ETV Bharat / bharat

वैष्णवी देवी यात्रा 16 ऑगस्टपासून सुरू; सरकारने जारी केली नियमावली - Mata VaishnoDevi Yatra latest news

वैष्णवी देवी मंदिराकडे दररोज जास्तीत जास्त पाच हजार भाविक या यात्रेत सहभागी होऊन जाऊ शकतात. त्यामध्ये दुसऱ्या राज्यातील जास्तीत जास्त 500 भाविकांचा समावेश असेल, मंदिर गाभाऱ्यात व परिसरात एकावेळी 600 पेक्षा जास्त भाविकांना एकत्र येण्याची परवानगी नसेल.

Vaishanvi devi yatra
Vaishanvi devi yatra
author img

By

Published : Aug 12, 2020, 1:04 PM IST

ऊधमपूर - कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर जगविख्यात वैष्णवी देवीची यात्रा खंडित करण्यात आली होती. मात्र, आता 16 ऑगस्टपासून ही यात्रा सुरू करण्यात येणार आहे. कोरोना संदर्भात लागू करण्यात आलेल्या नियमावलीचे काटेकोरपणे पालन करत ही यात्रा सुरू होईल, अशी माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

वैष्णवी देवी मंदिराकडे दररोज जास्तीत जास्त पाच हजार भाविक या यात्रेत सहभागी होऊन जाऊ शकतात. त्यामध्ये दुसऱ्या राज्यातील जास्तीत जास्त 500 भाविकांचा समावेश असेल, मंदिर गाभाऱ्यात व परिसरात एकावेळी 600 पेक्षा जास्त भाविकांना एकत्र येण्याची परवानगी नसेल.

सरकारने मंगळवारी राज्यातील धार्मिक स्थळ खुली करण्यासंदर्भात निर्णय जारी केला. यामध्ये कोरोनासंदर्भात आवश्यक ती योग्य उपाययोजना ही प्रसिद्ध करण्यात आली आहे. राज्यातील प्रत्येक जिल्ह्यातले धार्मिक स्थळ खुली करण्यासाठी परवानगी देण्यात आली आहे. त्यानुसार जम्मू काश्मीर राज्यातील वैष्णवी देवी, चरार ए शरीफ, नंगाली साहिब, शाहदरा शरीफ, शिवखौड़ी ही धार्मिक स्थळे ही सुरू होतील.

आपत्ती व्यवस्थापन विभागाचे राज्य कार्यकारी समितीचे सदस्य सचिव संदीप म्हणाले, की जिल्हा न्यायाधीश या धार्मिक स्थळांना घालून दिलेल्या नियमावलीची अंमलबजावणी करून घेतील. तसेच त्यांच्याकडे कोरोना संदर्भात योग्य परिस्थिती नसल्याचे आढळल्यास मंदिर बंद करण्याचा निर्णय घेण्याचे अधिकारही असतील. नोंदणी न केल्यास कोणत्याही भाविकास वैष्णवी देवी यात्रेला जाता येणार नाही.

वैष्णोदेवी यात्रेसाठी लागू करण्यात आलेली नियमावली वैष्णवी देवी मंदिर ट्रस्टचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि जिल्हा न्यायाधीश यांना लागू करावी लागणार आहे. दरम्यान 30 सप्टेंबर पर्यंत 5000 भाविक येण्यास परवानगी असेल दुसऱ्याराज्यातून येणाऱ्या भाविकांना कोरोना टेस्ट घालून दिलेल्या नियमावलीचे पालन करणे अनिवार्य असेल.

चादर आणि शाल नेण्यास बंदी

माता वैष्णवी देवी दर्शनासाठी फक्त त्या भाविकांना परवानगी देण्यात येईल, ज्यांची कोरोना टेस्ट निगेटिव्ह आली आहे. तसेच भाविकांना चादर, शाल घेऊन जाण्यास मनाई करण्यात आली आहे. याचबरोबर दर्शनानंतर वैष्णवीदेवी भवनामध्ये राहण्यास भाविकांना बंदी घालण्यात आली आहे.

जम्मू-काश्मीरच्या रेडझोन असलेल्या जिल्ह्यांमधून येणाऱ्या भाविकांना देखील कोरोना टेस्ट अनिवार्य आहे. वैष्णोदेवी यात्रा मार्गावर कोरोना चाचणी करण्याच्या सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. या ठिकाणी रँडम टेस्ट करण्यात येतील.

सुरक्षा कमेटी बनवावी लागेल

धार्मिक संघटना ट्रस्ट आणि संबंधित जिल्हा न्यायाधीश यांच्यासोबत चर्चा करून भाविकांची संख्या निर्धारित करावी लागेल. धार्मिक संघटनांना covid-19 सुरक्षा कमिटीचे गठन करावे लागेल. जे सरकारकडून लागू करण्यात आलेल्या नियमावलीची अंमलबजावणी करून घेतली जाईल.

अशी आहे नियमावली -

साठ वर्षांपेक्षा अधिक व्यक्ती गर्भवती महिला आणि 10 वर्षांपेक्षा कमी मुले यात्रेला येऊ शकणार नाहीत

भाविकांना एकमेकांमध्ये सहा फुटाचे अंतर राखावे लागेल

ज्यांच्यामध्ये कोरोनाची लक्षणे नाहीत, असेच भाविक वैष्णवी देवी यात्रेत सहभागी होऊ शकतात

यात्रेत सहभागी होण्यापूर्वी आणि मंदिरात जाण्यापूर्वी भाविकांना आपल्या हात पाय स्वच्छ धुऊन प्रवेश करावा लागेल

यात्राकाळात मूर्ती, धार्मिक ग्रंथ यांना स्पर्श करण्यास अनुमती नाही

पुढील आदेशापर्यंत वैष्णवी देवी मंदीर स्थळी कोणताही धार्मिक विधी करता येणार नाही.

तसेच कोणताही प्रसाद अथवा तीर्थ वाटप करण्यास बंदी घालण्यात आली आहे.

भाविकांना आपल्या चपला वाहनामध्येच ठेवाव्या लागतील.

जेवणाच्या पंगतीसाठी परवानगी देण्यात आली आहे. मात्र भाविकांना ठराविक अंतर ठेवूनच पंगतीत बसावे लागेल.

प्रत्येक भाविकाला आरोग्य सेतू ॲप बंधनकारक असेल

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.