ETV Bharat / bharat

कर'नाटक' : कुमार स्वामींना आज संध्याकाळी 6 वाजेपर्यंत बहुमत सिध्द करावे लागणार - विश्वासदर्शक

विश्वासदर्शक ठरावावर मतदान झाल्यानंतर काँग्रेस-जेडी(एस) सरकार सत्तेत राहणार, की सत्तेवरून पायउतार होणार याचा निर्णय आज (मंगळवार) होणार आहे.

आज ठरणार! कुमारस्वामी सरकार राहणार की जाणार?
author img

By

Published : Jul 22, 2019, 6:37 AM IST

Updated : Jul 23, 2019, 7:55 AM IST

बंगळुरू - कर्नाटकमध्ये दिवसभर घडलेल्या घटनेनंतर विधानसभेचे कामकाज रात्री उशिरापर्यंत सुरू होते. मात्र, यावर काही तोडगा निघाला नाही. यामुळे आज (मंगळवार) सकाळी 10 वाजेपर्यंत कामकाज स्थगित करण्यात आले. दरम्यान, विधानसभेचे अध्यक्ष के. आर. रमेशकुमार यांनी आज (मंगळवार) चार वाजेपर्यंत निर्णायक चर्चा संपवावी असे निर्देश दिले. त्यानंतर 6 वाजेपर्यंत बहुमत चाचणी पूर्ण होईल, असे रमेशकुमार म्हणाले.

Update :

  • विधानसभा अध्यक्षांनी बंडखोर आमदारांना विधानसभेत हजर राहण्यासाठी नोटीस पाठवली आहे. त्यांना उद्या (मंगळवार) सकाळी ११ वाजेपर्यंत हजर राहण्याची वेळ देण्यात आली आहे. भाजप बंडखोर आमदारांना अपात्र न होण्यासाठी मनधरणी करताना मंत्रीपदाची आश्वासने देत आहे. संविधानानुसार, एकदा तुम्ही अपात्र ठरल्यानंतर पुन्हा विधानसभा सदस्य होऊ शकत नाही - काँग्रेस नेते डी. के शिवकुमार यांची प्रतिक्रिया
  • माझा राजीनामा देऊन कोण मुख्यमंत्री होण्याची स्वप्न पाहत आहे. मी राज्यपालांकडे राजीनामा दिला अशी माहिती मला मिळाली. कोणीतरी नकली सही करुन सोशल मीडियात खालच्या स्तरावर जाऊन प्रसिद्धी मिळवण्याचा प्रयत्न करत आहे - मुख्यमंत्री कुमारस्वामी
  • राज्यपालांकडे मी राजीनामा सोपवल्याची बातमी चुकीची. कोणीतरी माझी नकली सही करुन राजीनामा राज्यपालांना सोपवला - मुख्यमंत्री कुमारस्वामींचे विधानसभेत स्पष्टीकरण
  • विधानसभा अध्यक्ष एच. के पाटील यांना प्रत्युत्तर देताना म्हणाले, मला तुम्हाला न विचारता निर्णय घ्यावे लागतील, अशी परिस्थिती निर्माण करू नका.
  • सर्वोच्च न्यायालयाने उद्या निर्णय घेतल्यानंतर आपण बहुमत चाचणीवर चर्चा केली तर बरे होईल - काँग्रेस नेते एच. के पाटील
  • आजच बहुमत चाचणी होणार, असे मुख्यमंत्र्यांनी आश्वासन दिले होते. त्यामुळे आजच बहुमत चाचणी झाली पाहिजे. यासाठी आम्ही रात्री १२ पर्यंत थांबायला तयार आहोत - बीएस येदियुरप्पा
  • मी रात्री १२ वाजेपर्यंत थांबण्यासाठी तयार आहे. विधानसभा वाचवा, असे नारे देणाऱ्या आमदारांना विधानसभा अध्यक्षांचे प्रत्युत्तर
  • मुख्यमंत्री कुमारस्वामी राजीनामा देण्याच्या तयारीत - सुत्रांची माहिती, शहराच्या सुरक्षेत वाढ
  • विधानसभा अध्यक्ष के. आर रमेशकुमार यांची भाजप आणि जेडीएस नेत्यांसोबत बैठक. भाजपचे सुनील कुमार, बसवराज बोम्मई, सीटी रवी तर, जेडीएस नेते महेश, एचडी रेवण्णा, बंदेप्पा काशेमपूर बैठकीला उपस्थित
  • विधानसभेचे कामकाज १० मिनिटांसाठी तहकूब
  • काँग्रेस नेता डी.के शिवकुमार म्हणाले, बहुमत चाचणीपूर्वी जेडीएस सत्तेचा त्याग करण्यास तयार. नवीन मुख्यमंत्री काँग्रेसचा होऊ शकतो.
  • काँग्रेस नेता डी.के शिवकुमार विधानसभेत पोहचले.
  • विधानसभा अध्यक्षांचे काम अस्वीकाहार्य आहे. राज्यपालांनी योग्य तो निर्णय घेऊन लोकशाहीला वाचवले पाहिजे - पी मुरलीधर राव
  • काँग्रेस-जेडीएस कायद्याचे उल्लंघन करत आहेत. लोकशाहीचा गळा घोटला जात आहे. न्यायलयाने १५ आमदारांना उपस्थित राहायचे आहे की नाही हे सर्वस्वी त्यांच्यावर सोडून दिले आहे. विद्यमान सरकारकडे बहुमत नाही, हे त्यांनी मान्य करायला हवे, भाजप राष्ट्रीय सचिव पी मुरलीधर राव यांची प्रतिक्रिया
  • २००५ साली मी जेडएस पक्ष सोडला नव्हता, मला काढून टाकण्यात आले होते. यानंतरही मी लगेच काँग्रेस पक्षात प्रवेश केला नव्हता. मी अहिंदा पक्ष काढण्याच्या तयारीत होतो. परंतु, २००६ साली मी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. सी. टी रवी यांनी केलेल्या टीकेवर सिद्धारामय्या यांनी दिले स्पष्टीकरण. म्हणाले, रवी यांच्याकडे खरी माहिती नाही.
  • प्रत्येक सदस्य फक्त १० मिनिटेच बोलू शकतो, हे मला पुन्हा सांगायला लावू नका - विधानसभा अध्यक्ष के. आर रमेश
  • भाजप का स्वीकार करत नाही की, कर्नाटकमध्ये ऑपरेशन कमळमागे त्यांचा हात आहे. याचा त्यांनी स्वीकार करायला हवा, असे डी. के शिवकुमार विधानसभेत म्हणाले आहेत.
  • विश्वासदर्शक ठरावावर मतदान घेण्यास मुद्दाम उशीर केला जात आहे, अशी याचिका वकील आनंद मूर्ती यांनी आज कर्नाटक न्यायालयात दाखल केली आहे.
  • आज आदेश पारित करणार, सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे विलंब झाला, असे रमेश कुमार यांनी आमदारांना सांगितले आहे. याचबरोबर आज तुमच्या भाषणातून विधानसभेची प्रतिष्ठा जिवंत ठेवली जाईल याची काळजी घ्यावी, असे विधानसभा अध्यक्ष रमेश कुमार यांनी आमदारांना सांगितले आहे.
  • कर्नाटकचे विधानसभा अध्यक्ष के. आर. रमेश कुमार यांनी बंडखोर आमदारांना २३ जुलै रोजी सकाळी ११ वाजता कार्यालयात भेटण्यासाठी समन्स बजावले आहे.
  • बंडखोर आमदारांनी दाखल केलेली याचिकेवर आज सुनावणी होणार नाही. या आमदारांनी विश्वासदर्शक ठरावावर मतदान लवकर घेण्यात यावे अशी याचिका केली होती.
  • कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री आणि भाजप नेते बी. एस. येडीयुरप्पा आमदारांसह विधानसभेत पोहचले.
  • कर्नाटकात आज विश्वासदर्शक ठरावावर मतदान होणार आहे. यासाठी भाजपचे आमदार हॉटेलमधून विधासभेकडे रवाना झाले आहेत.

दरम्यान, सत्ताधारी आणि विरोधी पक्ष विश्वासदर्शक ठरावावर आपला दावा करत आहेत. काँग्रेस नेते एचके पाटील यांनी बहुमत सिद्ध होईल, असा दावा केला आहे तर दुसरीकडे भाजपचे प्रदेशाध्यक्ष बी. एस. येडियुरप्पा यांनी काँग्रेस- जेडी(एस) सरकार बहुमत सिद्ध करू शकणार नसल्याचा दावा रविवारी केला.

बंडखोर आमदारांचा नवा व्हिडिओ समोर

कर्नाटकच्या बंडखोर आमदारांचा पुन्हा नवा एक व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओमध्ये ११ बंडखोर आमदार दिसत आहेत. तर यावेळी त्यांनी आम्ही कोणत्याही दबावाखाली किंवा पैशासाठी आम्ही राजीनामा दिला नसल्याचे म्हटले. स्वाभिमान जपण्यासाठी राजीनामा दिला असून सोमवारी होणाऱ्या बहुमत चाचणीलाही उपस्थित राहणार नसल्याचा पुनरुच्चार या आमदारांनी केला आहे.

जेडीएस आणि काँग्रेसच्या ज्या १५ आमदारांनी राजीनामे दिले आहेत. त्यांना काल सर्वोच्च न्यायालयाकडून दिलासा मिळाला. आज बहूमत चाचणीसाठी त्यांना विधानसभेत उपस्थित राहण्याची गरज नाही. बहुमत चाचणीच्या पार्श्वभूमीवर या आमदारांनी कोणत्याही परिस्थितीत निर्णय बदलणार नसल्याचे म्हटले आहे.

Last Updated : Jul 23, 2019, 7:55 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.