ETV Bharat / bharat

ईशान्य दिल्ली हिंसाचार: केजरीवालांच्या निवासस्थानाला जेएनयू, जामियाच्या विद्यार्थ्यांचा घेराव - जामिया मिलिया इस्लामिया न्यूज

जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील विद्यार्थी संघटना आणि जामिया मिलिया इस्लामिया विद्यापीठाच्या माजी विद्यार्थ्यांनी मुख्यमंत्री निवासस्थानाला घेराव घातला. मुख्यमंत्री केजरीवाल यांनी हिंसाचारग्रस्त भागाची स्वत: पाहणी करुन परिस्थितीचा आढावा घ्यावा, अशी मागणी या विद्यार्थ्यांची होती.

Delhi violence
दिल्ली हिंसाचार
author img

By

Published : Feb 26, 2020, 10:59 AM IST

नवी दिल्ली - ईशान्य दिल्लीत झालेल्या हिंसाचाराच्याविरोधात जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील विद्यार्थी संघटना आणि जामिया मिलिया इस्लामिया विद्यापीठाच्या माजी विद्यार्थ्यांनी मुख्यमंत्री निवासस्थानाला घेराव घातला. मंगळवारी रात्री विद्यार्थ्यांनी केंद्र सरकार, दिल्ली सरकार आणि मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. विद्यार्थ्यांच्या जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांना पाण्याचा मारा करावा लागला.

केजरीवालांच्या निवासस्थानाला जेएनयू आणि जामियाच्या विद्यार्थ्यांचा घेराव

मुख्यमंत्री केजरीवाल यांनी हिंसाचारग्रस्त भागाची स्वत: पाहणी करुन परिस्थितीचा आढावा घ्यावा. दिल्लीत शांतता आणि सुव्यवस्था प्रस्थापित करण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात. हिंसाचारात जखमी आणि मृत झालेल्या लोकांच्या मदतीसाठी सर्व सरकारी यंत्रणा पूर्णपणे सक्रिय कराव्यात, अशी मागणी जेएनयूतील विद्यार्थी संघटनेच्या माजी उपाध्यक्ष सारिका चौधरी यांनी या आंदोलना दरम्यान केली.

हेही वाचा - देशात 'भारत माता की जय' म्हणणारा राहील; वातावरण खराब करणाऱ्यांवर कारवाईची वेळ'

हिंसाचारावर नियंत्रण मिळवण्यासाठी दिल्ली सरकारच्यावतीने काय उपाययोजना केल्या जात आहेत, याबाबत पत्रकार परिषद घेऊन मुख्यमंत्र्यांनी माहिती द्यावी. हिंसाचारावर नियंत्रण मिळवताना झालेली पोलीस कारवाई संशयास्पद असून याची उच्चस्तरावर चौकशी केली जावी, असेही सारिका चौधरी म्हणाल्या.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.