नवी दिल्ली - महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट योग्यच असल्याचे काल (बुधवारी) अमित शाह म्हणाले होते. यावरून काँग्रेस नेते कपिल सिब्बल यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावर टीका केली आहे. राजकीय पक्ष तोडण्यात आणि जोडण्यात अमित शाह चांगलेच अनुभवी आहेत, त्यांचा यामध्ये मोठा अनुभव आहे, याचे नमुने आपण गोवा आणि कर्नाटक राज्यात पाहिले आहेत, अशी टीका सिब्बल यांनी केली.
-
Kapil Sibal, Congress on Amit Shah's remarks on President's Rule in Maharashtra: Amit Shah is very experienced as far as these matters are concerned. He knows how to break & how to unite political parties, we have seen glimpses of it in several states - be it in Goa or Karnataka. pic.twitter.com/ErcucKQGbg
— ANI (@ANI) November 14, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">Kapil Sibal, Congress on Amit Shah's remarks on President's Rule in Maharashtra: Amit Shah is very experienced as far as these matters are concerned. He knows how to break & how to unite political parties, we have seen glimpses of it in several states - be it in Goa or Karnataka. pic.twitter.com/ErcucKQGbg
— ANI (@ANI) November 14, 2019Kapil Sibal, Congress on Amit Shah's remarks on President's Rule in Maharashtra: Amit Shah is very experienced as far as these matters are concerned. He knows how to break & how to unite political parties, we have seen glimpses of it in several states - be it in Goa or Karnataka. pic.twitter.com/ErcucKQGbg
— ANI (@ANI) November 14, 2019
महाराष्ट्रातील सत्तेच्या पेचाबाबत पहिल्यांदाच केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपचे अध्यक्ष अमित शाह यांनी काल मौन सोडले. सत्तास्थापनेचा दावा करण्यासाठी सर्वांना पुरेसा वेळ दिला गेला होता. आमच्यासह शिवसेना किंवा काँग्रेस-राष्ट्रवादीही सत्तास्थापनेसाठी दावा करण्यात असमर्थ ठरली. याआधी कोणत्याही राज्याला सरकार स्थापनेसाठी १८ दिवसांइतकी मुदत दिली गेली नव्हती. त्यामुळे, महाराष्ट्रात लागू झालेली राष्ट्रपती राजवट ही योग्य असल्याचे मत त्यांनी व्यक्त होते होते, या वक्तव्याच्या समाचार सिब्बल यांनी घेतला.
भाजपने आपल्या फायद्यासाठी राष्ट्रपती राजवट लागू केल्याचा आरोपही केला जातो आहे. मात्र, यात सर्वात जास्त नुकसान भाजपचेच झाले आहे. कारण, आमचे काळजीवाहू सरकार बरखास्त झाले. विरोधी पक्षांचे यात काहीही नुकसान झाले नाही. तसेच, महाराष्ट्राच्या जनतेचेही यात नुकसान झाले आहे. मात्र, ती आमची चूक नाही. आमच्या मित्रपक्षाने निवडणुकीनंतर वेगळ्या मागण्या केल्या, ज्या आम्हाला मान्य नव्हत्या. शिवाय फक्त भाजपकडे बहुमत नव्हते, त्यामुळे आम्ही सरकार स्थापनेचा दावा करू शकलो नाही, असे अमित शाह म्हणाले होते.
हेही वाचा : शबरीमला प्रकरणी पुनर्याचिका आता संविधानिक पीठाकडे, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय