नवी दिल्ली - आगामी काळात राज्यसभेच्या पोटनिवडणूका होणार आहेत. त्यामुळे राजकीय वातावरण तापले आहे. काँग्रेस नेते दिग्विजय सिंह आणि मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री व काँग्रेस प्रदेशाध्यक्ष कमलनाथ यांच्यावर भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस कैलाश विजयवर्गीय यांनी टीकास्त्र सोडले आहे. विजयवर्गीय यांनी या दोन नेत्यांना 'चुन्नू-मुन्नुची जोडी' असे म्हटलं आहे.
चुन्नू-मुन्नुच्या 2018 च्या विधानसभा मेळाव्यात लोकांनी गर्दी केली नाही. तेव्हा चुन्नू-मुन्नुच्या जोडीने ज्योतिरादित्य सिंधियांना हाताशी धरून शेतकऱ्यांना कर्जमाफीचे वचन दिले. मात्र, आश्वानस देऊन आठ महिने उलटले, तरीही कर्जमाफी केली नाही. जेव्हा ज्योतिरादित्य सिंधिया यांनी याविरोधात आवाज उठवला. तेव्हा कमलनाथ आणि दिग्विजय सिंह यांनी त्यांचे ऐकले नाही. म्हणून सिंधिया यांनी शेतकर्यांच्या बाजूने निर्णय घेतला आणि ते भाजपबरोबर आले, असे कैलाश विजयवर्गीय म्हणाले.
मध्य प्रदेशातील 28 जागांवर होणाऱ्या विधानसभा पोटनिवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या निवडणुका भाजप-काँग्रेससाठी प्रतिष्ठेच्या आहेत. आपल्या उमदेवारांच्या प्रचारासाठी दोन्ही पक्ष मेहनत घेत आहेत. मध्य प्रदेशमध्ये एकूण 28 जागांवर पोटनिवडणूक होणार आहे.