ETV Bharat / bharat

'देशाच्या अर्थव्यवस्थेत सर्वत्र मंदी, केवळ भाजपच्या वाणीतच तेजी' - आर्थिक मंदी बातमी

ढासळत्या अर्थव्यवस्थेच्या काळात धीर धरण्याचे आवाहन अर्थमंत्री निर्मला सितारामन या करत आहेत. मात्र, भुकेलेला व्यक्ती किती वेळ धीर धरेल, असा सवाल सिब्बल यांनी सितारामण यांना विचारला आहे.

कपील सिब्बल
कपील सिब्बल
author img

By

Published : Nov 30, 2019, 10:30 AM IST

Updated : Nov 30, 2019, 11:30 AM IST

नवी दिल्ली - ढासळत्या अर्थव्यवस्थेवरून काँग्रेस नेत कपील सिब्बल यांनी भाजपवर टीका केली. नव्याने जाहीर झालेल्या आकडेवारीवरून सरकारचे अपयश उघडे पडले आहे. ढासळत्या अर्थव्यवस्थेच्या काळात धीर धरण्याचे आवाहन अर्थमंत्री निर्मला सितारामन या करत आहेत. मात्र, भुकेलेला व्यक्ती किती वेळ धीर धरेल, असा सवाल त्यांनी सितारामन यांना विचारला आहे.

कपील सिब्बल अर्थव्यवस्थेच्या स्थितीवर बोलताना

लोकांना रोजगार पाहिजे, खायला अन्न पाहिजे, ते कसा धीर धरतील. मंदी अर्थव्यवस्थेतच नाही तर भाजप सरकारमध्येही आली आहे. एक गोष्ट भाजप सरकारमध्ये मंदावलेली नाही, ती म्हणजे भाजपची वाणी. ज्या पद्धतीने तुम्ही माध्यमांमध्ये बोलता, लोकांना खोटी स्वप्ने दाखवता, त्यामध्ये मंदी आली नसल्याची खरमरीत टीका सिब्बल यांनी भाजपवर केली.

हेही वाचा - टोलनाक्यावर लागणाऱ्या फास्टॅगला 15 डिसेंबरपर्यंत मुदतवाढ

भाजपला सरकार चालवता येत नाही, तुमच्याकडे दुरदृष्टी नाही. अर्थव्यवस्थेला गती मिळेल अशी कोणतीही योजना भाजपकडे नाही. मागील २६ तिमाही आकडेवारींपैकी चालू वर्षातील जुलै-सप्टेंबर या तिमाहीतील आकडेवारी सर्वात निचांकी राहिली. उद्योगधंद्यामध्ये गती राहिली नाही. त्यामुळे तुम्ही लोकांना रोजगार कसा देणार, त्यांचे पोट कसे भरणार? असा सवाल त्यांनी भाजपला केला.

मताचे राजकारण सोडून लोकांचे पोट कसे भरणार याचे उत्तर भाजप कधी देणार? हा प्रश्न आहे. फक्त दिलासा देण्याने प्रश्न सुटणार नाहीत, तर कोणत्या क्षेत्रामध्ये देश किती प्रगती करत आहे, हे भाजपने सांगावे, असे आवाहन त्यांनी केले. कृषी क्षेत्र, कापड उद्योग, तंत्रज्ञान क्षेत्र, टेलिकॉम क्षेत्र, खाणकाम, एफएमसीजी ही सर्व क्षेत्रे मंदीच्या गर्तेत सापडली आहेत. उद्योगधंद्याचा फक्त विकास खुंटला नाही, तर लोकांचे रोजगारही जात आहेत. आर्थिक स्थितीमध्ये सुधारणा आणण्यासाठी आम्ही भाजपबरोबर काम करण्यास तयार आहोत, पण त्यासाठी एखादी चांगली योजना असावी, असे सिब्बल म्हणाले.

हेही वाचा - समाजाची चिंताजनक स्थिती हे अर्थव्यवस्था ढासळण्याचे मूलभूत कारण - मनमोहन सिंग

भाजप लोकांना स्वप्न विकत आहे, साडेपाच वर्षात भाजपला काही करता आले नाही. विरोधी पक्ष संसदेतून बाहेर निघून जात आहेत. मात्र, भाजप सत्तेतून कधी जाईल, याची आम्ही वाट पाहत असल्याची टीका त्यांनी केली.

Intro:Body:

भुकेलेला व्यक्ती कसा धीर धरेल, ढासळत्या अर्थव्यवस्थेवरून सिब्बल यांची भाजपवर टीका  

नवी दिल्ली - ढासळत्या अर्थव्यवस्थेवरून काँग्रेस नेत कपील सिब्बल यानी भाजपवर टीका केली. नव्याने जाहीर झालेली आकडेवारीवरून सरकारचे अपयश उघडे पडले आहे. ढासळत्या अर्थव्यवस्थेच्या काळात धीर धरण्याचे आवाहन निर्मला सितारामण यांनी केले आहे. मात्र, भुकेलेला व्यक्ती किती वेळ धीर धरेल, असा सवाल त्यांनी अर्थमंत्री निर्मला सितारामण यांना विचारला आहे.

लोकांना रोजगार पाहिजे, खायला अन्न पाहिजे ते कसा धीर धरतील. मंदी अर्थव्यवस्थेतच नाही तर भाजप सरकारमध्ये आली आहे. एक गोष्ट भाजप सरकारमधली मंदावली नाही, ती म्हणजे भाजपची वाणी. ज्या पद्धतीने तुम्ही माध्यमांमध्ये बोलता, लोकांना खोटी स्वप्ने दाखवता, त्यामध्ये मंदी आली नसल्याची खरमरीत टीका सिब्बल यांनी भाजपवर केली.

भाजपला सरकार चालवता येत नाही, तुमच्याकडे दुरदृष्टी नाही. अर्थव्यवस्थेला गती मिळेल असा कोणतीही योजना भाजपकडे नाही. मागील २६ तिमाही आकडेवारीपैकी चालू वर्षातील जुलै- सप्टेंबर या तिमाहीतील आकडेवारी निचांकी राहीली. उद्योगधंद्यामध्ये गती राहीली नाही. त्यामुळे तुम्ही लोकांना रोजगार कसा देणार, त्यांचे पोट कसे भरणार, असा सवाल त्यांनी भाजपला केला.

मताचे राजकारण सोडून तुम्ही लोकांचे पोट कसे भरणार याचे उत्तर भाजप कधी देणार हा प्रश्न आहे. फक्त दिलासा देण्याने प्रश्न सुटणार नाहीत, तर कोणत्या क्षेत्रामध्ये देश किती प्रगती करत आहे, हे भाजपने सांगावे असे आवाहन त्यांनी केले आहे. कृषी क्षेत्र, कापड उद्योग, तंत्रज्ञान क्षेत्र, टेलिकॉम क्षेत्र, खानकाम, एफएमसीजी ही सर्व क्षेत्रे मंदीच्या गर्तेत सापडली आहेत. उद्योगधंद्याचा फक्त विकास खुंटला नाही, तर लोकांचे रोजगारही जात आहेत. आर्थिक स्थीतीमध्ये सुधारणा आणण्यासाठी आम्ही भाजपबरोबर काम करण्यास तयार आहोत, पण त्यासाठी एखादी चांगली योजना असावी, असे सिब्बल म्हणाले.  

भाजप लोकांना स्वप्न विकत आहे, साडेपाच वर्षात भाजपला काही करता आले नाही. विरोधी पक्ष संसदेतून बाहेर निघून जात आहेत. मात्र, भाजप सत्तेतून कधी जाईल, याची आम्ही वाट पाहत असल्याची टीका त्यांनी केली.

Conclusion:
Last Updated : Nov 30, 2019, 11:30 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.