रांची - झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांना आज(शुक्रवार) जीवे मारण्याची धमकी देणारा ई-मेल आला आहे. जर्मनी आणि स्वित्झर्लंड देशातली सर्व्हवरून हा मेल आला आहे. धमकी देणाऱ्या व्यक्तीचा शोध सायबर विभागाने सुरु केला आहे.
मुख्यमंत्री सोरेन यांना जो मेल आला तो 'डिस्पोजेबल' प्रकाराचा होता. म्हणजेच हा मेल फक्त पाठवणार आणि ज्याला पाठवला आहे, त्यांनाच पाहता येतो, असे गुन्हे शाखेतील सुत्रांनी सांगितले. 'तुम्ही जे काही करत आहात, ते पूर्णपणे चुकीचे असून यासाठी तुम्हाला मृत्यूची शिक्षा मिळेल', असे मेलमध्ये म्हटले आहे. तसेच धार्मीक घोषणाही देण्यात आल्या आहेत.
या प्रकरणाचा तपास सायबर पोलीस करत असून एक पथक नेमण्यात आले आहे. मेल पाठवणाऱ्याचे नक्की ठिकाण कोणते याचा शोध सायबर सेल आणि सीआयडीचे तांत्रिक पथक घेत आहे.