नवी दिल्ली - देशभरात उद्यापासून (१ जून) २०० विशेष रेल्वेगाड्या धावणार आहेत. मात्र, झारखंड, आंध्र प्रदेश आणि महाराष्ट्र या राज्यांनी याबाबत चिंता व्यक्त केली आहे. त्यामुळे या तीन राज्यांमधून विशेष रेल्वे धावतील का, याबाबत अजूनही साशंकता असल्याचे रेल्वे मंत्रालयाने म्हटले आहे.
याबाबत रेल्वे मंत्रालयाच्या मुख्यालयात एक उच्चस्तरीय बैठक सुरू असल्याचे सूत्रांकडून समजले आहे. कोरोना रुग्णांच्या वाढत्या संख्येमुळे या राज्यांनी रेल्वे सुरू करण्याबाबत चिंता व्यक्त केली आहे. याबाबत पुढील निर्णय ठरल्यानंतर तो सांगितला जाईल, असे रेल्वेच्या एका प्रवक्त्याने सांगितले आहे.
दरम्यान, सध्या सुरू असलेल्या विशेष रेल्वेंच्या आरक्षणासाठीचा कालावधी (अॅडव्हान्स रिजर्वेशन पीरिएड) वाढवण्याचा निर्णय रेल्वे मंत्रालयाने घेतला आहे. यासोबतच, १ जूनपासून सुरू होणाऱ्या आणखी १०० विशेष रेल्वेंनासुद्धा हा नियम लागू होणार आहे. सध्या प्रवाशांना ३० दिवस आधीपर्यंत तिकिटाचे आरक्षण करता येते. यानंतर आता १२० दिवस आधीपर्यंत तिकिटाचे आरक्षण करता येणार आहे.
हेही वाचा : 'आपल्या "बाहुबली" पंतप्रधानांनाही कोरोनाशी सामना करता आला नाही'