ETV Bharat / bharat

काश्मीरात लष्कर-ए-तोयबाच्या ८ हस्तकांना ठोकल्या बेड्या, स्थानिकांमध्ये पसरवत होते दहशत - दहशवादी

जम्मू-काश्मीरमध्ये लष्कर-ए-तोयबा दहशतवादी संघटनेच्या आठ हस्तकांना अटक करण्यात आली आहे.

काश्मीर
author img

By

Published : Sep 10, 2019, 10:15 AM IST

श्रीनगर - जम्मू-काश्मीरमध्ये लष्कर-ए-तोयबा दहशतवादी संघटनेच्या आठ हस्तकांना अटक करण्यात आली आहे. या दहशतवाद्यांकडून काश्मीरमधील स्थानिक नागरिकांना धमकावण्यात येत होते. दक्षिण काश्मीरमधील सोपोरमधून पोलिसांनी ८ जणांच्या मुसक्या आवळल्या.

अटक केलेले आठ दहशतवादी काश्मीरमध्ये धकमी देणारे पोस्टर पसरवत होते. अझीज मीर, ओमर मीर, तौसीफ नजार, इम्तियाझ नजार, ओमर अकबर, फैजान लतिफ, दानिश हबिब आणि शौकत अहमद मीर, अशी आठ दहशवाद्यांची नावे आहेत. पोस्टर तयार करण्यासाठी वापरण्यात येणारे कॉप्यूटर आणि इतर सामान त्यांच्याकडून जप्त करण्यात आले आहे. लष्कर-ए-तोयबाच्या इतर तीन दहशतावाद्यांच्या इशाऱ्यानुसार ते काश्मीरात दहशत पसरवत होते.

हेही वाचा - पाकिस्तान काश्मीरमध्ये हिंसाचार पसरवतोय - अजित डोवल

सोपोरमध्ये एका व्यापाऱ्याच्या घरावर दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात २ वर्षाच्या लहान मुलीसह ४ जण जखमी झाले होते. त्यानंतर आता स्थानिकांना धमकी देणाऱ्या ८ जणांना अटक करण्यात आली आहे.

काश्मीरची स्वायतत्ता काढून घेतल्यानंतर खोऱ्यात मोठ्या प्रमाणावर सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे. अति संवेदनशील भागामध्ये अजूनही संचारबंदी लागू आहे. पाकिस्तान काश्मीरमधील परिस्थिती चिघळवण्याचा प्रयत्न करत आहे. दहशतवादी गटांना प्रशिक्षण आणि भारतात घुसखोरी करण्यासाठी पाकिस्तानकडून मदत करण्यात येत आहे

हेही वाचा - काश्मीरमध्ये निर्बंध आणि राजकीय वावर कमी करण्याचा अमेरिकेचा आग्रह

Intro:Body:Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.