ETV Bharat / bharat

जेएनयूद्वारे कोविड-१९ पोर्टल लाँच, विद्यार्थ्यांना कोरोनाबाबत मिळणार अपडेट माहिती

जेएनयूमध्ये देशाच्या कानाकोपऱ्यातून विद्यार्थी शिकण्यासाठी येतात. लॉकडाऊन असल्यामुळे सर्वजण आपआपल्या गावाला गेले आहेत. तसेच कोरोनाबाबत सोशल मीडियावर अनेक अफवा देखील पसरवल्या जातात. त्यामुळे विद्यार्थ्यांनी अशा अफवांपासून दूर राहावे आणि त्यांना कोरोना विषाणूबाबत योग्य ती अपडेट माहिती मिळावी, यासाठी कोविड-१९ पोर्टल सुरू केले असल्याचे कुलपती प्राध्यापक एम. जगदीश कुमार यांनी सांगितले.

jnusu  coronavirus update  corona virus  abvp  aisa  कोविड-19  covid-19  कोरोना अपडेट
जेएनयूद्वारे कोविड-१९ पोर्टल लाँच, विद्यार्थ्यांना मिळणार कोरोनाबाबत अपडेट माहिती
author img

By

Published : Apr 16, 2020, 11:23 AM IST

नवी दिल्ली - कोरोना विषाणूमुळे देशभरात लॉकडाऊन सुरू आहे. त्यामुळे सर्व शैक्षणिक संस्था देखील बंद आहेत. तसेच विद्यापीठात शिकणारे विद्यार्थी आपआपल्या गावी गेले आहेत. त्यामुळे कोरोनाबाबत त्यांना योग्य ती माहिती मिळण्यासाठी जवाहरलाल नेहरू विद्यापीठाने कोविड-१९ पोर्टल सुरू केले आहे. या पोर्टलद्वारे सर्व विद्यार्थ्यांना कोरोना विषाणूसंबंधित अपडेट माहिती मिळणार आहे.

जेएनयूद्वारे कोविड-१९ पोर्टल लाँच, विद्यार्थ्यांना मिळणार कोरोनाबाबत अपडेट माहिती

कोरोना महामारी हा चिंतेचा विषय आहे. यामध्ये सर्वांनी एकत्र येऊन कोरोना विषाणूविरोधात लढा द्यायचा आहे. त्यातच जेएनयूमध्ये देशाच्या कानाकोपऱ्यातून विद्यार्थी शिकण्यासाठी येतात. लॉकडाऊन असल्यामुळे सर्वजण आपआपल्या गावाला गेले आहेत. तसेच कोरोनाबाबत सोशल मीडियावर अनेक अफवा देखील पसरवल्या जातात. त्यामुळे विद्यार्थ्यांनी अशा अफवांपासून दूर राहावे आणि त्यांना कोरोना विषाणूबाबत योग्य ती अपडेट माहिती मिळावी, यासाठी कोविड-१९ पोर्टल सुरू केले असल्याचे कुलपती प्राध्यापक एम. जगदीश कुमार यांनी सांगितले. तसेच विद्यार्थ्यांनी अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन देखील त्यांनी विद्यार्थ्यांना केले.

दरम्यान, प्राध्यापक पवनधर यांच्या नेतृत्वात कोविड-१९ टास्क फोर्स देखील बनवण्यात आली आहे. याद्वारे जेएनयूमध्ये उपलब्ध असलेल्या गोष्टींचा उपयोग जनतेच्या हितासाठी करण्यात येणार असल्याचे कुलपतींनी सांगितले.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.