ETV Bharat / bharat

कमलेश तिवारी हत्येप्रकरणी पत्नीच्या तक्रारीवरून २ मौलानांवर एफआयआर

author img

By

Published : Oct 19, 2019, 10:48 AM IST

तिवारी यांच्या पत्नीच्या तक्रारीवरून २ मौलानांवर प्राथमिक तक्रार दाखल करण्यात आली आहे. या दोघांनी २०१६ मध्येही तिवारी यांना मारण्याची धमकी दिली होती, असे त्यांच्या पत्नीने सांगितले आहे.

कमलेश तिवारी हत्या

लखनऊ - उत्तर प्रदेशची राजधानी लखनौमध्ये शुक्रवारी भरदिवसा हिंदू समाज पक्षाचे अध्यक्ष कमलेश तिवारी यांच्या हत्येमुळे खळबळ उडाली आहे. २ हल्लेखोरांनी ही हत्या केली. या प्रकरणी तिवारी यांच्या पत्नीच्या तक्रारीवरून २ मौलानांवर प्राथमिक तक्रार दाखल करण्यात आली आहे. या दोघांनी २०१६ मध्ये तिवारी यांना मारण्याची धमकी दिली होती, असे त्यांच्या पत्नीने सांगितले. मात्र, अद्याप कोणाला अटक केली नसून चौकशी सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.

  • Kamlesh Tiwari murder case: Lucknow Police register FIR on complaint of Tiwari’s wife against two Maulanas from Bijnor. She has said in her complaint that these two had threatened to kill her husband in 2016.

    — ANI UP (@ANINewsUP) October 18, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

कमलेश तिवारी यांची त्यांच्या कार्यालयातच हत्या झाली. हत्येपूर्वी हल्लेखोरांनी तिवारी यांच्याशी अर्धा तास चर्चा केली. त्यानंतर मिठाईच्या डब्यातून चाकू बाहेर काढला आणि गळा चिरून त्यांना ठार मारले. संभाषणादरम्यान कमलेश तिवारी यांनी दोघांनाही चहा पाजला होता. यावेळी त्यांनी सेवकाला मसाला आणि सिगारेट आण्यासाठी पाठवले. तो परत येईपर्यंत हल्लेखोर तिवारींना ठार मारून फरार झाले होते. तिवारी यांचे सेवक स्वराष्ट्रजीत सिंह यांनी पूर्ण घटनेची माहिती दिली.

तिवारी यांच्या पत्नीच्या तक्रारीवरून लखनऊ पोलिसांनी बिजनोर येथील २ मौलानांवर प्राथमिक तक्रार दाखल केली आहे. यापैकी मौलाना अन्वर उल हक असे एकाचे नाव आहे. त्याने २०१५ मध्ये तिवारी यांचे डोके धडावेगळे करणाऱ्यास ५१ लाखांचे बक्षीस जाहीर केले होते, अशी माहिती मिळाली आहे. अद्याप तपास चालू असल्याचे पोलिसांनी सांगितले.

कमलेश तिवारी कोण होते?

हिंदु महासभेचे माजी नेते कमलेश तिवारी यांनी जानेवारी २०१७ मध्ये हिंदू समाज पक्षाची स्थापना केली. तिवारी यापूर्वी हिंदू महासभेचे अध्यक्ष होते. कमलेश तिवारी यांनी प्रेषित मुहम्मद यांच्याशी संबंधित वादग्रस्त टीका केली आणि त्यानंतर त्यांना अटक करण्यात आली होती. त्यांच्यावर राष्ट्रीय सुरक्षा कायदा (एनएसए) लागू करण्यात आला होता. अलीकडेच अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या लखनऊ खंडपीठाने त्यांच्याविरूद्ध एनएसए रद्द केले होते.

Intro:Body:

कमलेश तिवारींना जिवे मारण्यासाठी ५१ लाखांचे बक्षीस ठेवणाऱया मौलानाला अटक

लखनऊ - उत्तर प्रदेशची राजधानी लखनौमध्ये शुक्रवारी भरदिवसा हिंदू समाज पक्षाचे अध्यक्ष कमलेश तिवारी यांच्या हत्येमुळे खळबळ उडाली आहे. २ हल्लेखोरांनी ही हत्या केली. या प्रकरणात पोलिसांनी एकाला अटक केली आहे. मौलाना अन्वर उल हक असे या व्यक्तीचे नाव असून त्याला बिजनोर येथून अटक करण्यात आली आहे. त्याने २०१५ मध्ये तिवारी यांचे डोके धडावेगळे करणाऱ्यास ५१ लाखांचे बक्षीस जाहीर केले होते.

कमलेश तिवारी यांची त्यांच्या कार्यालयातच हत्या झाली. हत्येपूर्वी हल्लेखोरांनी तिवारी यांच्याशी अर्धा तास चर्चा केली. त्यानंतर मिठाईच्या डब्यातून चाकू बाहेर काढला आणि गळा चिरून त्यांना ठार मारले. संभाषणादरम्यान कमलेश तिवारी यांनी दोघांनाही चहा पाजला. यावेळी त्यांनी सेवकाला मसाला आणि सिगारेट आण्यासाठी पाठवले. तो परत येईपर्यंत हल्लेखोर तिवारींना ठार मारून फरार झाले होते. तिवारी यांचे सेवक स्वराष्ट्रजीत सिंह यांनी पूर्ण घटनेची माहिती दिली.

तिवारी यांच्या पत्नीच्या तक्रारीवरून लखनऊ पोलिसांनी बिजनोर येथील २ मौलानांवर प्राथमिक तक्रार दाखल केली आहे. या दोघांनी २०१६ मध्येही तिवारी यांना मारण्याची धमकी दिली होती, असे त्यांच्या पत्नीने सांगितले आहे. या माहितीवरून आतापर्यंत एकाला अटक केली आहे.

कमलेश तिवारी कोण होते?

हिंदु महासभेचे माजी नेते कमलेश तिवारी यांनी जानेवारी २०१७ मध्ये हिंदु समाज पक्षाची स्थापना केली. तिवारी यापूर्वी हिंदू महासभेचे अध्यक्ष होते. कमलेश तिवारी यांनी प्रेषित मुहम्मद यांच्याशी संबंधित वादग्रस्त टीका केली आणि त्यानंतर त्यांना अटक करण्यात आली होती. त्यांच्यावर राष्ट्रीय सुरक्षा कायदा (एनएसए) लागू करण्यात आला होता. अलीकडेच अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या लखनऊ खंडपीठाने त्यांच्याविरूद्ध एनएसए रद्द केले होते.

Conclusion:

For All Latest Updates

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.