच्या राजीनाम्यानंतर अडचणीत आले होते. बहुमताअभावी कुमारस्वामी यांना मुख्यमंत्री पदावरून उतार व्हावे लागले होते. त्यानंतर भाजपने कर्नाटकात सत्ता स्थापन केली. जुलै महिन्यात
कर्नाटकमध्ये हा सत्तापेच सुरु होता. राजीनामा दिलेले आमदार महाराष्ट्रातही काही दिवस मु्क्कामाला होते. कुमारस्वामी सरकारला विधानसभेमध्ये बहुमत सिद्ध करता आले नाही. त्यामुळे त्यांना राजीनामा दिल्यानंतर बी. एस. येडियुरप्पा यांनी सरकार स्थापन केले.