नवी दिल्ली - जवाहरलाल नेहरू विद्यापीठ प्रशासनाने दिल्ली हिंसाचारमधील पीडित व्यक्तींना विद्यापीठ परिसरामध्ये आश्रय देऊ नये अशी सुचना विद्यार्थी संघटनांना केली आहे. तसे आढळून आल्यास संबधीत विद्यार्थ्यांवर कारवाई करण्यात येईल, असे पत्रकात म्हटले आहे. विद्यापीठ निबंधक प्रमोद कुमार यांनी यासंबधी परिपत्रक जारी केले आहे.
विद्यापीठात शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना परिसराला आश्रय गृह बनवण्याचा कायदेशीर अधिकार नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांनी हिंसापीडित व्यक्तींना विद्यापीठात आश्रय देऊ नये, अशी सूचना विद्यापीठ प्रशासनाने केली आहे.
पीडित व्यक्तींना मदत करण्याची इच्छा असल्यास विद्यापीठातून गरजेच्या वस्तू जमा करून विद्यार्थ्यांनी लोकांना मदत करावी. मात्र, विद्यापीठ प्रशासनाविरोधामध्ये कोणत्याही प्रकारचे कार्य करू नका, असे आवाहन विद्यापीठाचे कुलगुरू एम. जगदीश कुमार यांनी विद्यार्थ्यांना केले आहे.
हेही वाचा - केजरीवाल सरकारला नाही देशद्रोह कायद्याची समज; चिदंबरम यांचा हल्लाबोल