ETV Bharat / bharat

'काश्मीरप्रकरणी सरळ चर्चा करुन मोदींनी आपली 56 इंचाची छाती दाखवावी'

भारत आणि चीनदरम्यान सुरु असलेल्या अनौपचारिक शिखर परिषदेच्या निमित्ताने, आज तामिळनाडूच्या ममल्लापूरममध्ये पंतप्रधान मोदी आणि जिनपिंग यांची भेट होणार आहे.

कपील सिब्बल
author img

By

Published : Oct 11, 2019, 3:25 PM IST

नवी दिल्ली - भारत आणि चीनदरम्यान सुरू असलेल्या अनौपचारिक शिखर परिषदेच्या निमित्ताने, आज तामिळनाडूच्या ममल्लापूरममध्ये पंतप्रधान मोदी आणि जिनपिंग यांची भेट होणार आहे. यावर जिनपिंग यांच्याशी काश्मीरमुद्यावर सरळ चर्चा करून आपली मोदींनी आपली 56 इंचाची छाती दाखवावी, अशी टीका काँग्रेस नेता आणि माजी केंद्रीय मंत्री कपील सिब्बल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर केली आहे.

'जम्मू काश्मीरप्रकरणी चीनने संयुक्त राष्ट्राच्या परिषदेमध्ये पाकिस्तानला पाठिंबा दिला होता. शी जिनपिंग हे इम्रान खान यांच्या बाजूने उभे आहेत. यावेळी मोदींनी महाबलीपूरम येथील भेटीत जिनपिंग यांच्या डोळ्यात डोळे घालून काश्मीर मुद्दा मांडतील, अशी आशा आहे. याचबरोबर पाकिस्तान व्याप्त काश्मीरमधील ५ हजार किलोमीटर जमिन खाली करण्यास सांगणे, भारतामध्ये 5-जी सुरू करण्यासाठी ह्यूवाईची गरज नाही हेही मुद्दे त्यांनी मांडावे आणि आपली 56 इंचाची छाती दाखवावी, अन्यथा हात्तीचे खायचे दात वेगळे आणि दाखवायचे दात वेगळे', असे सिब्बल यांनी टि्वटमध्ये म्हटले आहे.

  • As Xi Jinping supports Imran Khan on Art.370 Modiji look him in the eye at Mamallapuram and say :

    1) Vacate 5000km of land in POK occupied by China trans-Karakoram
    2) No Huawei in India for 5G

    Show your 56” ki chhati !

    Or is it :

    Haathi ke daant khane ke aur dikhane ke aur

    — Kapil Sibal (@KapilSibal) October 11, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

काँग्रेस नेता मनिष तिवारी यांनीदेखील मोदींवर टीका केली होती. मोदींनी चीनसमोर हाँगकाँगचा मुद्दा मांडावा, जर चीन काश्मीरवर बोलू शकतो तर भारत हाँगकाँगमधील परिस्थितीवर चीनसोबत चर्चा का नाही करु शकत, असे तिवारी यांनी टि्वटमध्ये म्हटले होते.

चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग हे भारतात दाखल झाले आहेत. या बैठकीत नियंत्रण रेषेजवळील भागात शांतता कायम ठेवणे आणि दोन्ही देशादरम्यान असलेले व्यावसायिक संबंध आधिक मजबूत करण्यावर भर असणार आहे. यापूर्वी २०१४ मध्ये नरेंद्र मोदी यांनी अहमदाबादमध्ये शी जिनपिंग यांची भेट घेतली होती. याचबरोबर मोदींनी त्यांच्यासोबत आपला वाढदिवसदेखील साजरा केला होता.

Intro:Body:

fdf

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.