नवी दिल्ली - भाजप नेते ज्योतिरादित्य सिंधिया यांना कोरोनाची लागण झाली आहे. सोमवारी रात्री सिंधिया यांना दिल्लीतील 'मॅक्स हॉस्पिटल'मध्ये दाखल करण्यात आले होते. त्यांच्यात कोरोनाचे लक्षणे जाणवत असल्यामुळे सिंधिया यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. दरम्यान, आज त्यांची कोरोनाची चाचणी करण्यात आली असून, त्यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.
दरम्यान, ज्योतिरादित्य सिंधिया हे दिल्लीतच होते. सोमवारी त्यांच्यामध्ये काही कोरोनाचे लक्षणे दिसून आली आणि त्यानंतर त्यांना ताबडतोब दिल्लीतील मॅक्स हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. सिंधिया यांच्यावर सध्या डॉक्टरांच्या तीन टीम उपचार करत आहेत. आज सिंधिया आणि त्यांच्या आईची कोरोना चाचणी करण्यात आली होती. त्यानंतर मिळालेल्या अहवालानुसार सिंधिया यांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला असून, त्यांच्या आईचा रिपोर्टही पॉझिटिव्ह आला आहे.