रांची - झारखंड विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यासाठी आज (शनिवारी) मतदान होत आहे. 20 जागांसाठी 260 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात असून यात 29 महिला उमेदवारांचा समावेश आहे. 48,25,038 मतदार या उमेदवारांचे भवितव्य ठरवणार आहेत.
निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात मुख्यमंत्री रघुवर दास, सरयू राय, राजा पीटर आणि नक्षलवादी कुंदन हे आपले नशीब आजमवनार आहेत. झारखंडमध्ये एकूण १९ जिल्हे नक्षल प्रभावित असून त्यातील ६७ मतदारसंघ नक्षलग्रस्त आहेत. पूर्व जमशेदपूर मतदारसंघ आणि पश्चिम जमशेदपूर मतदारसंघात सायंकाळी पाच पर्यंत मतदान सुरू राहील. इतर ठिकाणी दुपारी ३ पर्यंतच मतदान होणार आहे.
हेही वाचा - HyderabadEncounter: ९ डिसंबरपर्यंत आरोपींचे मृतदेह जतन करा, उच्च न्यायालयाचे आदेश
येत्या ५ जानेवारीला झारखंड विधानसभेचा कार्यकाळ संपुष्टात येणार आहे. त्यामुळे झारखंडमध्ये एकूण पाच टप्प्यात मतदान होणार आहे. यापुर्वी ३० नोव्हेंबरला पहिल्या टप्प्यासाठी मतदान झाले आहे. १२ डिसेंबरला तिसऱ्या, १६ डिसेंबरला चौथ्या आणि २० डिसेंबरला पाचव्या टप्प्यासाठी मतदान होणार असून २३ डिसेंबरला मतमोजणी होणार आहे.