हैदराबाद - तेलंगाणामधील नारायण खेडा येथील आमदाराच्या पार्टीत लॉकडाऊनच्या नियमांचे उल्लघंन करण्यात होते. या घटनेचे वार्तांकन केल्यामुळे आपली छळवणूक झाल्याचा आरोप एका पत्रकाराने केला आहे. संबधित पत्रकार हा खासगी तेलगू न्यूज चँनेलमध्ये काम करतो.
आमदाराकडून देण्यात आलेल्या वाढदिवसांच्या पार्टीमध्ये तब्बल 500 जण उपस्थित होते. तसेच त्यांनी मास्कही घातले नव्हते. पार्टीमध्ये सोशल डिस्टन्सिंगही पाळण्यात आली नाही. या घटनेचे मी वार्तांकन केले. त्यानंतर मला अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यांनी माझे बांधकाम सुरू असलेले घर पाडले, असे पत्रकाराने सांगितले.
नारायण खेडा येथील वाढदिवसाच्या पार्टींची बातमी झाली होती. मात्र, बांधकाम सुरू असलेले घर आमदाराने पाडले, हा आरोप चुकीचा आहे. अधर्वट बांधण्यात आलेले घर हे पालिका अधिकाऱ्यांनी पाडले आहे. नियमांचे उल्लंघन केल्यामुळे आणि परवानगी न घेता बांधकाम सुरू करण्यात आल्याने घर पाडण्यात आले आहे, असे तेलंगाणा राष्ट्रीय समितीचे प्रवक्ते क्रिशांक यांनी सांगितले.
तेलंगणा सरकार योगी आदित्यनाथ सरकार किंवा भाजपाच्या कोणत्याही सरकारसारखे नाही. तेलंगाणामध्ये एका पत्रकाराला बातम्या करण्याचे सर्व हक्क आहेत, असेही ते म्हणाले.
दरम्यान भाजप नेते राम चंद्रेर राव यांनी या घटनेचा निषेध केला आहे. सत्ताधारी पक्षाने लॉकडाऊनचे उल्लंघन केल्याचे वार्तांकन करणाऱया पत्रकाराला त्रास देण्यात आला. तसेच राज्याचे आयटी मंत्री केटी रामा राव यांनी शहरातील उड्डाणपूलचे उद्घाटन केले. यावेळी त्यांच्यासोबत 50 जण उपस्थितीत होते. सत्ताधारी पक्षच लॉकडाऊनच्या नियमांचे उल्लंघन करत असून विनाकारण, विरोधी पक्षावर खोटे खटले दाखल करत आहे, भाजप अशा मनोवृत्तीचा निषेध करतो, असे राव म्हणाले