ETV Bharat / bharat

जम्मू काश्मीर : 17 वर्षीय मुलाने तयार केले 'फाईल शेअरींग अ‌ॅप'

author img

By

Published : Aug 3, 2020, 12:55 PM IST

जम्मू काश्मीरच्या राजौरी जिल्ह्यातील एका गावात राहणाऱ्या 17 वर्षीय अश्फाक मेहमूद चौधरी याने 'डोडो ड्रॉप' नावाचे शेअरींग अ‌ॅप तयार केले आहे. हे अ‌ॅप इंटनेटशिवाय 480 एमबीपीएसच्या गतीने फाईल ट्रान्सफर करते.

ashfaq chaudary
ashfaq chaudary

राजौरी (जम्मू काश्मीर) - जिल्ह्यात अश्फाक मेहमूद चौधरी या 17 वर्षीय मुलाने फाईल शेअरींग अ‌ॅप तयार केले आहे. त्या अ‌ॅपचे नाव ‘डोडो ड्रॉप’, असे आहे. या अ‌ॅपद्वारे आपण एका मोबाईलमधून दुसऱ्या मोबाईलमध्ये ऑडिओ, व्हिडिओ, फोटो पाठवू शकतो. हे अ‌ॅप वापरताना कोणत्याही प्रकरच्या इंटरनेटची गरज नाही. अश्फाक म्हणाला चायनिज अ‌ॅप 'शेअर इट'वर स्वदेशी ‘डोडो ड्राप’हा उत्तम पर्याय आहे.

चीनकडून त्यांच्या अ‌ॅपच्या माध्यमातून भारतीयांचा डेटा चोरला जात असल्याने शेअर इटसह अनेक चिनी अ‌ॅप्सवर भारत सरकारने बंदी घातली आहे. त्यामुळे आपल्या मोबाईलमधील काही गोष्टी दुसऱ्या मोबाईलमध्ये पाठवताना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता. त्यामुळे अश्फाकने या डोडो ड्रॉप अ‌ॅपची निर्मिती केली आहे. याद्वारे आपणास विना इंटरनेट व्हिडिओ, ऑडिओ, फोटो व इतर फाईल्सची देवाण-घेवाण करता येते.

अश्फाक म्हणाला की, हे अ‌ॅप तयार करण्यासाठी त्याला चार आठवड्यांचा कालावधी लागला. त्यानंतर त्याने हे अ‌ॅप 1 ऑगस्टला लॉन्च केले. या अ‌ॅपच्या फाईल ट्रन्सफरचा स्पीड 480 एमबीपीस इतका आहे. शेअर इटपेक्षा वापरण्यात अतिशय सोपे हे अ‌ॅप असल्याचे तो म्हणाला. तसेच हे अ‌ॅप सुरक्षित असून वापरकर्ते याचा वापर इंटनेटशिवाय करू शकतात, असेही तो म्हणाला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विदेशी वस्तूंऐवजी स्वदेशी वस्तूंचा वापर करा आणि आत्मनिर्भर बना, असा संदेश दिला होता. त्यामुळे मला प्रेरणा मिळाली व मी हे अ‌ॅप बनवून आत्मनिर्भर भारताचा एक घटक बनलो आहे. मला जागतिक पातळीवर भारतीय अ‌ॅप बनवायचे आहेत, असे अश्फाक म्हणाला.

अश्फाक हा सतत काहितरी नाविण्यपूर्ण प्रयोग करत असतो. त्याला आम्ही कधीही विरोध केला नाही. त्याला आम्ही सतत प्रोत्साहीत करुन त्याचे मनोबल वाढवतो. त्याच्या प्रयोगासाठी आम्ही त्याला नेहमी साथ देतो, असे अश्फाकचे वडील परवेझ अहमद चौधरी म्हणाले.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.