हावेरी (कर्नाटक) - भारतात कोरोना विषाणुचा संसर्ग दिवसेंदिवस वाढत आहे. या कठीण काळात व्यंगचित्रकार सोपे आणि विनोदी चित्रे काढून कोरोनाबद्दल जनजागृती करत आहेत.
काही व्यंगचित्रकार क्वारंटाईनवर आधारीत चित्रे काढत आहेत. तर, काही या विषाणुविरोधात पहिल्या फळीत लढणाऱ्यांचे आभार माननारे चित्र काढत आहेत.
कर्नाटकच्या हावेरी जिल्ह्यातील कलाकारांनी कोरोनाविषयी जनजागृती करण्यासोबतच सोशल डिस्टंसिंगचे महत्व पटवून देण्यासाठी पुढाकार घेतला आहे.
राणेबेन्नूर येथील व्यंगचित्रकार नामादेव कगडगारा यांनी एक व्यंगचित्र बनवून लोकांना कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी घरीच राहावे, अशी विनंती केली आहे.
हुरुलीकोप्पी गावचे लोक कलाकार वीरय्या संकीनामाथ लोकगीतांच्या माध्यमातून जनजागृती करीत आहेत.
राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या ३१५वर पोहोचली आहे. तर १३ जणांचा मृत्यू झाला आहे.